प्रस्तावना
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी होळी हा हिंदू धर्माचा महत्वाचा सण आहे. होळी हा सण भारत देशामध्ये राहणाऱ्या विविध धर्माचे आणि जातीचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात.
होळी या सणाला रंगांचा सण म्हटला जातो. तसेच या सणाला होळी पूर्णिमा म्हणून संबोधले जाते. होळी हा एक पवित्र सण आहे. कोकणात या सणाला शिमला असे म्हटले जाते.
होळी हा सण केव्हा साजरा केला जातो
होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. झाडे – झुडपे, पशु – पक्षी आणि मनुष्य असह्य हिवाळा सोसून वसंत ऋतूची वाट बघत असतात.
या वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते आणि त्यांची वाढ होते. रंग – बिरंगी फुले उमलतात आणि वातावरण खूप प्रसन्न असते.
होळी या सणाची पौराणिक कथा
होळी कोणत्या न कोणत्या सणाच्या मागे धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक कथा असते. त्याचप्रमाणे होळी या सणामागे पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता.
होलिका ही त्याची बहिण आणि प्रल्हाद हा त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. दिवस – रात्र तो भगवान विषाणूची पूजा करायचा. परंतु हे सर्व त्याच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यांना वाटायचे कि, प्रल्हादने मला आपला भगवान मानला पाहिजे आणि माझी पूजा केली पाहिजे.
परंतु प्रल्हादाने त्यांचे म्हणन मान्य नाही केले. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला जीवे मारण्याचे ठरविले. त्यांनी प्रल्हादला आगीत जाळून मारण्याचा कात केला आणि आपल्या बहिणीला प्रल्हादाला आगीत घेऊन बसायला सांगितले.
परंतु होलीकाला देवाचे वरदान होते कि, आग तिला जाळू शकत नाही. ती प्रल्हाद घेऊन चीतेबर बसली पण त्या आगीत प्रल्हाद न जळता होलिका जाळून खाक झाली. त्या दिवसा पासून होळी या सणाची सुरुवात झाली.
होळी हा सण
होळी हा सण २ दिवसांचा सण आहे. होळीच्या पहिल्या दिवसाला छोटी होळी असे म्हटले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करतात आणि पूजा करतात.
तर दुसऱ्या दिवशी लहान – थोर रंगानी खेळतात. यादिवशी सगळी लोक एक दुसऱ्यांना गुलाल आणि अबीर लावून होळी हा सण साजरा करतात.
होळी कशी साजरी केली जाते 
होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. होळी हा सण बघण्यासाठी काही लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी जातात. कारण या ठिकाणची होळी सगळ्यात प्रसिद्ध आहे.
वज्र येथे होळीच्या दिवशी पुरुष महिलांना रंग लावतात आणि महुइल पुरुषांना काठीने मारतात. बऱ्याच ठिकाणी होळी हा सण फुलांनी खेळला जातो. मध्य भारतात रंगपंचमीला विशेष महत्व आहे.
याठिकाणी सगळी माणस एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात. तसेच काही ठिकाणी पाण्यामध्ये रंग टाकून रंगीन पाण्याने होळी खेळली जाते.
होळी हा सण खेळताना घ्यायची काळजी
होळी हा सण रंगांचा सण आहे. परंतु होळी खेळताना सावधानता पाळणे आवश्यक आहे. कारण आजकाल मिश्रण केलेल्या रंगामुळे नुकसानान सामोरे जावे लागते.
तसेच होळी दिवशी काही लोक भांग पितात. परंतु त्या भांग मध्ये अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात. अशा पदार्थांपासून सावधान राहणे गरजेचे आहे.
काही रंगांमुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते. त्यामुळे मिसळलेल्या रंगांचा वापर करू नये.
होळी खेळताना एकमेकांना सावधानतेने रंग लावावे.
निष्कर्ष
होळी हा सण सगळ्यांना असा संदेश देतो कि, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा. होळी हा सण यासाठी साजरा केला जातो, कारण या दिवशी असत्यावर सत्य का विजय झाला होता. आपण सर्वांनी मिळून या सणा मागची शिकवण आणि सुंदर संदेश समजून घ्यायला हवा.
For any other query regarding the Essay in Marathi on Holi, you can ask us by leaving your comment below.