प्रस्तावना:
आपला भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये वेगवेगळे सण हे भिन्न – भिन्न समाजाद्वारे रीती – रिवाज आणि परंपरेनुसार साजरे केले जातात.
त्या सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वांचा आवडता सण आहे आणि सगळी माणसे या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात.
दिवाळी हा एक हिंदू धर्माचा प्रमुख आणि महत्वाचा सण आहे. दिवाळी या सणाला ‘दिपावली’ असे सुद्धा म्हटले जाते. तसेच हा आनंद आणि प्रकाशाचा सण आहे.
दिवाळी हा सण भारतीय हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. तसेच हा सण भारत देशात विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
दिवाळी शब्दाचा अर्थ –
दिवाळी केव्हा साजरी केली जाते –
दिवाळी का साजरी करतात –
म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्यावासिनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले होते. हे ज्या दिवशी परत आले होते ती काळोखाची म्हणजेच अंधाराची रात्र होती. या अंधाऱ्या रात्रीला दिव्याच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
दिवाळी कशी साजरी केली जाते –
त्याच प्रमाणे दुकानदार सुद्धा आपले दुकानाची साफ – सफाई करिन दुकानाला रंगीन करतात.
दिवाळी हा सण येताच सर्व बाजारपेठ या चमकत असतात आणि आकर्षक दिसतात. तसेच सर्व दुकाने ही अन्य वस्तुंनी भरल्या जातात.
सर्व माणसे दिवाळीच्या आदल्या दिवशी नवीन कपडे खरेदी करतात. त्याच प्रमाणे फटाके सुद्धा खरेदी करतात.
दिवाळीच्या दिवशी सर्व महिला आपल्या घरासमोर रांगोळी काढतात.
दिवाळी सणाचे महत्त्व
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व माणसे ही नवीन सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते.
दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला छोटी दिवाळी सुद्धा म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
दिवाळीचा तिसरा दिवस मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. तसेच सर्व लोक फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात. त्याच बरोबर एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडवा म्हणून साजरा करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णने गोकुळला वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वताला आपल्या एक उंगलीवर उचलले होते.
तसेच दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीजच्या रूपाने साजरा केला जातो. हा दिवस भाऊ – बहिणीच्या अतूट प्रमाचा आणि नात्याला जोपासणारा दिवस आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या समृद्धीसाठी कामना करते.
निष्कर्ष:
दिवाळी हा सण अंधार मिटवून संपूर्ण वातावरणाला प्रकाश देणारा सण आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने संपून भारतभर साजरा केला जातो. आपण सर्वानी दिवाळी हा सण प्रदूषणमुक्त साजरा केला पाहिजे.