पर्यावरण मराठी निबंध – वाचा येथै Essay on Environment in Marathi

प्रस्तावना:

मानवाचे जीवन हे संपूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहे. कारण निरोगी वातावरण हे समाज निर्माण करते. पर्यावरण हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक प्रकारची संसाधने प्राप्त होतात.

त्या सर्वांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. तसेच पर्यावरण हे मानवाच्या जीवनाचा एक मूलभूत आधार आहे. या पर्यावरणाशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही.

पर्यावरण म्हणजे काय –

पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश होय. जसे कि जमीन, हवा, पाणी, नदी – नाले, समुद्र, डोंगर, पर्वत, झाडे, प्राणी, पक्षी हे सर्व म्हणजे पर्यावरण होय.

पर्यावरणाचे महत्त्व

या पृथ्वी ग्रहावर मानवाचे अस्तित्व आहे. कारण या ग्रहावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत. तसेच येथील वातावरण इक्षुप महत्वाचे आहे. पृथ्वी या ग्रहावर वातावरणामुळे जीवन शक्य आहे.

सर्व मानव, प्राणी, वनस्पती, झाडे आणि हवामान या सर्व गोष्टी वातावरणाखाली आहेत. हे वातावरण केवळ हवामानात संतुलन राखण्याचे कार्य करत नाही तर जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवतात.

मानव आणि पर्यावरण

मानव आणि पर्यावरण हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. कारण या पर्यावरणाशिवाय मानव आपल्या जीवन जगू शकत नाही. आज विज्ञानाने खूप आविष्कार केले आहेत.

परंतु जे आपल्याला या निसर्गाने दिले आहे त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. मानवाचे जीवन हे अग्नी, आकाश, पृथ्वी, जमीन आणि हवा या पाच घटकांवर अवलंबून आहे आणि आपल्याला हे सर्व या पर्यावरणातून मिळते.

वातावरण हे केवळ आपली काळजी घेत नाही तर मानसिक शांती आणि आनंद देखील देतो. म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

मानव बुद्धिमान प्राणी

या धरतीवर मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. परंतु त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून पर्यावरणाकडून हवा तसा विकास साधून घेतला. मात्र तो त्याचे परत फेड करण्याचे विसरून गेला.

आज मानव पर्यावरणाची परतफेड ही अत्यंत वाईट प्रकारे करतो आहे. मानव आज आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे. तो आज भौतिक सुखांच्या मागे पळत आहे.

मानव पर्यावरणातील झाडांची दिवसेंदिवस तोड करत आहे. त्यामुळे अनेक प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस यांसारख्या समस्या उद्धभवत आहेत. त्याच प्रमाणे नैसर्गिक आपत्ती सुद्धा निर्माण होते.

पर्यावरण संरक्षणासाठी उपाय

मानवाने अनेक उद्योगांमधून निघणारा दूषित कचऱ्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे.

तसेच जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत.

त्याच प्रमाणे झाडे तोडण्यावर निर्बंध लावला पाहिजे.

मानवाने वाहनांचा उपयोग हा आवश्यकतेनुसार केला पाहिजे.

पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.

पर्यावरणाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.

पर्यावरण दिवस

आपल्या भारत देशात दरवर्षी लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी आणि त्या बद्दल जनजागृती करण्यासाठी ५ ते १६ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

निष्कर्ष:

आपण सर्वानी पर्यावरण विषयक जागरूक असणे आवश्यक आहे. जेव्हा या पृथ्वीवरील सर्व देश आणि देशातील लोक जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी सुजलाम – सुफलाम बनू शकते.

त्याच बरोबर आपण आपले वातावरण स्वच्छ ठेवण्याचे आपले कर्तव्य समजून घ्यायला हवे. कारण स्वच्छ वातावरणास जगल्यास निरोगी मांसव्ही निर्मिती आणि विकास होतो.

Updated: नवम्बर 19, 2019 — 11:37 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *