प्रस्तावना:
पाहिला पाऊस हा सर्वानाच आवडतो. पावसाच्या त्या सारी मनाला एक सुखद आनंद देऊन जातात. निसर्गाची हि देणं आपल्याला खूप काही देऊन जाते. या पावसावर किती कविता केल्या आहेत.
पहिला पाऊस
मी महिन्याच्या त्या तापलेल्या सूर्याच्या किरणातून आपण कधी पाऊस पडेल याची वाट पाहत असतो. घामाने हाश हूश करत असतो. घराबाहेर पडायला सुद्धा विचार येतो. कि जावे कि नाही. हे जीवघेणे गर्मीचे वातावरण कधी संपणार याकडे आपण लक्ष लावून असतो.
जून महिना सुरु होताच वातावरणात थोडासा बदल झालेला दिसतो. वातावरण थोडेसे हवामाय आणि ढगाळ झालेले दिसते. आणि त्यातच ती पावसाची पहिली सर जेव्हा पडते तेव्हा जो आनंद होतो तो खूप मनाला वेड लावून जाणारा असतो.
जेव्हा अचानक त्या पहिल्या पावसाचा आवाज येतो तेव्हा आम्ही सर्व घराबाहेर धावतो त्या पहिल्या पावसात भिजण्यासाठी. आई ओरडते पण आम्ही कोणाचे ऐकणार आहोत का?
आपले आजी आजोबा नेहमे सांगतात पावसाची पहिली सर अंगार घेणे खूप चांगले असते. कारण उन्हाळ्यात गर्मी कोणाला अंगावर पुरळ, डाग आले असतील तर पावसाची हि पहिली सर ते सर्व घालवते. हे कितपत खरे हे माहित नाही. हा पण आम्हीला फक्त भिजायचे असते एवढेच माहित.
शेतकरी आणि पाऊस
आपण जेवढी पावसाची वाट पाहत असतो तेवडीचं आपला शेतकरी मित्र सुद्धा. कारण जर पाऊस नाही पडला तर पीक कसे उगवणार. शेती कशी करणार. त्याची जनावरे याना पाणी चार कसा मिळणार. आभाळाकडे डोळे लावून एखाद्या पक्ष्यासारखी वाट पाहणारा आपला शेतकरी जेव्हा पहिली पावसाची सर पाहतो , तेव्हा त्याच्या चेहऱ्याच्या तो आनंद पाहण्यासारखा असतो.
असे किती गाव आहेत जिकडे पूर्ण दुष्काळ आहे. पावसाचे पाणी तर नाहीच लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही मिळत. या सर्व आपला शेतकरी कर्जाखाली दाबून आत्महत्या करून घेत आहे. पण याला करणीभूत पण आपणच आहोत.
जर झाडे नाही तोडली तर पाऊस पडेल. जमिनी ओस पडल्या आहेत. म्हणून “नाम” सारख्या संस्था अश्या गावांना पाणी पुरवत आहेत.
पाऊस आणि आपली धरती माय
आपले तीन ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, आणि थंडी हे चार चार महिन्याचे ऋतू आहेत. हे तर आपल्याला माहित आहे. सहा महिने थंडी आणि उन्हाळा असतो, त्यामुळे हि जमीन सुखी झालेली असते. तिला पाण्याची गरज असते.
शहरणांमधे इतके प्रदूषण झाले आहे कि, त्यामुळे आणि डांबरी रस्ते यामुळे उन्हाळ्यात तर अगदी कहर होतो.
आणि हाच पाऊस चार महिने पूर्ण जमीन थंड करून टाकतो. किती फुल झाडे, मोठी मोठी झाडे याना वर्ष भर हे पाणी पुरते त्यांची मुले सुकली जातात पावसाळ्यात हि झाडे आपल्या मुळाशी पाणी साठवून ठेवतात. आपण पहिले असेल १२ हि महिने झाडे हि हिरवी गर दिसतात. हा चमत्कार आहे कि नाही.
पावसाचे दिवस
पावसामधून भिजून घरी आलो कि सगळ्यांसोबत आई गरम गरम भाजी आणि चहा घेऊन येते, तेव्हा ती मजा काही औरच असते. आणि ऑफीस ला जाताना जर चुकुन पाऊस पडला तर, त्याला शिव्या हि घालतो.
ह्याला आताच पडायचे होते. पण त्याला याचा काहीच फरक नाही पडत. तो आपले काम करत असतो. कारण त्याला त्याच्या शेतकऱ्याची गरज माहित असते.
मी तर नेहमी वाट बघते कधी जोराचा पाऊस पडतो, आणि ऑफिस ला दोन चार दिवसाची सुट्टी मिळेल. हा आनंद सर्वनाच हवाहवासा वाटतो. पण या पावसामध्ये जी गरीब लोक असतात त्यांना खूप त्रास होतो. घरात पाणी भरणे. वर्षभर नळाला पाणी येत नाही पण पावसामध्ये मात्र पूर्ण घर पाण्याने भरलेले असते. याला हसावे कि रडावे हेच नाही समजत.
सारांश:
त्याचे काम त्याला माहित आहे. कधी यायचे आणि कधी नाही. त्याचे स्वागत करा.