प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा प्रमुख आणि महत्वाचा सण आहे.
जसे हिंदू धर्माच्या लोकांसाठी दशहरा आणि दिवाळी या सणाचे महत्त्व आहे. त्याच प्रमाणे ख्रिश्चन लोकांसाठी नाताळ या सणाचे सर्वात जास्त महत्त्व आहे.
हा सण येशू ख्रिस्तांच्या अनुयायांसाठी पवित्रतेचे संदेश आणतो. तसेच त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आणि आदर्शांवर चालण्यास प्रेरित करतो.
नाताळ हा सण केव्हा साजरा केला जातो –
दरवर्षी आमच्या भारत देशामध्ये नाताळ हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून ख्रिस्ती बांधव नाताळ हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
नाताळ सणाचे महत्त्व
त्याच बरोबर त्यांनी सर्व प्रकारच्या दुःख आणि पीडांपासून त्यांचे तारण केले. असे मानले जाते कि, ज्यावेळी भगवान येशू यांचा जन्म झाला होता तेव्हा समाजामध्ये लोभ, द्वेष, अंधश्रद्धा आणि हिंसा इ वाईट प्रथा रूढ होत्या.
म्हणून देवाने त्यांना लोकांना पृथ्वीवर प्रकाश आणि सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी पाठविले होते. जेणेकरून लोकांमध्ये असणाऱ्या गर्व, त्रास, काळोख यांवर विजय मिळवू शकतील. म्हणून नाताळ हा असा सण आहे जो भगवान येशूसारख्या मानवतेचे रक्षण करणाऱ्या रक्षणकर्त्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात.
नाताळ सणाची तयारी
ख्रिश्चन बांधव नवीन कपडे खरेदी करतात. ख्रिसमस लोक आपल्या घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते.
बाजाराची रोषणाई
ख्रिसमस सणाच्या दिवशी बाजारपेठा या ख्रिसमस कार्ड, सुंदर चष्मा, भेटवस्तू, देखावा आणि विविध प्रकारच्या खेळण्यांनी भरलेले दिसतात. घरे आणि बाजारपेठा रंगीबिरंगी दिवे प्रकाशित करतात.
नाताळ वृक्ष (ख्रिसमस झाड )
देवदार आणि सुचीपणी झाडे ही ख्रिसमस ट्री म्हणून नैसर्गिकरित्या वापरली जातात. ख्रिसमस झाडाला सर्व प्रकारचे तारे, फुगे, लहान मुलांजे मौजे आणि भेटवस्तू इ सजवले जाते. असे मानले जाते कि, ख्रिसमस झाड हे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून नकारात्मक ऊर्जा दूर करते.
सांता क्लॉज म्हणजे नाताळबाबा
सांता क्लॉजचे वर्णन हे बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली आणि चष्मा लावलेली अशी व्यक्तिरेखा असते. तिच्या जवळ लहान मुलांसाठी भेटवस्तू देण्यासाठी एक मोठी पिशवी भरलेली असते.
निष्कर्ष:
नाताळ हा सण लोकांमधील प्रेम आणि आपुलकीचा उत्तेजन देतो. तसेच हा सण आपल्याला प्रेरणा देतो कि, अनेक संकटाच्या परिस्थिती आपण सन्मार्गाचा त्याग करू नये.