बॅडमिंटन मराठी निबंध – वाचा येथे Essay on Badminton in Marathi

प्रस्तावना:

आपल्या भारत देशात सुरुवातीपासूनच खेळाला महत्त्व दिले जात असे. आज भारत देशात अनेक प्रकारचे खेळ हे खेळले जातात. जसे की क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, हॉलीबॉल, कबड्डी, चेस इ.

तसेच काही खेळ हे जगप्रसिद्ध झाले आहेत. क्रिकेट हा भारत देशात खेळाला जाणारा सर्वात प्रमुख खेळ आहे. परंतु आज क्रिकेट या खेळ बरोबरच बॅडमिंटन हा खेळ सुद्धा आपल्या भारत देशात रुजू झाला आहे.

बॅडमिंटन खेळाचा शोध किंवा सुरुवात

Badminton

बॅडमिंटन या खेळाची सुरवात १९ व्या शतकाच्या मध्यभागात झाली. तसेच या खेळाचा शोध ब्रिटिशांनी लावला. सर्व प्रथम हा खेळ इंग्रजी सैनिकांद्वारे खेळाला जात असे.

पुन्हा येथील ब्रिटिश छावणीत हा खेळ काही कालावधीत लोकप्रिय झाला म्हणून या खेळाला ‘पुनाई’ असे म्हटले जाते. या खेळात शटलकॉक ऐवजी चेंडूचा वापर केला जात असे. सेनावृत्तीनंतर इंग्रज लोक हा खेळ आपल्या बरोबर इंग्लंडला घेऊन गेलेत.

तेथे या खेळाचे बरेच नियम बनवले गेलेत. सुरुवातीच्या काळात काही लोक हे लोकरीचा बॉल करून हा खेळ खेळत असत. त्यानंतर शटलकॉकने आपले स्थान प्रस्थापित केले.

सन १९३६ मध्ये भारत देशसुद्धा या खेळात सामील झाला. वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशन या खेळाचे आयोजन करतो आणि या खेळाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो.

बॅडमिंटन हा खेळ

Badminton 1

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी जास्त नियम नसल्यामुळे हा खेळ कोणीही खेळू शकतो. हा खेळ दोन व्यक्ती किंवा दोन संघाच्या साहाय्याने खेळला जाऊ शकतो. बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन रॅकेट आणि शटलकॉकची आवश्यकता असते.

शटलकॉक ला पक्षी देखील म्हटले जाते. कारण हे शटलकॉक पक्ष्याच्या पंखांनी बनवलेले असते. त्यामुळे ते हलके आणि वेगाने उडते.

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी एका आयताकार मैदानाची आवश्यकता असते. या मैदानाच्या मध्यभागी एक जाळी बांधली जाते.

याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे संघ उभे असतात. जेव्हा बँडमिंटन हा खेळ खेळाला जातो तेव्हा दुसऱ्या संघाच्या कोर्टात शटलकॉक टाकून गुण मिळवले जातात.

विविध स्तरावर आयोजन

Badminton

बॅडमिंटन हा खेळ जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय, राष्ट्रीय सत्र आणि आंतर राष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. या खेळामध्ये मुले आणि मुलीसुद्धा भाग घेऊ शकतात.

आपल्या भारत देशात क्रिकेट या खेळानंतर खेळला जाणारा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. आज या खेळाचे आयोजन सुद्धा केले जाते. बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने अनेक लाभ सुद्धा होतात.

बॅडमिंटन खेळण्याचे फायदे

Badminton Essay In Hindi

बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते.

तसेच आपल्याला संपूर्ण शरीराचा विकास होतो.

बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने आपली विचार करण्याची क्षमता वाढते.

त्याच प्रमाणे आपण हा खेळ खेळून लठ्ठपणावर विजय मिळवू शकतो.

बॅडमिंटन हा खेळ खेळाने हृदय विकार होत नाहीत.

बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने हाताचे आणि पायाचे स्नायू तसेच मांसपेशीं मजबूत होतात.

हा खेळ खेळाने आपल्याला कोणतेही काम करण्यास जास्त वेळ लागत नाही.

बॅडमिंटन हा खेळ खेळण्याने मन शांत होते आणि आपण आनंदी राहतो.

तसेच या खेळामुळे आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग होण्याची शक्यता कमी असते.

निष्कर्ष:

बॅडमिंटन हा एक चांगला खेळ मानला जातो. कोणत्याही व्यक्तीने हा खेळ उत्साहाने खेळला पाहिजे. तसेच बॅडमिंटन हा खेळ आपल्या मुलांना खेळण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

या खेळामुळे मानवाचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने हा खेळ खेळला पाहिजे. कारण हा खेळ खेळल्याने शरीर निरोगी राहते. तसेच आपल्या देशाचा सम्मान वाढवला पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *