प्रस्तावना:
दिवाळी हा हिंदू धर्माचा एक महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. सर्व धर्माचे लोक दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. दिवाळी या सणाला दिपावली असे सुद्धा म्हटले जाते.
दिवाळी हा सण प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. असे म्हटले जाते कि, दिवाळी हा सण रोषणाई, उल्हास, उत्साहाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला सण आहे.
दिवाळी शब्दाचा अर्थ –
दिवाळी व दिपावली हा शब्द दोन शब्दांनी तयार झालेला आहे – दिप + आवली. दिप म्हणजे दिपक आणि आवली म्हणजे ओळी. दिवाळीचा अर्थ होतो – दिव्याच्या पंक्ती किंवा ओळी.
दिवाळी कधी साजरी केली जाते –
दिवाळी का साजरी केली जाते –
म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या वासियांनी तुपाचे दिपक लावून त्यांचे स्वागत केले होते. हे तिघे ज्यादिवशी परत आले होते ती अमावस्येची रात्र होती. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला प्रकाशाने उधळून टाकले होते.
दिवाळी कशी साजरी केली जाते –
हिंदू धर्मामध्ये रांगोळीला शुभ मानले जाते. तसेच घरात चारही बाजूना तेलाचे दिपक एका रांगेत ठेऊन सजवले जाते. दिवाळी सणाच्या वेळी लोक मिठाई, कपडे आणि अन्य वस्तू खरेदी करतात. तसेच आभूषणाच्या दुकानावर सुद्धा मोठी गर्दी असते.
दिवाळी हा सण
दिवाळी हा सण प्रामुख्याने ५ दिवसांचा सण आहे. हा सण ५ दिवस साजरा केला जातो.
धनत्रयोदशी
नरक चतुर्थी
दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थीच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवसाला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते.
यादिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून हा दिवस नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो.
दिवाळी – लक्ष्मीपूजन
यादिवशी सर्वजण मोठ्या थाटामाटात आणि रिती – रिवाज, परंपरेनुसार माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. तसेच यादिवशी लहान – थोर माणसे फटाखे फोडून आपला आनंद व्यक्त करतात.
पाडवा
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी बहुतेक लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा करतात. गावातील माणसे ही घरातील गाय, बैल आणि म्हशी इ. ना सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न देतात.
भाऊबीज
दिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊबीजच्या रूपाने साजरा केला जातो. हा दिवस भाऊ – बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि नात्याला जोपासणारा असतो.
तसेच यादिवशी बहिण आपल्या भावाला दिव्याची आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्याच्या समृद्धी आणि भरभराटीची शुभकामना करते. भाऊ आपल्या बहिणीला उपहार देऊन खुश करतो.
निष्कर्ष:
आमचा भारत एक असा देश आहे, जिथे विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकसाथ एका बंधनात राहून भारत देशातील सर्व सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात.