प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे सण हे साजरे केले जातात. भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक मानले जातात.
तसेच प्रत्येक सणामागे धार्मिक महत्त्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. त्या सर्व सणांपैकी गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा एक प्रसिद्ध आणि महत्वाचा सण आहे.
गुढीपाडवा हा सण सर्व लोकांमध्ये एकोपा निर्माण करतो. हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो.
गुढीपाडवा कधी साजरा केला जातो –
गुढीपाडवा हा सण हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाला नवीन वर्ष असे म्हटले जाते.
गुढीपाडवा म्हणजे काय –
चैत्र शुक्ल प्रतिपदेचे संस्कृत नाव गुढीपाडवा असे आहे. पाडवा हा शब्द संस्कृत पड्डवा या शब्दापासून तयार झाला आहे.
ज्याचा अर्थ असा होतो, चंद्राच्या वाढत्या कलेचा पहिला दिवस म्हणजे जो संस्कृत भाषेत प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा हिंदू पंचांगानुसार मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.
गुढीपाडव्याचा इतिहास
गुढी पडावा हिंदू सणांपैकी सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती.
तसेच दुसऱ्या कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आणि रावणाचा वध करून आपल्या अयोध्या नागरी परत आले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या आणि तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले होते.
गुढी पाडव्याचा अजून एक इतिहास आहे कि, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले होते. या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या मदतीने शकांचा पराभव केला.
म्हणून शालिवाहन राजाच्या नावाने जी नवीन कालगणना झाली त्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते. म्हणून गुढीपाडव्याचा हा सण समृद्ध आणि पवित्र मानला जातो.
गुढीपाडवा सणाचे सामाजिक आणि “नैसर्गिक” महत्त्व
गुढी पाडव्याच्या दिवशी नव्या गीष्टींचा आरंभ करणे शुभ मानले जाते. या दिवशी नवीन कामना सुरु करणे अध्यात्मिकरीत्या पवित्र मानले जाते. गुढी पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात.
नैसर्गिक महत्त्व
चैत्र म्हनण्यापासून हिवाळ्याची थंडी ही कमी होऊ लागते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. यादिवशी कडुनिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवाच्या शरीरासाठी उपयुक्त असतात.
कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास शरीराला थंडावा मिळतो. तसेच गुढीपाडवा या सणाच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते.
गुढीपाडवा हा सण “कसा” साजरा केला जातो –
गुढीभोवती रांगोळी काढली जाते. यादिवशी मुख्य दरवाजा हा सुंदर र्णांगाच्या फुलांनी आणि तोरणांनी सजवला जातो. तसेच फुले वाहिली जातात. गोडधोड पदार्थांचा नैवेद्य करून गुढीला दाखवला जातो.
गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी कुटुंबात पुरणपोळी केली जाते. त्याच बरोबर गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिबांच्या पानांचे सेवन केले जाते. कडुनिंबाची पाने पचनास मदत करतात.
निष्कर्ष:
चैत्र महिन्यातील गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. गुढी पाडवा या सणामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घड्याचे दान देणे शुभ मानले जाते. म्हणून गुढी पाडवा हा सण आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे.