swach

स्वच्छता मराठी निबंध – वाचा येथै Essay on Cleanliness in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. स्वच्छता आपल्या सर्वांना आणि वातावरणाला स्वच्छता आणि सौंदर्य निर्माण करते.

तसेच स्वच्छता ठेवणे म्हणजे विविध प्रकारचे आजार दूर ठेवण्याचे सर्वात सोपा उपाय आहे. स्वच्छतेमध्ये मानवी सन्मान, सभ्यता आणि ईश्वराचे दर्शन आहे. स्वच्छतेमुळे मानवाची सात्विक वृत्ती वाढते.

स्वच्छतेचे प्रकार

स्वच्छता की जरूरतस्वच्छता ही दोन प्रकारची असते – एक म्हणजे शारीरिक स्वच्छता आणि दुसरी म्हणजे अंतर्गत स्वच्छता. शारीरिक स्वच्छता ही आपल्याला बाहेरून स्वच्छ ठेवते आणि आत्मविश्वासाने चांगले वाटते.

परंतु अंतर्गत स्वच्छता ही आपल्याला मानसिक शांतता देते आणि कुठल्याही प्रकारच्या काळजीपासून दूर करते. आपले मन, शरीर स्वच्छ आणि शांत ठेवणे ही केवळ स्वच्छता आहे.

स्वच्छतेचे फायदे

स्वच्छ वातावरणआपण स्वच्छता ठेवल्याने आपल्याला बरेच फायदे होतात. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. प्रत्येक आजार हा आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतो परंतु खर्च सुद्धा वाढवतो.

दूषित पाण्यामुळे आपल्याला टायफाईड आणि कॉलरा यांसारख्या धोकादायक आजारांसाठी कारणीभूत ठरतो. तसेच अनेक रोगजंतू वातावरणात पसरतात. यामुळे मानवाच्या जीवनावर हानिकारक परिणाम होतो. तसेच काही ठिकाणी जास्त प्रमाणात दूषित कचरा साठलेला असतो.

या कचऱ्याचे रोग वाढविण्यापेक्षा आपण स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर वैचारिक स्वच्छता देखील आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते.

स्वच्छता अभियान

स्वच्छता की जरुरत स्वच्छतेची आवश्यकता लक्षात घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान या मोहिमेची सुरुवात केली.

ही मोहीम चालवणे फक्त सरकारचेच काम नाही आहे तर प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि स्वच्छता अभियानात आपला सहभाग देणे गरजेचे आहे. या अभियाना अंतर्गत सर्व शहरे आणि गावे ग्रामीण भागात स्वच्छतेला चालना मिळाली आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश भारत देशातील प्रत्येक शहर आणि गाव हा हागणदारी मुक्त व्हायला हवा. तसेच सर्वांचे लक्ष्य भारतातील स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हे आहे.

आरोग्य हीच संपत्ती

ग्रामीण क्षेत्रों में स्वच्छता अभियानअसे म्हटले जाते की, आरोग्य हिच खरी संपत्ती आणि आरोग्य हेच सर्वकाही आहे. म्हणून आपण सर्वानी सर्वात प्रथम आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे.

स्वच्छतेचे महत्त्व

स्वच्छ विद्यालयएखादी व्यक्ती लहान किंवा मोठी असो त्यांनी कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी हात धुवूनच खाल्ले पाहिजे. प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम हे पाळले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने आपले घरच नाही तर आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे.

परंतु आज मनुष्य स्वच्छतेचे महत्त्व विसरत आहे. तो आज इतका आळशी झाला आहे कि, कुठे पण कचरा टाकत आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची जागा ही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगते.

जर आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर लोक आपल्या बद्दल सकारात्मक विचार ठेवतात आणि ज्या ठिकाणी घाण असते तेथील लोक हे आपल्या बद्दल नकारात्मक विचार करतात. बरेचसे लोक हे स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत.

निष्कर्ष:

स्वच्छता भारत अभियान हे स्वच्छतेच्या दिशेने भारत सरकारने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. म्हणून आपण सर्वानी आपल्या देशाचा स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य केले पाहिजे. तरच आपले राष्ट्र पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर बनू शकते. त्याच बरोबर आपण आपल्या लहान मुलांमध्ये सुद्धा स्वच्छतेच्या थोड्या सवयी लावल्या पाहिजेत. कारण ते देशाचे भविष्य आहेत आणि चांगली सवय ही देशात बदल घडवून अणे शकते. म्हणून आपण सर्वानी स्वच्छता राखण्याचा संकल्प केला पाहिजे.

Leave a Comment