डॉक्टर मराठी निबंध – वाचा येथे Essay on Doctor in Marathi

प्रस्तावना:

ज्या प्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात त्याच प्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणून आपल्या समाजात डॉक्टरांना आदराने पाहिजे जाते आणि त्यांना विशेष स्थान देखील आहे.

डॉक्टरांना सर्वात जास्त उच्च दर्जा दिला जातो. असे म्हटले जाते की देव आणि डॉक्टर हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु आजच्या व्यावसायिक युगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात व्यावहारिक नाते निर्माण होऊ लागले आहेत.

डॉक्टरांचे कार्य

Doctor

डॉक्टरांचे सरावात महत्वाचे कार्य म्हणजे – रोगांचे निदान करणे. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा सर्वात पहिले डॉक्टर जवळ जातो. कारण अनेक वेदना आणि अन्य आजार दूर करण्यासाठी डॉक्टर महत्वाचे असतात.

डॉक्टर एक जीवन रक्षक

डॉक्टर

डॉक्टरांना जीवन रक्षणकर्ता  मानले जाते. कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. म्हणून हे आजार दूर करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.

त्यामुळे डॉक्टरांना ‘जीवन रक्षक’ म्हणतात. डॉक्टरांना कित्येक वर्ष वैद्यचीय शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. एकदा त्यांना या क्षेत्राबद्दल व्यावहारिक ज्ञान आणि सिद्धांतिक मिळाल्यानंतर ते कोणतेही कार्य हाताळण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात.

आजच्या युगात वैद्यकीय व्यवसायात भरपूर विकास झाला आहे. कारण पूर्वीच्या काळी कोणत्याही आजारावर औषधे ही उपलब्ध नव्हती. पूर्वी उपलब्ध नसलेल्या विविध आजारांवर अनेक औषधे आणि उपचार देखील विकसित झाले आहेत. आज वैद्यकीय तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे.

डॉक्टरांचे जीवन

डॉक्टर 1डॉक्टरांचे जीवन हे रोग्यांची सेवा करणे हेच आहे. कारण डॉक्टरांना कधी – कधी ऑपरेशन तर कधी – कधी बरेच तास काम करावे लागते. ते आरामात झोपू सुद्धा शकत नाहीत.

सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना बरेच तास रुग्णांवर लक्ष ठेवावे लागते. जर एखाद्या रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर त्यांना दिवस – रात्र अशी कित्येक वेळा तपासणी करावी लागते. एक डॉक्टर हा मानवाला जीवनदान देऊ शकतो.

परंतु आजच्या युगामध्ये पैसे हा सर्वात महत्वाचा झाला आहे. तसेच आजचे युग हे पैशाचे युग असे म्हटले जाते. आजच्या युगातील डॉक्टर हे जास्तीत – जास्त पैसे कमावण्यात गुंतलेले असतात.

बऱ्याच डॉक्टरांची फी इतकी जास्त असते की, गरीब आणि असहाय्य लोकांना त्या सेवेचा लाभ घेणे कठीण जाते. गरीब रुग्ण हा पैशा अभावी तळमळत असतो.

चांगल्या व जबाबदार डॉक्टरांची आवश्यकता

डॉक्टरांची आवश्यकता

आपला भारत देश हा आपल्या प्रतिभावंत गुणवत्तेसाठी ओळखला जातो. आपल्या भारतीय विद्यापीठांमध्ये दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय पदव्या या जगातील बऱ्याच भागांमध्ये मान्य नसल्यामुळे आपल्या देशातील अनेक विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात.
तसेच आपल्या देशात आरोग्य सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच एक चांगला व जबादार डॉक्टर असणे गरजेचे आहे.

डॉक्टर कसे बनावे

डॉक्टरf

बरेचसे विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन डॉक्टर बनण्याची आशा बाळगतात. या दिशेने जाण्याची पहिली पायरी म्हणजे देशभरातील खासगी वैद्यकीय आणि सरकारी संस्थांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी दरवषी राष्ट्रीय पात्रता असणे आवश्यक आहे.

तसेच ही परीक्षा देण्यासाठी ११ वी आणि १२ वी चे शिक्षण घेत असताना भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र हे प्रमुख विषय असले पाहिजेत.

निष्कर्ष 

डॉक्टरांच्या संपूर्ण जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे – मानव जातीची सेवा करणे. तसेच रुग्णांना होणार त्रास कमी करणे. परंतु आज देशात वैद्यकीय सुविधा पाहून खूप दुःख होत आहे.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रत्येक डॉक्टरने जबाबदारीने आपले कार्य पूर्ण केले पाहिजे. तसेच या व्यवसायाबद्दल असणारी निष्ठा जपली पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *