गाय

गाय वर निबंध – येथे वाचा Essay on Cow in Marathi 

Photo of author

By Vinod Tiwari

भारत देशामध्ये अन्य प्रकारचे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी पाहायला मिळतात. त्या सर्व पाळीव प्राण्यांपैकी गाय हि एक पाळीव आणि सस्तन प्राणी आहे. गाईला हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे. तसेच तिला गोमाता म्हणजे आपली आई असेही म्हटले जाते. गाय हि अतिशय उपयुक्त आणि गर्जुती प्राणी आहे. प्राचीन काळापासून देवी म्हणून गाईची पूजा केली जाते. भारतात तिला धन लक्ष्मी म्हणून घरात आणतात. ती आकार, रंग इत्यादींमध्ये भिन्नभिन्न प्रजाती मध्ये आढळते.

गायीचे फायदे

गायीचे फायदे

गाईच्या दुधाचा वापर जगभरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि घरगुती वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जातो. गाईच्या दुधाचा उपयोग दही, मठ्ठा, पनीर. तूप, लोणी, विविध प्रकारच्या मिठाई इत्यादी पौष्टिक आणि विशाल अन्नसाखळी तयार करण्यासाठी केला जातो. गाईचे दूध आपल्याला शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवते. गाईचे शेण खत आणि इंधन म्हणून वापरले जाते. कर्क रोगासारख्या जुनाट आजाराच्या उपचारातही गोमुत्राचा वापर केला जातो. गाय निरोगी आणि पौष्टिक दूध देते. जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये हा प्राणी आढळतो. नवीन जन्मलेल्या बाळांना गाईचे दूध  चांगले निरोगी आणि सहज पचनायोग्य अन्न आहे. 

गाय हि सर्व प्राण्यांमध्ये पवित्र प्राणी आहे. गाय एक घरगुती प्राणी आहे, म्हणून ती घरामध्ये पाळली जाते आणि तसे दूध सकाळी आणि संध्याकाळी काढले जाते. गाय एका वेळी ५ ते १० लिटर दूध देते, गाईंच्या काही वेगवेगळ्या जाती देखील जास्त दूध देतात. गाईचे दूध पौष्टिक असते, आजारी आणि लहान मुलांना देखील हा अतिशय उपयुक्त आहार मानला जातो. गाईचे दूध आपल्याला मजबूत आणि निरोगी बनवते.हे संक्रमण आणि विविध रागांविरुद्ध आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते,यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती  वाढण्यास मदत होते.

गायीच्या शरीराची रचना

गाईचा स्वभाव हा खुप शांत असतो. गाय आकाराने मोठी असते. गायीची शारीरिक रचना सर्व देशांमध्ये सारखीच आढळली असली तरी गायीचा आकार आणि जातींमध्ये फरक आहे. काही गाई जास्त दूध देतात तर काही कमी देतात. गाईचे शरीर समोर पातळ आणि मागे रुंद असते. गायींना मोठे कान असतात, ज्याच्या मदतीने ती मंद आणि मोठा आवाज ऐकू शकते. गायीला दोन मोठे डोळे आहेत, ज्याच्या मदतीने ती ३६० अंशांपर्यंत देखील पाहू शकते. 

गाईला चार पाय असतात , त्यांचा मदतीने ती कठीण ठिकाणी चालू शकते. गाईला एक तोंड आहे, जे वरच्या बाजूला रुंद आहे आणि तळापासून पातळ आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर लहान केसं आहे. गायीला लांब शेपटी असते. तिला चार कासे असतात आणि त्यांची मान लांब असते. गाईला दोन मोठी शिंगे असतात, पण गाईच्या काही जातींना शिंगे नसतात.  

गाईचे धार्मिक महत्त्व

गाईचे धार्मिक महत्त्व

गाईला हिंदू धर्मात भरपूर महत्व आहे. हिंदू धर्मात गाय हि सर्वात प्रिय प्राणी आहे आणि तिला पवित्र देखील मानले जाते. गाय हि समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले आहे. हिंदू धर्मा मध्ये गाईची पूजा केली जाते. याला पवित्र समजले जाते आणि गाईची हत्या करणे हे मोठे पाप समजले जाते. गायला आईचे रूप मानले गेले आहे. प्राचीन काळी राजे – महाराजे ब्राह्मणांना सोन्या सोबत गाय  दान करत असत. कारण त्या काळी गायीला सोन्या इतकेच मूल्यवान समजले जायचे. गाईला अन्न आणि उत्पादनाचे साधन म्हणून देखील पाहिले जाते अनेक हिंदूंच्या उपजीविकेसाठी गाय आवश्यक आहे. 

आर्थिक महत्त्व

हिंदू धर्मातील  सर्व प्राण्यांना मध्ये गाईला सर्वात मोठे स्थान आहे. परंतु त्यांना आथिर्कदृष्ट्या देखील विशेष मानले जाते. गाय हि दूध, लोणी आणि तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थाचे प्राथमिक स्रोत आहे. गायीपासून मिळणारे दुग्धजन्य पदार्थ हे अनेक कुटुंबासाठी उत्पादनाचे प्रमुख स्रोत आहेत. गायीच्या चामड्याचा वापर चप्पल, बेल्ट आणि इतर उपकरणे तयार करण्यासाठी केला जातो. गायीचे शेण शेणखत तयार करण्यासाठी केला जातो. 

गायीचे अन्न

गायीचे अन्न

गायीचे मुख्य अन्न म्हणजे धान्य, हिरवे गवत आहे. गाय सर्वात प्रथम अन्न चांगल्या प्रकारे चावते आणि गिळते त्याला रवंथ असे म्हटले  जाते. काही शेतकरी गायीला कोंडा सुद्धा खायला देतात. 

गायीच्या दुधाचे विविध पदार्थ

गायीचे दूध हे सर्व श्रेष्ठ मानले जाते. तिच्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जसे कि दही, ताक, लोणी, विविध प्रकारच्या मिठाई, खोया, पनीर, आणि अन्य गोष्टी सुद्धा बनतात. गायीचे दूध पचनयुक्त असते. गायीचे दूध आपल्याला मजबूत आणि इंरोगी बनवते. तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. 

गायीचे शेण

गायीचे शेण

गायीचे शेण हे उत्तम खाद्य म्हणून वापरले जाते. ग्रामीण भागातील महिला शेणाचे चपटे गोल बनवून उन्हात सुकवतात आणि त्यांचा उपयोग पावसाळ्यात इंधन म्हणून वापर करतात. तसेच अनेक विधींमध्ये शेणाचा उपयोग केला जातो. गाईचे  शेण हे झाडांना खत म्हणून घातले जाते. गायीच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात. गायीचे गोमूत्र हे फक्त पवित्रच नाही तर त्यामध्ये अनेक आयुवेदिक औषधी गुण सुद्धा आहेत.  

निष्कर्ष

गाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून गायीच्या जीवावर संकटाचे ढग दाटून येत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक आहे. गाय हि आपल्या आई सारखी आहे. ज्या प्रमाणे आपण आईचा सन्मान करतो, त्याच प्रमाणे गाईचा  सुद्धा सन्मान केला पाहिजे. तसेच तिला कोणतीही दुखापत केली नाही पाहिजे. 

FAQs

गाय किती वर्ष जीवंत राहते?

गाय साधारणपणे २०-२५ वर्षे जीवंत राहते.

गाय किती वेळा दुध देते?

गाय दिवसतुन २ वेळा दुध  देते, सकाळी आणि संध्याकाळी.

गाय काय खाते?

गायीचे मुख्य अन्न  चारा आहे. याशिवाय गाईला अन्न म्हणून धान्यही दिले जाते.

गायीचे गर्भधारणा कालावधी किती असतो.

गायीचे गर्भधारणा कालावधी नऊ महिन्यांचा असतो.

गायला किती वर्षे दुधाचं उत्पादन होईल?

गायला वर्षभरात १०००-२००० लिटर दुध उत्पादन होईल, परंतु याचे आकडे गायच्या जाती, पोषण, आणि सेवांच्या परिस्थितीवरून बदलू शकतात.

एका दिवसात गाईला किती अन्नची गरज भासते?

एका दिवरात गाईला सुमारे चाळीस पौंड अन्नची गरज भासते.

गाईचे आयुष्य सुमारे किती वर्ष असते?

गाईचे आयुष्य सुमारे २० वर्ष असते.

गायीच्या किती प्रजाती आहेत?

गायीच्या सुमारे ८०० विविध प्रजाती आढळतात.

कोणत्या धर्मात गायीची पूजा केली जाते?

हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते.

Vinod Tiwari

Leave a Comment