Mother Esaay in Hindi 2

आई मराठी निबंध – वाचा येथे Essay On Aai in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आई ही सर्वांच्या जीवनातही एक प्रथम, सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची व्यक्ती असते. आई ही एक मौल्यवान माणसाच्या रूपात असते. जिचे वर्णन शब्दात सांगता येणार नाही. आई हा एक खूप सोपा शब्द आहे परंतु त्या शब्दामागे अपरंपार माया दडलेली आहे.

आई हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक मूल या जगात आल्यावर सर्वात पहिल्यांदा घेत. या जगामध्ये आई – वडील हि देवाची रूपे आहेत. आईशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.

आई म्हणजे –

maa

आई म्हणजे ममता होय. तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम आहे. मायेची पाखर घालणारी ही आपली आईच असते.

आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास मानवाच्या जीवनात महत्त्व प्राप्त झाले आहे. आई ही वात्सल्याचा अविरत वाहणारा झरा आहे. आई हे दैवत साऱ्या दैवतात थोर दैवत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हृदयाच्या मखमली पेटीत आई ही दोन अक्षरे कोरलेली आहेत.

आई म्हणजे आपल्या मुलांना बालपणी जपणारी, त्यांचे संगोपन करणारी तसेच त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी म्हणजे आपला पहिला गुरु होय.

ईश्वराचं दुसरं रूप

Dadi Maa आईला ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात. कारण ईश्वर हा प्रत्येक मुलासोबत नाही राहू शकत म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे. तसेच आईचे प्रेम मिळविण्यासाठी या धरतीवर देवाने सुद्धा जन्म घेतला आहे.

आईशिवाय कोणतीही दुसरी व्यक्ती दयाळू आणि परोपकारी होऊ शकत नाही. आई ही अशा व्यक्ती आहे जी सर्व दुःख विसरून आपल्या मुलांची काळजी घेते, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते तसेच जमिनीसारखी सुपीक बनवते.

जीवनाचा आधार

माँ का महत्व

आई हा शब्द खूप मौल्यवान आहे. हा एक केवळ शब्दच नसून आपल्या जीवनाचा आधार स्तंभ आहे. कोणत्याही मुलाला आईशिवाय आपले जीवन जगणे खूप कठीण आहे.

म्हणून स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” हे वाक्य अगदी खरं आहे. कारण आपल्याजवळ खूप पैसा आहे. पण आपल्या डोक्यावर मायेन हाथ फिरवणारी आईच नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे.

आईचे जीवनातील महत्त्व

दादी माँ

आई इतके समर्पण आणि त्याग कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. आईला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. आई स्वतः अनेक वेदना सहन करून आपल्याला जीवन देते.

तरी आपल्या मुलाची प्रत्येक गरज भागवते. ती स्वतः भुकी राहते पण आपल्याला खायला देते. आई आपल्या मुलांसाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान करते. ती नेमही आपल्या व्यथा विसरून आपल्याला आनंदी ठेवते.

आईसारखं निर्भयी कोणी असू शकत नाही. कारण आपल्या समोर कोणतीही समस्या आली तर ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि संरक्षण करते.

या जगात पुरुषांना सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. परंतु सर्वात सामर्थ्यवान अशी ही आई असते. कारण अनेक संकटांचा सामना करून ती इतरांसाठी झटत असते. तसेच धैर्य, प्रेम, निर्भयता, शहाणपण, दयाळूपणा इ सर्व गुण तिच्यामध्ये असतात.

देव आणि आई

माँ के प्रति आज का सामाजिक व्यवहार

या धरतीवर आईचे प्रेम आणि आपुलकी मिळविण्यासाठी देवाने सुद्धा जन्म घेतला आहे. आईवर प्रेम स्पष्ट होताच त्याचे एक उदाहरण दिले गेले आहे, ज्यासाठी देव सुद्धा पृथ्वीवर आला आहे. या पृथ्वीवर आईचे प्रेम मिळविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला आहे. त्यांना एकाच आईचे नव्हे तर दोन मतांचे प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. यावरून असे शोषत झाले आहे की देवसुद्धा आईची पूजा करतो.

निष्कर्ष:

मातृदेव हे धरतीवर आपल्याला जीवन देणारे आणखी एक रूप आहे. या अनमोल जीवनाचे उपकार आपण कधीही परत फेडू शकत नाही. म्हणून आपण शक्य होईल तेवढी आईची सेवा केली पाहिजे. तसेच त्यांना प्रत्येक आनंद दिला पाहिजे. आई हा एक मौल्यवान पैसा आहे जर तो हरवला तर जीवनात पुन्हा कधीही सापडणार नाही.

Leave a Comment