बाबासाहेब आंबेडकर वर निबंध – वाचा येथे Essay On Dr. Babasaheb Ambedkar In Marathi

प्रस्तावना:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटना समिती चे शिल्पकार. ज्यांनी दलित धर्माला त्यांचे एक स्थान मिळवून दिले. आज हि त्यांच्या ह्या सर्व श्रमाला आपला मनाचा मुजरा.

बाबासाहेब यांचा जन्म

बाबासाहेब यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी इंदौर येथील महू या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे आहे. बाबासाहेबांचे वडील हे इंदौर येथे इंडियन आर्मी येथे सुभेदार म्हणून कार्यरत होते. बाबासाहेब हे त्यांचे १४ वे पुत्र होते. आणि सर्वात लहान असल्याकारणाने ते खूप लाडके हि होते.

बाबासाहेब हे जातीने महार होते. म्हणून त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले नेहमीच. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. पण उच्च शिक्षण घेण्यासाठी जात  आडवी येत होती. कारण त्यासाठी फक्त उच्च स्तरावरील लोकांनाच प्रवेश दिला जात असे.

पण तरी सुद्धा या सर्व गोष्टींना न जुमानता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आणि जगासमोर एक उदाहरण ठेवले.

बाबासाहेब आणि रमाबाई यांचा प्रवास 

बाबासाहेब आणि रमाबाई यांचे लग्न १९०६ साली झाले. रमाबाई ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना रमाई म्हणून पण बोले जात. यांचे लग्न मुंबई येथील भायकला येथे संपन्न झाला. त्यांना एक मुलगाही होता त्याचे नाव यशवंत होते.

रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यानंतर डॉ बाबासाहेब यांची पण प्रकृती मध्ये पण बिघाड होण्यास सुरवात झाली. मधुमेहाने त्यांना खूप हैराण केले होते. त्यासाठी इन्सुलिन चे इंजेकशन्स त्यांना सारखे घ्यावे लागत आणि मग त्यांची ओळख एक ब्राम्हण डॉ  सविता यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यांना माई म्हणून संबोधले जात.

बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास

बाबासाहेब हे अभ्यासात खूप हुशार होते. त्यांची बुद्धी खूप कुशाग्र होती. त्यांना नेहमी परीक्षेत खूप चांगले गुण मिळत असे. १९०८ डॉ बाबासाहेबानी एल्फिस्टन येथील कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी.

त्यांच्या ह्या धैर्याला खरंच नमन आहे, कारण आता पर्यंत कोणीच उच्च शिक्षणासाठी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला न्हवता. आणि १९१२ ला त्यांनी आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

दलित आणि अस्पृश्यता ला विरोध  

बाबासाहेब हे स्वतः दलित समाजातील होते. पण दलित समाजाला किती हाल सहन करावे लागत आहे.

हे त्यांनी खूप जवळून पहिले आहे. दलित लोकांना आपल्या पाठीला झाडू बांधून आणि पाणी पिण्यासाठी हातात करवंटी घेऊनच फिरावे लागत. त्यांना किंवा त यांची सावली सुद्धा उच्च जातीतील व्यक्तीवर पडणे अशुभ मानले जात.

खाण्याचे पिण्याचे हाल. शिक्षणा पासून वंचित. स्त्रिया चे हाल होत असत. गावात कुठे जनावर जसे गाय, म्हैस मारून पडली तर ती उचलण्याचे काम या दलित समाजातील लोकांना बोलावले जात. असे तेव्हाचे दिवस होते.

बाबासाहेबानी बनविलेले संविधान

ह्या संविधानाच्या मागचा एकच उद्देश होता तो म्हणजे समाजातील अस्पृश्यता घालवणे आणि एक स्वछ समाज बनविणे. २९ ऑगस्ट १९४७ ला बाबासाहेबाना मसुदा समिती चे अध्यक्ष बनविले. मागासलेल्या आणि अनुसूचित जाती ना न्याय मिळवून देणे आणि महिलांना सुद्धा एक दर्जा मिळावा हा एक अधिकार त्यांना द्यावयाचा होता.

१२ नोव्हेंबर १९३० ला पहिली गोलमेज परिषद बसविण्यात आली. बाबासाहेबानी त्यात महत्वाचे प्रतिनिधी म्हणून होते. कारण दलित समाजाला न्याय आणि अधिकार देणे हा त्यांचा मुख्य अधिकार होता.

दलित चळवळ  

बाबासाहेबानी दलितांना न्याय मिळवीन देण्यासाठी नेहमी प्रयत्न केले. आज जर त्यांनी संविधान लिहिले नसते तर आज जी उच्च आणि नीच असे विभाजन राहिले असते. महिलांना विशेष अधिकार आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचे लाभ नसते मिळाले.

लिखित घटना, एकेरी न्यायव्यवस्था, कल्याणकारी राज्य, मूलभूत हक्कांचा समावेश, मूलभूत कर्तव्यांचा समावेश, धर्मनिरपेक्षता, एकेरी नागरिकत्व हे घटना समिती चे अधिकार होते. याचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते.

सारांश:

जर बाबासाहेबानी आपले पूर्ण जीवन समाजाला अर्पण केले. आणि जाती भेद लाथाडून लावले. तर आपण का आता जाती भेद याचा बोभाटा करावा.

Updated: March 17, 2020 — 2:03 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *