माझे वडील मराठी निबंध – वाचा येथै Essay on Father in Marathi

प्रस्तावना:

प्रत्त्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आई – वडिल हे खूप महत्वाचे असतात. आई – वडीलच हे आपल्या जीवनात सर्वात पहिले गुरु असतात. आई- वडिलांचे आणि मुलाचे नाते हे सगळ्यात वेगळे असते.

त्यांचे आपल्या मुलांशी खास संबंध असतात. आई ही आपल्या जीवनातील महत्वाची व्यक्ती असते आणि आई ही मायाळू, दयाळू आणि प्रेमाची मूर्ती आहे. त्याच प्रमाणे आपले वडील हे आपल्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार आहे.

वडील हे कौटुंबिक, सामाजिक आणि नैतिक जबाबदाऱ्या पार पडत असतात. एक वडील आपल्या मुलाची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि योग्य मार्गदर्शन करतात.

वडील म्हणजे काय –

Father वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात – एक म्हणजे आपले पिता आणि दुसरं म्हणजे वयाने मोठा असणे असा होतो. वडील हे घरातील कर्ते असतात. कारण संपूर्ण घराची जबाबदारी ही वडिलांवरच असते आणि त्यांचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम असते.

माझे वडील

आज का समाज का अपने माता पिता के प्रति व्यवहारमाझ्या वडिलांचे नाव मोहन आहे आणि त्यांचे वय ६० वर्ष आहे. माझे वडील हे माझ्यासाठी एक आदर्श आहेत. माझे वडील माझ्यासाठी प्रेरणाच नाहीतर माझ्यासाठी धैर्य सुद्धा आहेत.

ते माझे केवळ वडीलच नाही तर ते माझे एक चांगले मित्र सुद्धा आहेत. कारण ते मला वेळोवेळी चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी मार्गदर्शन करत असतात.

मला आज शिस्तबद्ध आणि सद्गुणी बनविण्यात माझ्या वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण मी माझ्या वडिलांना अगदी कठीण परिस्थितीत हिंमतीने काम करताना पाहिले आहे.

प्रामाणिक “व्यक्ती”

प्रामाणिक माझे वडील एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. ते आपल प्रत्येक काम कष्टाने करतात आणि प्रामाणिकपणे पार पडतात. तसेच ते आपला मौल्यवान वेळ माझ्यासाठी काढून माझ्याबरोबर वेळ घालवतात.

माझ्या समस्यांबद्दल माहिती घेतात आणि त्यांचे निराकरण करतात. माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत काहीही कमी पडू दिले नाही. माझे वडील स्वतः वेदना सहन करून कुटुंबाला कधीही दुःखी होऊ देत नाहीत.

माझ्या वडिलांनी मला नेहमीच मोठ्या माणसांचा आदर करायला शिकवले आहे. तसेच मोठ्या माणसांचे म्हणणे ऐकणे त्यांचा प्रत्येक शब्द पाळणे हे शिकवले आहे.

शिस्तीचे “प्रिय”

father माझे वडील शिस्टचे खूप प्रिय आहेत. ते नेहमी आम्हा सर्वांना शिस्तीत राहायला शिकवतात आणि ते स्वतः ही शिस्तीचे पालन करतात. माझे वडील मला शिस्त पाळण्याचा सल्ला देतात आणि त्याचे लाभ समजवून सांगतात.

ते सकाळ झाल्यापासून ते रात्रीपर्यंत त्यांची संपूर्ण दिनचर्या ही शिस्तबद्ध असते. माझे वडील सकाळी लवकर उठून आपल्या कामांना सुरुवात करतात. तसेच ते आपले प्रत्येक काम वेळेत पूर्ण करतात.

चुका सुधारण्यासाठी प्रोत्साहित

माझे वडील  कुटुंबाच्या आणि माझ्या चुकांबद्दल कधीही मारत नाहीत. परंतु त्याऐवजी ते मला आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रोत्साहित करतात.

मी निराश असतो किंवा वाईट मार्गावर चालतो तेव्हा माझे वडील मला एका मित्राप्रमाणे मला चांगल्या – वाईट या दोघांमधील फरक समजावून सांगतात. तसेच माझे वडील माझी हिम्मत बनून माझ्या पाठीशी नेहमी उभे राहतात.

पैश्यांचा योग्य वापर

वापरमाझ्या वडिलांनी मला पैशाचा योग्य वापर कसा करावा हे शिकवले आहे. कारण मी पूर्वी भरपूर पैसे वाया घालावायचो. माझ्या वडिलांनी मला पैश्यांच स्पष्टीकरण दिल्यापासून मी नेहमीच पैसे चांगल्या प्रकारे वापरतो.

निष्कर्ष:

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि, मला असे वडील मिळाले. ते माझ्या जीवनातील सर्वोत्त्कृष्ट वडील आहेत. माझे वडील हे खरंच एक आदर्श पिता आहेत. ज्यांनी मला शिकवलेल्या मार्गावर नेहमीच चालेन आणि त्यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करिन. मला माझे वडील खूप – खूप आवडतात.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *