डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध – वाचा येथै Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language

प्रस्तावना:

आमची भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी आहे. या भराय सारख्या पवित्र भूमीवर अनेक महान पुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी आणि समाजासाठी अनेक महान कार्य केले आहेत. त्यांनी सामाजिक कार्य करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे.

त्या सर्वांच्या सेवेचा वारसा आजही सर्व भारतीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक आणि योग्य दिशा पूर्वक ठरला आहे. अशा या सर्व महान पुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते.

जन्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकर5आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदौर येथील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते. परंतु सन १९८४ साली ते निवृत्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य होते.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर4डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान व माहिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि कुशल नेतृत्वाने दीन – दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या आणि शोषितांच्या अंधकारमे जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर3डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दलित होते. म्हणून त्यांना शाळेत जाती भेदभावाला सामोरे जावे लागत असे. त्यांना शाळेत बसण्यासाठी घरातून पोते आणावे लागत असे. तसेच त्यांना शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती आणि पाण्याच्या भांड्याला देखील हात लावायला द्यायचे नाही. त्यांच्या शाळेतील चपराशी हा त्यांच्या ओंजळीत पाणी टाकून पिण्यास देत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक अन्याय सहन करत उच्चविद्या विभूषित झाले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना लहान पणापासून अभ्यासाची आवड होती. ते एक हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्यांनी सन १९०७ ला मैट्रिकची डिग्री प्राप्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९०८ ला एलफ्न्सिटन काॅलेज मध्ये प्रवेश घेऊन इतिहास घडवला. उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे हे पहिले दलित होते.

त्यांनी सन १९१२ ला मुंबई विश्व् विद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानं संस्कृत शिकण्यास विरोध केल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतले. त्यांनी या महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान या विषयातून पदवी प्राप्त केली.

भारतीय “संविधानाचे” निर्माता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्षे कठोर परिश्राम घेऊन भारतीय संविधान तयार केले. म्हणून त्यांना ‘भारतीय संविधानाचे जनक’ असे म्हटले जाते. या संविधामागचा मुख्य उद्देश हा होता की, देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे.

तसेच अस्पृश्य समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे हा होता. त्याच बरोबर देशातील सर्व लोकांना सामान अधिकार आणि हक्क देणे संविधामागचा मुख्य हेतू होता.

प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर1डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त पुस्तकी पंडित नाही होते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली.

त्यांनी मानवाच्या जीवनातील दुःख, दारिद्य आणि क्लेश दूर करण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याने आपले संपूर्ण जीवन पणाला लावून रंजल्या – गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्ग, शेतकरी आणि मजूर वर्गाच्या उद्गारला समतेची मंगल वाट दाखवली आणि मानवतेची दिव्या ज्योत पेटवली.

त्यांनी सन १९५५ ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक वंदनीय व्यक्ती नव्हे तर प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती आहेत.

निष्कर्ष

डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजासाठी केलेले कार्य, समाजात दिलेले योगदान व त्यांच्या सन्मानाकरिता त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी भारत देशात आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. अशा या महान मानवाचे निधन ६ डिसेंबर, १९५६ साली झाले व अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *