शेतकरी वर निबंध – वाचा येथे Essay On Farmer In Hindi

प्रस्तावना:

शेतकरी हा आपल्या देशाचा एकमेव असा व्यक्ती आहे. जो स्वतःची शेती असून सुद्धा आपल्या पेक्षा गरीब आणि हलाखीचे जीवन जगात आहे. आज थोडे शेतकऱ्या बद्दल जाणून घेऊया.

शेतकरी आणि त्याचा इतिहास

शेती हा व्यवसाय या पृथ्वीवर पहिल्या पासून चालत आलेला आहे. आपले पूर्वज सुद्धा या प्रकारची शेती करूनच आपले पोट भरत होते. शेती हा व्यवसाय पूर्वजात चालत आलेला व्यवसाय आहे. म्हणून आपल्या देशाला कृषी प्रधान देश बोलले जाते. शेती हि ग्रामीण भागात केली जाते. आपण पहिलेच असेल.

शेतकरी आणि जमीन

शेतकरी आणि जमीन याचे नाते म्हणजे आई आणि मुलाचे नाते. कारण आपला शेतकरी या धरती वर शेती करूनच आपले व आपल्या परिवाराचे पोट भरतो. जर शेतकरी नसता आपल्याला इतके सुंदर आणि पौष्टिक अन्न खायला सुद्धा मिळाले नसते. शेती, जमीन आणि पाऊस या वाचून एक शेतकरी अपूर्ण आहे. हे काही खोटे नाही.

कारण ज्या जमिनीला तो दिवस रात्र कसतो पीक काढतो त्या पिकांना जर पुरेसे पाणी नाही मिळाले तर, त्याची शेती कशी उगवेल. आणि त्या शेतीला जर पाणी नाही मिळाले तर तो आणि त्याचा परिवार याची अन्नान्नदशा होईल.

शेतकरी आणि पैसे

शेतकऱ्याला त्याच्या शेती शेती लागणारे पुरेसे खत, पाणी यासाठी त्याला पुरेश्या पैशाची सुद्धा गरज असते. म्हणून ते सावकार, किंवा बँकेकडून कर्ज घेऊन आपली शेती उपजवितात.

शेतकऱ्याचा सखा

शेतकऱ्याचे मित्र म्हणजे त्याचे बैल जे शेतात नांगर चालविण्यात त्याची मदत करतात. कारण जमीन कसण्यासाठी त्याला या बैल जोडीची गरज असते. तसे नांगर, कुदळ , फावडा हे तर त्याचे मित्र आहेतच.

संबंधित लेख:  कुत्रा वर मराठी निबंध - वाचा येथे Marathi Essay on Dog

पण जमिनींत राहणारे गांडूळ, पाखरे, शेळ्या, कोंबड्या, गाय हे पण त्याचे सख्खे दोस्त आहेत. कारण दिवस रात्र तो यांच्या सोबतच वावरत असतो. गाय त्याला दूध देते जे विकून तो काही पैसे मिळवू शकतो.

गांडूळ त्याच्या जमिनीत मातीत राहून जमीन भुसभुशीत करतो, ज्या मुले त्याला धान्य पेरणे जरा सहज होते. शेळ्या चे दूध पिऊनच त्याची मुले मोठी होतात.

आताची शेतकऱ्याची अवस्था

आता आपला शेतकरी बंधू खूप पांगळा झाला आहे. कारण आपण रोज पाहतो कि कर्जापोटी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. पण या मागचे कारण जाणण्याचा कधी प्रयत्न केला का?

आपली सरकार तर शेतकऱ्याला कर्ज तर देते, पण तरी सुद्धा शेती करणे इतके महाग झाले आहे कि, बियाणे, खत, बोरवेल खोदणे यासाठी त्याचा सारा पैसा खर्च होत आहे.

आणि त्यात आपण सर्व झाडे आणि निसर्ग याचा पूर्णपणे विनाश करत आहोत म्हणून पाऊस खूप कमी पडत आहे. जर पाऊसच नाही पडला तर शेतकरी शेती कसा करेल. जमिनी ओस पडल्या आहेत.

दुष्काळ परिस्थिती झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही विहीर सुख्या झाल्या आहेत. त्यांची मुले शाळेत जाण्या ऐवजी हातात डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन मैल मैल पाणी आणण्यासाठी भटकत आहे.

शेतकरी आणि बाजार

शेतकरी वर्षभर शेतीची मशागत करतो. धान्य पिकवितो आणि बाजारपेठेत नेऊन विकतो. आणि त्या पैशातून तो पुन्हा शेतीची लागणारी साधने आणि आपला परिवार सांभाळतो.

संबंधित लेख:  डॉक्टर मराठी निबंध - वाचा येथे Essay on Doctor in Marathi

पण बाजारपेठेत सुद्धा सावकाराने जागा घेतल्या त्यामुळे त्याचा मला हवा तसा भाव नाही मिळत. म्हणून तो हि हताश आहे.

शेतकरी आणि सरकार

आज काही संस्थांनी आता पुढाकार घेऊन शेतकऱ्याला आणि त्याच्या परिवाराला मदत करण्याचा विडा उचलला आहे. हे सर्व पाहून काही नेते सुद्धा पुढे आले आहेत. आणि आपला शेतकरी जरा आता कुठे सुरळीत मार्गावर आहे.

सारांश:

आपला देश कृषी प्रधान देश आहे. तो आपल्या शेतकरी बांधवांमुळे. तर त्याला सुद्धा आपली गरज आहे. कारण तो शेती आपल्यासाठी करतो, जर त्याने शेती व्यवसाय सोडून दिला तर आपण उपाशी मरू हे सुद्धा काही खोटे नाही

Updated: March 23, 2020 — 1:34 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *