प्रस्तावना
बाग म्हटलं की, विविध रंगाची फुले असणारी तसेच झाडे असणारे स्थान होय. बाग ही एक सुंदर फुलांचे आणि हिरवळ असणारे स्थान आहे. या बागेमध्ये चारही बाजूला हिरवळ आणि रंगबिरंगी फुलांची झाडे ही लावलेली असतात.
त्यामुळे या बागेचे सौंदर्य अजून मनमोहक दिसते. बागेमध्ये असणारी फुले पाहताच प्रत्येकाचे मन मोहून जाते. बाग ही कुठेही असली तरी प्रत्येकाच्या मनाला आनंदित करते.
उद्यान म्हणजे बाग होय. ऐतिहासिक काळात मोठमोठे बागा असायच्या. तसेच त्या भरपूर लांब आणि रुंद सुद्धा असायच्या. त्या काळी बागांमध्ये कोणत्या न कोणत्या तरी देवाचे मंदिर हे बागेमध्ये असायचे.
बागेची सुंदरता
बऱ्याच बागा या दिसायला खूप सुंदर दिसतात. त्या बागांमध्ये रंगबिरंगी रंगाची फुले असतात. बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी एक मैदान देखील असते. तसेच बागेमध्ये लहान मुलांना झुलण्यासाठी झुले देखील असतात. बागेमध्ये भव्य वृक्ष, फलभारांनी वाकलेली फळझाडे पाहायला मिळतात.
काही लोक हे सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जातात. बागेमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळतो. बागेतील निसर्गाचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते. त्याच प्रमाणे बागेमध्ये फुलांचा सुंगंध हा सगळीकडे दरवळलेला असतो आणि त्यामुळे मन उत्साहित होते.
विविध प्रकारची फुलझाडे
बागेमध्ये विविध प्रकारची फुलझाडे, झाडे लावलेली असतात. जसे की गुलाब, मोगरा, जाई – जुई, सोनचाफा,सदाफुली, चमेली इ अनेक प्रकारची फुलझाडे असतात.
तसेच संत्र्याचे झाड, आंब्याचे झाड, लिंबाचे झाड अशी विविध झाडे आढळून येतात. या सर्व झाडांवर उन्हाळ्यात फळे लागतात. काही पक्षी बागेतील झाडांवर आपला घरटा बांधून राहतात. त्यामुळे सकाळच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलण्याच्या आवाज ऐकू येतो.
उद्यानांचा हेतू
सर्व प्रकारच्या वेली या बागांमध्ये आपले सुस्वरूप फुलांद्वारे उघड करीत असतात. आजच्या बागा या आकाराने जरी लहान असल्या तरी त्या निर्माण करण्यामागे सामाजिक दृष्टिकोन असतो.
केवळ सर्वाना विश्रांती मिळण्यासाठी बाग ही तयार केली जात नाही तर वृद्ध माणसांना विश्रांती, प्रौढांना शांती आणि लहान – मुलांना मौजमजा करायला मिळावी म्हणून तयार केली जाते. मुले या बागांचा खूप उपयोग करून घेतात.
तसेच मुलांना शाळेमध्ये बाग आणि फुलांविषयी शिकवले जाते. जे ज्ञान त्यांना पुस्तकाद्वारे प्राप्त होते. त्यांना अनेक प्रकारची फुले ही बागेत जाऊन पाहायला मिळतात.
ते कोणत्या प्रकारचे फुल आहे आणि रंग कोण – कोणता असतो हे समजते. काही लोक हे आपल्या बालकणीपेक्षा बागेचा आनंद सर्वात जास्त घेतात. सुंदर बागेला पाहताच मन आनंदित होते आणि मनातील वाईट भावना दूर होतात.
बागेमध्ये स्वच्छता
बागेमध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे. बागांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी आजही काही यंत्रणा या कार्यरत आहेत. तसेच बागेमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांवर काही बंधने ही घातलेली असतात.
तसेच बागेतील फुलझाडे तोडण्यास सक्त बंदी असते. तसेचझ तेथील झाडांना हात लावणे देखील बंधनकारक असते. आजचे बगीचे हे भव्य नाहीत तरीपण निसर्गाच्या सौंदर्याचा दृष्टिकोन बागांना लाभला आहे. आज युगात मानव विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगले उभी करत आहे.
परंतु एक छोटीसी बाग तयार करत नाही आहे. जर आपल्या घर समोर किंवा इत्तर ठिकाणी बाग नसेल तर मानव निसर्गातील शीतलता आणि सावलीचा आनंद घेऊ शकत नाही.
निष्कर्ष:
निसर्गाबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर समोर एक छोटीसी बाग तयार केली पाहिजे. जर ही बाग नसेल तर लहान मुले आणि मोठी माणसे निसर्गाच्या चैतन्याचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणून बागांना तजेलदारपणा राखण्यात आणि सुरक्षित ठेवण्यात सर्व लोकांनाही प्रयत्न केला पाहिजे.