प्रस्तावना:
आपल्या भारत देशात हिंदू धर्माचे अनेक सण हे साजरे केले जातात. त्यापैकी गणेश चतुर्थी हा महाराष्ट्राचे साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे.
गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव सुद्धा आहे.
भारतीय समाजामध्ये सर्व लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सण सुरु केला. महाराष्ट्रामध्ये या सणाला सर्वात लोकप्रियता मिळाली.
गणेशोत्सव
मन खंबीर करणारा, संतोष वृत्ती ठेवण्याची आणि सर्व लोकांना एकत्र आणणारा किंवा एखाद निमित्त मात्र कारणही निर्माण करून त्यातून आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी तसेच बंधुभाव निर्माण करणारा गणेश चतुर्थी हा सण खूप महत्वाचा वाटतो.
गणेश चतुर्थी सण केव्हा सण साजरा केला जातो –
हिंदू धर्मच आराध्य दैवत – श्री गणेश. भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला येणारा गणेश उत्सव हा हिंदू धमाचे लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात.
गणपती ही बुद्धीची देवता असून प्रत्येक कार्याच्या अगोदर त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. गणेश चतुर्थी हा सण आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण घेऊन येतो.
गणपतीची जन्मकथा
एकदा पार्वती माता याना स्नान करायला जायचे होते. परंतु बाहेर कोणीच नसल्याने तिने मातीची मूर्ती करून जिवंत केली आणि पहारेकरी म्हणून त्याला आतमध्ये कोणी न येण्यास परवानगी दिली आणि पार्वती माता स्नान करण्यास निघून गेली.
परंतु काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. पहारेकराने त्यांना रोखले. म्हणून भगवान शंकरानी संतप्त होऊन पहारेकऱ्याचे शिरच उडवले. त्यानंतर पार्वती माता स्नान करून आल्यावर पाहताच पहारेकऱ्याला मारलेले पाहताच ती संतापली.
तेव्हा भगवान शंकरानी गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन कोणत्या तरी प्राण्याचे शिर कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. आणि त्याचे डोके कापून घेऊन आला. भगवान शंकरानी ते डोके त्या पुतळ्याला लावले आणि जिवंत केले.
हा पार्वती मातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन ( मुख ) म्हणजे गजानन होय. भगवान शंकरांच्या गणाचा ईश म्हणजे गणेश असे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता म्हणून चतुर्थीस गणेश चतुर्थी असे महत्त्व आहे.
गणेश मूर्तीचे पूजन
गणेश चतुर्थी हा सण ११ दिवसांचा असतो. महाराष्ट्रात हिंदू लोकांच्या प्रत्येक घरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. ही मूर्ती मातीची बनवलेली असते. मूर्तीची स्थापना केल्यानंतर मूर्तीचे पूजन केले जाते. गणपतीला दुर्वा आणि लाल रंगाची फुले आवडतात.
फुले, गंध, दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती केली जाते. भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवळ असते. विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामुळे गणपतीला सोळा पत्री अर्पण करण्याची प्रथा आहे.
गणेशाची नावे
शंकर आणि पार्वती यांचा पुत्र म्हणून शिवहर, पार्वतीपुत्र अशी नावे पडली आहेत. तसेच गजमुख, एकदंत, वक्रतुंड, सिद्धिविनायक, लंबोदर, वरदविनायक, गजानन, मोरेश्वर इत्यादी अनेक नावे आहेत.
गणेश विसर्जन
गणेश चतुथीच्या ११ व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन केले जाते. गणरायाच्या विसर्जनावेळी प्रत्येकाचं मन एकदम भावुक झालेल असत. दहा दिवस एखादा पाहून आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परंतु निघावा असं होत.
अनंत चतुर्थीचा दिवस है बाप्पाचा निरोप घेण्याचा सर्वात कठीण क्षण असतो. पहले जड़ होतात आणि कही लहन मुले रडतना सुद्धा दृष्टीस पडतात. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या असा जयघोष घुमत असतो.
निष्कर्ष:
आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच या सणामागची खरी भावना आहे. तसेच सामाजिक एकोपा वाढवून आपल्या विचारांची देवाण – घेवाण करणे यासाठी प्रयत्न करायला हवा.