बाग मराठी निबंध – वाचा येथै Essay on Garden in Marathi Language

प्रस्तावना:

बाग ही एक हिरवळ आणि सुंदर फुलांनी भरलेले ठिकाण आहे. जिथे प्रत्येक व्यक्तीला गेल्यावर त्याच्या मनाला शांती मिळते आणि मन प्रसन्न होत. बागेमध्ये सगळीकडे हिरवळ आणि सुंदर रंगबिरंगी फुले असतात.

ती सुंदर फुले बगायला खूप छान वाटते. तसेच उद्यान म्हणजेच बाग होय. ऐतिहासिक काळात खूप मोठमोठ्या बाग होत्या. त्या भरपूर लांब आणि रुंद होत्या. त्याकाळी कोणत्या न कोणत्या देवतांचे देवालय हे  बागेत असायचे.

बागेची सुंदरता किंवा सौंदर्य

बागेमध्ये भव्य वृक्ष, तसेच फळा – फुलांनी भरलेली आणि वाकलेली झाडे पाहायला मिळतात. तसेच बागेमध्ये एखादा तलाव आणि त्यात विहार करणारे पक्षी आणि कमळांनी सुशोभित करणारी असते.

बरीच काही उद्याने हि भरपूर सुंदर असतात. त्या बागेतील रंगबिरंगी फुले हे सर्वाना आकर्षित करतात. तसेच लहान मुलांना खेळायला बागेमध्ये एक छोटेसे मैदान असते. बागांमध्ये झुले सुद्धा असतात. काही लोक हे सकाळ – संद्याकाळी बागेमध्ये फिरायला जातात.

बागेमध्ये जाऊन लहान – थोरांना खूप मजा वाटते. त्याच बरोबर त्या बागेमध्ये निसर्गाचे सौंदर्य पाहून मन खूप हलके होते. बागेतील फुलांचा सुगंध सगळीकडे पसरतो. त्यामुळे मन एकदम उत्साहित होते.

विविध “प्रकारची” झाडे

बागांमध्ये विविध प्रकारची झाडे आणि विविध फुलझाडे असतात. जसे कि गुलाब, मोगरा, जाई – जुई, सदाफुली, चमेली इत्यादी फुलांची झाडे आणि तसेच पेरूचे झाड, संत्र्याचे झाड, लिंबाचे झाड अशी विविध झाडे बागेत आढळून येतात.

सर्व झाडांना उन्हाळयात फळे लागतात. तसेच काही पक्षी हे झाडांवर आपले घरटे बांधून राहतात. त्यामुळे दररोज सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट कानी ऐकू येतो.  विविध प्रकारच्या फुलांमुळे बागेची सुंदरता आणखीनच वाढते.

बागेतील मौजमजा

काही लोकांना सुट्टी असल्यावर आपल्या जवळच्या बागेत मुलांसोबत फिरायला जातात. बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी ठेवलेली असतात.

तसेच मुलांना शाळेमध्ये बाग आणि फुलांविषयी शिकवले जाते. ज्यांना फुलांशी संबंधित पुस्तकांचे ज्ञान मिळते, त्यांना प्रत्यक्षात बागेत जाऊन त्या फुलाला पाहायला मिळते आणि ते कोणत्या प्रकारचे फुल आहे हे समजते.

काही लोक हे त्यांच्या बालकणीपेक्षा बागेचा आनंद सर्वात जास्त घेतात. प्रत्येक व्यक्तीचे मन बागेला पाहून मनमोहीत होऊन जात आणि त्याचा मनातील वाईट भावना ही दूर होऊन जाते.

बागांमध्ये स्वच्छता

स्वच्छता ठेवणे हा उद्यान स्थळांचा महत्वाचा प्राण असतो. बागांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी आजही अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. तसेच बागेमध्ये किंवा उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांवर काही बंधने ही घातलेली असतात.

बागेमधील फुलझाडे तोडण्यास सक्त बंदी असते. आजही उद्याने ही भव्य नाहीत तरीपण निसर्गाच्या सौंदर्याचा दृष्टिकोन या उद्यानांना लाभला आहे.

आजकाल मानव विकासाच्या नावाखाली काँक्रीटची जंगले तयार करीत आहे. पण छोटी बाग तयार करत नाही आहे. जर उद्यान नसतील तर मानव निसर्गातील शीतलता आणि सावलीचा आनंद नाही घेऊ शकत.

निष्कर्ष:

जर उद्यान किंवा बाग नसतील तर आपल्याला निसर्गाच्या चैतन्याचा आनंद घेता येणार नाही. तसेच निसर्ग बरोबर मानवाने सुद्धा आपल्या घरासमोर किंवा बाजूला एक छोटीसी बाग विकसित केली पाहिजे. म्हणून काही मुलांना उद्यान खूप – खूप आवडतात.

म्हणून या उद्यानांना किंवा बागांमध्ये तजेलदारपणा राखण्यात आणि सुरक्षित ठेवण्यात सर्व नागरिकांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

Updated: नवम्बर 19, 2019 — 1:10 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *