प्रस्तावना:
आपला भारत देश हा उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. जिथे प्रत्येक धर्माचे आणि जातीचे व संस्कृतीचे लोक हे आपल्या रीती – रिवाजानुसार अनेक सण साजरे करतात. या सर्व उत्सवांमध्ये केवळ धार्मिक आणि प्रेमळ वातावरण दिसून येत नाही तर या सणांच्या माध्यमातून सर्व लोकांमध्ये प्रेमाची भावना, बंधुभाव वाढतो.
त्याच बरोबर या सर्व उत्सवांमध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे – गुरु पौर्णिमा. जो विशेष गुरुसाठी समर्पित केला जातो. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुचे सर्वात महत्वाचे स्थान असते. गुरूच्या ज्ञानाशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.
गुरु शब्दाचा अर्थ –
गुरु हा शब्द गु + रु या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. या पवित्र शब्दाच्या जोडीने तयार झालेला गुरु हा शब्द आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करतो. या दिवशी संपूर्ण देशभरात गुरूंचा सन्मान केला जातो.
आपण रोज सकाळी शाळेत गेल्यावर किंवा घरी
“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll” हा श्लोक म्हणतो. या श्लोकाचा अर्थ एकदम खोलवर दडलेला आहे. गुरु हे प्रत्यक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच शिव अशी रूपे आहेत.
ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा या गुरूंना मी नमस्कार करतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. कारण कोणत्याही भक्ताला ज्ञानाची प्रपत्ती ही गुरुमुळेच होते.
म्हणून माणूस कितीही मोठा असला तरी तरी त्याला मिळणारे ज्ञान, आत्मज्ञान या सरबवानसाठी गुरूचीच आवश्यकता असते.
गुरु पौर्णिमा केव्हा साजरी केली जाते-
दरवर्षी आपल्या भारत देशात गुरु पौर्णिमा ही आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचे लोक हे आपल्या गुरूच्या सन्मानासाठी उपवास, पूजा इ पद्धतीने हा सण साजरा करतात.
तसेच हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरु पौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हटले जाते.
गुरु पौर्णिमा म्हणजे काय –
गुरु पौर्णिमा म्हणजे ज्यांनी महाभारत आणि पुराणे लिहिली. तसेच त्यांनी चारही वेदांचे महत्त्व सांगणाऱ्या व्यास मुनींना वंदन करण्याचा हा दिवस आहे.
व्यास मुनींनी लोकांना वेदाचे ज्ञान दिले. त्याच प्रमाणे त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे. असे मानले जाते की, गुरुची उपासना केल्यामुळे त्याच्या शिष्यानं गुरूच्या शिक्षणाचे फळ मिळते.
गुरु – शिष्याची परंपरा
आपल्या देशामध्ये रामायण आणि महाभारत यापासून गुरु – शिष्याची परंपरा चालत आलेली आहे. आपण ज्या गुरूंकडून शिक्षा प्रदान करतो आणि त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करतो.
अशा या गुरूंना मान देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. महर्षी व्य मुनींपासून ही प्रथा रूढ झाली आणि आजही प्रथा चालत आहे.
गुरु – शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या
आपण कोणाचे तरी शिष्य असतो या भवनमध्ये कृतज्ञता वाटते. म्हणून भारतीय परंपरेतील काही गुरु – शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.
जसे की जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, विश्वामित्र – राम, लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन या सर्व जोड्या गुरु – शिष्याची परंपरा आहे. परंतु एकलव्याची गुरुनिष्ठा पहिली तर आपले सर्वांचे मस्तक झुकल्याशिवाय राहणार नाही.
गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते –
गुरु पौर्णिमेच्या दिवशी सगळे शिष्य हे आपल्या गुरूच्या पाया पडतात. तसेच त्यांची पाद्यपूजा करतात. या दिवशी व्यास पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे. गुरु परंपरेत महर्षी व्यास मुनी यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले जाते.
निष्कर्ष:
गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा म्हटली जाते. म्हणून आपण सर्वानी आपल्या गुरूंचा सन्मान आणि आदर केला पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये गुरूंचे सर्वात मोठे स्थान असते.