gudi padwa1

गुढीपाडवा वर मराठी निबंध – वाचा येथे Essay on Gudi Padwa in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

चैत्राची सुरुवात ही ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे म्हणजे – गुढीपाडवा होय. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते आणि रामनवमीला संपते.

गुढीपाडवा हा शब्दाची परिभाषा

गुढी पाडवा2

पाडवा हा शब्द हा एक संस्कृत शब्द आहे. पड्डवा या संस्कृत शब्दापासून गुढीपाडवा हा शब्द तयार झाला आहे. ज्याचा अर्थ असा होतो की, चंद्राच्या वाढत्या कलेचा पहिला दिवस जो संस्कृत भाषेमध्ये प्रतिपदा म्हणून ओळखला जातो.

गुढीपाडवा सण केव्हा साजरा केला जातो –

गुढी पाडवागुढीपाडवा हा भारतीय सण असून तो हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासहित भारतातील अनेक देशात साजरा केला जातो. तसेच हा सण नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.

गुढीपाडवा हा सण कसा साजरा केला जातो –

Gudi Padwa 1 गुढीपाडवा या सणाच्या दिवशी काठीची पूजा केली जाते. या दिवशी ग्रामीण भागात अंगण झाडून शेणाने सारवले जाते. तसेच शहरामध्ये लोक साफ – सफाई करतात.

स्त्रिया किंवा मुली आपल्या घराच्या दारासमोर सुबक रांगोळी काढतात. त्याच प्रमाणे मराठी घरांमध्ये खिडकीबाहेर गुढी उभारली जाते आणि तिची सजावट केली जाते. गुढी म्हणजे बांबूची काठी असते.

त्या काठीला हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे जरीचे किनार असलेले कापड बांबूच्या टोकाला बांधले जाते. त्या गुढीवर चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडुनिंबाची पाने, आंब्याचे डहाळे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते आणि अंगणात पाटावर गुढी उभी केली जाते.

त्याभोवती रांगोळी काढली जाते. तसेच घराचं दरवाजा सुद्धा सुंदर फुलांनी आणि तोरणांनी सजवला जातो. तसेच गुढीला नैवद्य दाखल जातो आणि सूर्यास्त होण्याच्या आधी गुढी खाली उतरवली जाते.

गुढी उभारण्याची महत्वाची कारणे –

gudi padwa

१) गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती असे मानले जाते.

२) तसेच भगवान श्रीराम आपला १४ वर्षांचा वनवास भोगून आणि रावणाचाही वध करून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते.

३) त्याच प्रमाणे शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे तयार करून त्यामध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा पराभव केला होता. म्हणून शालिवहन नावाच्या राजाने जी नवीन कालगणना सुरु केली ती ‘शालिवाहन शक’ म्हणून ओळखली जाते.

गुढी पाडवा सणाचे सामाजिक महत्त्व

गुढी पाडवा या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी हातात घेतलेले कोणतेही काम हे यशस्वी होते.

तसेच या दिवशी हिंदू धर्माचे लोक हे एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्याच बरॊबर गुढी पाडव्याच्या दिवशी लोकांना मदत करणे किंवा दान करणे शुभ मानले जाते.

गुढी पाडव्याच्या दिवशी विशेष आहार

Gudi Padwa

गुढीपाडवा या सणाच्या दिवशी महाराष्ट्रात मराठी कुटुंबात श्रीखंड, पुरी तसेच पुरणपोळीचा आहार असतो. तसेच कोकणी लोक हे कांगाची खीर, रताळे, खोबऱ्याचे दूध आणि तांदळाच्या पिठापासून अनेक पदार्थ तयार करतात.

निष्कर्ष:

गुढीपाडवा हा एक हिंदू धर्माचा सर्वात महत्वाचा सण आहे. जो नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण प्रसन्नतेचा साज घेऊन येतो.

तसेच हा सण म्हणजे गोडधोडाचा, पंचांग पूजेचा, चैत्र पालवीने नटलेला तसेच वसंत ऋतूच्या आगमनाच्या उत्साहाचा दिवस आहे. गुढीपाडवा हा सण आनंद आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढी ही स्वागताचे प्रतीक देखील आहे.

मराठीत गुढीपाडवा निबंधाविषयी काही शंका असल्यास आपण खाली आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

Leave a Comment