डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम मराठी निबंध – वाचा येथे Essay on Abdul Kalam in Marathi

प्रस्तावना:

काळा रंग हा भावनात्मक दृष्टीने वाईट मानला जातो परंतु काळा फलक हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो. असे महान उद्गार काढणारे तसेच वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताच्या राष्ट्रपती पदावर कार्य करणारे एक थोर म्हणजे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम.

अब्दुल कलाम हे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे भारत देशातील लोकांचे ‘राष्ट्रपती’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी राष्ट्रपती पदाच्या काळात भारतीयांच्या मनात आपले मानाचे स्थान निर्माण केले.

जन्म

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एका कनिष्ठ वर्गात झाला. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव ‘जैनुलाबदिन अब्दुल’ असे होते.

त्यांचे वडील हे रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे – आणण्याचे काम करत असत. परंतु ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर अब्दुल कलाम यांनी वर्तमान पत्रे विकून आणि छोटी – मोठी कामे करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला. त्यांचे लहानपण हे खूप हलाखीचे गेले.

शिक्षण

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. ते शाळेत असताना त्यांना गणित या विषयात अत्यंत रुची होती. त्यानंतर ते तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले.

त्यांनी भौतिक शास्त्रात बी. एससी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यावेळी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांच्या बहिणीने आपले दागिने गहाण ठेऊन त्यांना पैसे पुरविले.

या संस्थेमधून त्यांनी एरोनोटीक्स चा डिप्लोमा करून नासा येथील एरोस्पेस टेक्नोलॉजीचे शिक्षण घेतले. तसेच त्यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याची इच्छा होती. परंतु ते निवडणूक परीक्षेत ९ व्या क्रमांकावर आले. तिथे आठच जागा असल्याने त्यांना नाकारण्यात आले.

अब्दुल कलाम यांचे कार्य

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा संबंध सन १९५८ ते १९६३ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी आला. त्यांनी भारतीय सेनेनसाठी हेलीकॉप्टर बनवायला सुरुवात केली. सन १९६३ साली ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यात सहभागी झाले.

इंदिरा गांधींच्या काळात ते परत क्षेपणास्त्र विकासासाठी संरक्षण संस्थेत आणि विकास संस्थेत आले. त्यापासून त्यांनी स्वदेशात क्षेपणास्त्र बनविण्याचे ठरविले. त्यांनी इस्त्रो मध्ये असताना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल या ३ प्रकल्पाचे प्रमुख झाले.

हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि सन १९८० साली रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करू लागला. हि त्यांची कामगिरी पाहून सारा भाईंनी त्यांचे कौतुक केले. त्यापुढे ते सारा भाईंचे नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई’ अवकाश केंद्राचे प्रमुख झाले.

राष्ट्रपती पदावर कार्य

सन २००२ मध्ये डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचविण्यात आले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते भारत देशाचे ११ वे राष्ट्रपती झाले. त्यांनी राष्ट्रपती पदावर २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै, २००७ पर्यंत कार्य केले.

पुरस्कार प्रदान

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवन कालावधीत अनेक पुरस्कार मिळविले. त्यांना सन १९८१ साली पद्मभूषण, सन १९९० मध्ये पद्मविभूषण आणि सन १९९८ साली त्यांना भारताच्या सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

निष्कर्ष:

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या भरीव कामगिरीने, उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावामुळे आजच्या भावी पिढीसाठी एक उत्तम आदर्श ठरले आहेत. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे एक असे नेता होते ज्यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेण्याचे कार्य केले. म्हणून त्यांना ‘मिसाईल मैन’ या नावाने ओळखले जाते.

Updated: दिसम्बर 13, 2019 — 8:02 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *