भ्रष्टाचार मराठी निबंध – वाचा येथै Essay on Corruption in Marathi Language Pdf

प्रस्तावना:

प्रत्येक देश हा आपल्या संस्कृती आणि सभ्यता यामुळे ओळखला जातो. त्याच प्रमाणे भारत देश हा सत्य, प्रामाणिकपणा, धार्मिकता, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी या सर्वांमुळे जगप्रसिद्ध आहे.

परंतु आज भारत देशाला भ्रष्टाचार सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बऱ्याच विकसित आणि विकसनशील देशांनी प्रगती केली आहे आणि करीतही आहेत.

परंतु आजही कुठे ना कुठे तरी भ्रष्टाचार हा दिसून येतोच. भारताला काही वर्षांपूर्वी सोन्याचा पक्षी किंवा सुवर्ण पक्षी या नावाने ओळखले जात होते. अशा या सुवर्ण पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात भ्रष्टाचाराचे मूळ पसरले आहे.

आज भारत देशात अनेक लोक हे भ्रष्टाचारी बनले आहेत. भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक असतो.

भ्रष्टाचार अर्थ –

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण. जे असे आचरण असते जे नेत्यानी प्रकारचे अनैतिक आणि अयोग्य असते.

जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरोधात जाऊन स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे चुकीचे आचरण स्वीकारते त्याला भ्रष्टाचार असे म्हटले जाते.

भ्रष्टाचाराची कारणे

आपल्या भारत देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे. त्याची अनेक कारणे आहेत आणि ती कारणे खालीलप्रमाणे:

नोकरीचा अभाव

आज देशामध्ये काही लोक अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी न मिळाल्यामुळे ते बेरोजगार होतात. आज देशात नोकरीस पात्र असलेल्या तरुणांनाही संख्या खूप कमी आहे.

तर काही तरुण हे आपल्या पात्रतेनुसार नोकरी प्राप्त करतात. काही बेरोजगार लोकांमध्ये असंतोष आणि अधिक पैसे मिळविण्याच्या हेतूने ते भ्रष्ट पद्धतीचा अवलंब करतात.

शिक्षणाचा अभाव

तसेच सुशिक्षित लोकांना सुद्धा भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. जर काही लोक हे शिक्षित नसतात त्यामुळे ते आपला उदर निर्वाह कारण्यासाठी अयोग्य आणि भ्रष्टाचारी प्रद्वत स्वीकारतात. त्यामुळे आपल्या भारत देशातील कमी वर्ग शिक्षणाचे महत्त्व कमकुवत करते आणि भ्रष्टाचार वाढतो.

लोभ आणि असमानता

असमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे एखादा व्यक्ती हा भ्रष्टाचारी बनतो. आज माणसाच्या मनात स्वार्थीपणा हा वाढला आहे.

काही लोक हे इतके स्वार्थी झाले आहेत कि, त्यांना आपल्या नातेवाईकां आणि मित्रांपेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते आपला स्वार्थ किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करतात.

भ्रष्टाचार “रोकण्याचे” उपाय

भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोगासारखा आहे. जर हा एखाद्या देशाला किंवा समाजाला लागला तर त्या देशाचे आणि समाजाचे संपूर्ण जीवन नष्ट करू शकतो.

भ्रष्टाचाराला रोकण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने देशातील प्रत्येक बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त, शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्याच प्रमाणे देशात काळा पैसा वापरणाऱ्या लोकांवर कठोर कायदे केले पाहिजेत. जो पर्यंत हे थांबणार नाही तो पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही.

निष्कर्ष:

आपल्या भारत देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी सरकार बरोबर देशातील प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे.

जर आपल्या देशातील भ्रष्टाराची समस्या दूर झाली तर भारत देश एक विकसनशील देशांच्या यादीत येईल. म्हणून देशाचा विकास करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी एकत्र मिळून काम करणे गरजेचे आहे.

Updated: नवम्बर 19, 2019 — 11:13 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *