प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तिच्या जीवनामध्ये शिक्षणाचे खूप महत्त्व आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार सुद्धा दिला आहे. प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण घेणे अनिवार्य आहे.
मुले ही देशाचे भविष्य असतात. म्हणून त्यांना शिक्षण दिले पाहिजे आणि चांगल्या भविष्यासाठी चांगले शिक्षण दिले पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शिक्षित नागरिक जबाबदार असतो.
शिक्षणामुळे मानवाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सम्मान मिळविण्यासाठी आणि ओळख कमविण्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचे साधन आहे.
शिक्षण म्हणजे काय –
शिक्षण हे लोकांच्या विचार सारणीत सकारात्मक विचार आणून बदल घडवते आणि नकारात्मक विचार दूर करते. आपल्या लहान पणात आई – वडील हेच आपले गुरु असतात आणि ते आपल्यावर चांगले संस्कार करतात.
कौशल्य वाढवण्याचे आणि ज्ञान वाढविण्याचे उत्तम मार्ग म्हणजे वर्तमान पत्रे वाचणे, चालल्या लेखकांची पुस्तके वाचणे इ शिक्षण आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवते. शिक्षण हे आपल्याला चांगले स्थान मिळवून देण्यात मदत करते. शिक्षणाचे महत्त्व
आजच्या युगामध्ये शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षणाची अनेक साधने वापरून आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. तसेच आपले ध्येय सुद्धा पूर्ण करू शकतो.
उच्च स्तरीय शिक्षण हे व्यक्तीला कुटुंबात आणि समाजात एक आदर आणि वेगळीच ओळख निर्मण करून देते. शिक्षणाचाच काळ हा सर्वांसाठी सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे.
विद्या सर्वश्रेष्ठ धन
ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे की, तिला कोणी चोरू शकत नाही. विद्या ही एकमेव संपत्ती आहे जर कोणाला वितरित केली तरी कमी होणार नाही.
परंतु अधिक वाढते. आपल्या समाजात सुशिक्षित लोकांचा आदर केला जातो. म्हणून आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या जीवनात शिक्षणाचे खूप महत्वाचे आहे.
जो मनुष्य शिक्षण घेतो त्याचे जीवन सफल होते आणि जो मनुष्य शिक्षण घेत नाही त्याचे जीवन निरर्थक बनते. तसेच तो आपल्या जीवनात योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
शिक्षणाचे मार्ग शिक्षण मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत.
प्राथमिक शाळा
ज्ञानाचे मुख्य स्थान म्हणजे शाळा होय. ज्या ठिकाणी आपण आपण प्राथमिक शिक्षण घेतो. या टप्प्यामध्ये मुलांना १ ली ते ५ वी पर्यंत शिकवले जाते.
हिंदी मेडियमच्या मुलांना हिंदी मध्ये पुस्तके असतात तर इंग्रजी मेडियमच्या मुलांना इंग्रजी भाषेतून पुस्तके असतात.
आज भारत सरकारने प्रत्येक गावांमध्ये सरकारी प्राथमिक शाळा या सुरु केल्या आहेत. जिथे मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.
कनिष्ठ शिक्षण
शिक्षणाच्या या स्तरावर ६ ते ८ वी पर्यंत शिकवले जाते. सरकारने प्रतेय्क राज्यात आणि जिल्ह्यात अनेक कनिष्ठ शाळा या सुरु केल्या आहेत. खाजगी शाळा सुद्धा आहेत. जिथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते.
महाविद्यालयीन शिक्षण
आज सरकारने राज्यात आणि जिल्ह्यात शासकीय आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत. तसेच अनुदानित, खाजगी आणि शासकीय शाळा आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यासाठी कुठेही दूर जावे लागणार नाही.
तसेच आज सरकारने अनेक विद्यापीठे सुद्धा स्थापन केली आहेत. देशाने उच्च शिक्षणाला आणतात राष्ट्रीय दर्जा दिला आहे. परदेशी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी भारत देश हा एक लोकप्रिय स्थान बनले आहे.
निष्कर्ष
शिक्षण हे आपल्याला मानवी हएक महत्वाचं क्क, सामाजिक हक्क आणि जबाबदाऱ्या पार पडण्यास मदत करते. शिक्षण हे प्रत्येक देशाचा एक महत्वाचा भाग आहे. या शिक्षणाशिवाय कोणताही देश विकास करू शकत नाही. म्हणून शिक्षण हे मानवाला अज्ञानाच्या अंधारापासून ग्याच्या प्रकाशाकडे घेऊन जाते.