diwali 1

दिवाळी वर निबंध – वाचा येथे Essay in Marathi on Diwali

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यापैकी दिवाळी हा भारत देशाचा सर्वात महत्वाचा सण आहे. दिवाळी या सणाला दिपावली असे म्हटले जाते.

दिवाळी हा सण भारत देशामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांपैकी हिंदू धर्माचा सर्वात प्रसिद्ध सण आहे.

हा सण भारत देशातील सर्व धर्माचे आणि जातीचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात. दिवाळी सण प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे.

दिवाळी केव्हा साजरी केली जाते  Eco Friendly Diwali

दिवाळी हा सण हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. या सणादिवशी सगळीकडे दिव्यांची झगमगाट आणि लख्ख प्रकाश पाहायला मिळतो.

त्याच बरोबर रंगबिरंगी फटाखे आणि सर्वांच्या घरी विद्युत रोषणाई, आकाश कंदील पाहायला मिळतात. त्यामुळे या सणाला दिपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.

दिवाळी सण का साजरा केला जातो 

Diwali

दिवाळी हा सण सर्वात पुराना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. यादिवशी भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे आपल्या अयोध्या नगरीत १४ वर्षांचा वनवास भोगून परत आले होते.

म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या वासियांनी तुपाचे दिपक लावून त्यांचे स्वागत केले. ज्या दिवशी हे तिघे परत आले होते ती अमावस्येची रात्र होती.

दिवाळी हा सण

दिवाळी हा सण प्रामुख्याने ५ दिवसांचा सण आहे.

धनत्रयोदशी Diwali

दिवाळीच्या पांच दिवसांची सुरुवात धनत्रयोदशी ने होते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच यादिवशी अनेक लोक सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करतात. तसेच घर दिव्यांनी सजवले जाते. या दिवशी धनाची देवी धन्वंतरीचा जन्म दिवस आहे.

नरक चतुर्थी narak chaturdashi 2018 e1572952931462

दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

दिवाळी – लक्ष्मीपूजन maa lakshmii

दिवाळीचा तिसरा दिवस हा मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पांच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस आहे. यादिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीगणेश आणि माता सरस्वती यांही पूजा केली जाते.

तसेच यादिवशी लहान – थोर माणसे फटाखे फोडून आपला आनंद व्यक्त करतात. त्याच प्रमाणे सगळ्यांना दिवाळीच्या शुभकामना दिल्या जातात. यादिवशी अनेक दुकांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

पाडवा gowardhan pooja

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याच्या रूपाने साजरा केला जातो. यादिवशी भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्राच्या क्रोधाने होणाऱ्या पावसाला गोकुळला वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळी वर उचलले होते. यादिवशी ग्रामीण भागात गाय, बैल आणि म्हशी यांना सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला दिले जाते.

भाऊबीज bhaubij

दिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊबीज या रूपाने साजरा केला जातो. हा दिवस भाऊ – बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि नात्याला जोपासणारा दिवस आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धीची आणि भरभराटीची शुभकामना करते. तसेच भाऊ आपल्या बहिणीला छानसे उपहार देऊन खुश करतात. हा दिवस रक्षाबंधन इतकाच पवित्र मानला जातो.

निष्कर्ष

दिवाळी हा एक प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. तसेच भगवान श्रीराम यांच्या जीवनावरून सर्व लोकांना असा संदेश दिला जातो कि, नेहमी सत्याचाच विजय होतो.

तसेच दिवाळी हा सण सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करतो. तसेच आपल्याला दिवाळी हा सबन प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संकल्प करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

For any other query regarding the Essay in Marathi on Diwali, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment