भारत में भ्रष्टाचार का प्रभाव

भ्रष्टाचार मराठी निबंध – वाचा येथे Essay on Corruption in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक देशाची ओळख ही त्या देशाची संस्कृती आणि सभ्यता यामुळे होते. आपला भारत देश हा एक असा देश आहे जिथे सत्यता, प्रामाणिकपणा, अहिंसा, धार्मिकता, नैतिक मूल्य आणि मानवतावादी गुणांमुळे संपूर्ण जगामध्ये आपले सर्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

परंतु आजच्या युगात जिथे भारत देश हा आपली संस्कृती सोडून पाश्चात्त्य सभ्यता स्वीकारत आहे तिथे भ्रष्टाचार दिसून येत आहे. आज या वर्तमान युगामध्ये भारतात भ्रष्टाचाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज भारत देश एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी भरपूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु या देशासमोर वाढती लोकसंख्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या अनेक समस्या आहेत.

भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ –

भ्रष्टाचार विरोधी दिवस

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट आणि आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण होय.

भ्रष्टाचार या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे एक असे आचरण जे कोणत्याच प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे. भ्रष्टाचार हा न्याय, धोरण, सत्य, धर्म, सामाजिक, मानवी आणि राष्ट्रीय मुल्ल्यांच्या विरोधात कार्य करतो.

भ्रष्टाचाराचे प्रकार

corruption

भ्रष्टाचार हा काही नवीन नाही आहे. हा प्राचीन काळापासून हळूहळू देशात आणि समाजात असलेले एक विष आहे. मुघल साम्राज्यापासून आपल्या देशात भ्रष्टाचार हा अस्तित्वात आहे.

भ्रष्टाचार हा मानवी जीवनाला भ्रष्ट करतो आणि मानवाच्या मनातून मानवता आणि नैसर्गिकता नष्ट करतो. आज भ्रष्टाचार हा कोणत्या क्षेत्रात नाही असा नाही. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार हा दिसून येतो. मग ते शिक्षण असो, खेळ असो किंवा राजकारण असो.

आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार हा एकदम खोलवर जाऊन रुजला आहे. यामुळे लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या या समजत नाही आहेत. काही लोक हे आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी चोरी, बेईमानी, शोषण, घोटाळा अशा गोष्टी स्वीकारतात.

भ्रष्टाचाराचे परिणाम

भ्रष्टाचार का बढ़ता प्रभाव

 

भ्रष्टाचार हा देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पसरला आहे. जसे की आपल्या देशामध्ये ढोंगी बाबा आहेत आणि रस्ता, इमारत किंवा पुलाचे काम करणारे कंत्राटदार असो या सर्वांमध्ये आपल्याला भ्रष्टाचार हा दिसून येतो.

भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी धर्म, पंथ आणि श्रद्धा या सर्वांच्या नावाखाली लोकांचे शोषण केले जाते. सरकारी कार्यालयांमध्ये पैसे दिले नाहीत तर कोणतेही काम पूर्ण होत नाही. काही लोक हे पैशांसाठी तसेच मोठे कर्मचारी आणि नेते हे चुकीच्या गोष्टी पास करतात.

त्याचा सर्वात जास्त परिणाम हा सामान्य जनतेवर होतो. भ्रष्टाचार कमी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे आज भ्रष्टाचार हा प्रत्येक व्यक्तीची सवय बनली आहे.

भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय

भ्रष्टाचार विरोधी दिवस

भ्रष्टाचार रोखण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा करणे. भ्रष्टाचार हा देशद्रोहा सारखाच आहे. तसेच हा फार मोठा गुन्हा आहे. ज्याचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होतो.

देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. जर भ्रष्टाचार हा असाच वाढत राहिला तर आपल्या देशाचा विकास होणार नाही. तसेच सरकारने देशातील वाढती लोकसंख्या कमी कर्णयसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.

निष्कर्ष:

भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपण सर्वानी हे लक्षात ठेवले पाहिजे की, भ्रष्टाचार हा केवळ आपल्या वर्तमानातच नव्हे तर आपल्या भविष्याचे सुद्धा नुकसान करील.

म्हणून भ्रष्टाचाराची समस्या थांबविण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र मिळून काम केले पाहिजे. तसेच भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. त्याच प्रमाणे आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त केले पाहिजे. तरच या भ्रष्टाचाराचा अंत होईल.

Leave a Comment