प्रस्तावना:
आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात. तसेच भारत हा गावा – गावांचा देश आहे. या देशामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो.
खेड्यातील लोक हे शती हा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. परंतु त्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील प्रमुख म्हणजे – दुष्काळाची समस्या.
दुष्काळ ही एक अशी परिस्थिती आहे काही महिने तर काही वर्षे मुबलकी पाऊस पडत नाही त्यामुळे दुष्काळ निर्माण होतो.
ज्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते त्या भागात उपासमार आणि साथीचे रोग देखील निर्माण होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त वाढते.
दुष्काळ म्हणजे काय –
दुष्काळ म्हणजे पाण्याची कमतरता किंवा पाण्याची टंचाई. सरासरीपेक्षा कमी पाऊस होणे किंवा कमी पाऊस पडणे. तसेच पावसाच्या वितरणात फरक पडणे, पाण्याची गरज भासणे व पाण्याचा तुटवडा निर्माण होणे इ सर्व.
दुष्काळाची कारणे
दुष्काळाची अनेक कारणे आहेत. त्याची कारणे पुढीलप्रमाणे:
जंगलतोड
परंतु मानव त्या संसाधनाचा अतिवापर करत आहे. तसेच आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी मानव झाडांची तोड करत आहे. त्यामुळे सर्व जंगले ही नष्ट होत चालली आहेत. झाडे ही पाऊस पाडण्यात महत्वाचे कार्य करतात. पावसाला आकर्षित करण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीवर मुबलक प्रमाणात पाणी आणि जास्त प्रमाणात झाडे आणि वनस्पती असणे आवश्यक आहे.
परंतु मानव आज झाडे लावायच्या जागी सिमेंटची जंगले उभी करत आहे. त्यामुळे पर्यावर्णाचे संतुलन बिघडत आहे. झाडे ही माती साठवून ठेवण्याचे कार्य करतात. झाडांची तोड होत असल्यामुळे मातीची क्षमता कमी होत चाललंय आहे आणि बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पृष्ठभागावरील कमी पाण्याचा प्रवाह
पाण्याचे स्रोत हे प्रदूषित करत आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या
वातावरणामध्ये नकारात्मक बदल झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होत आहे. वातावरणात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण सर्वात जास्त वाढत चालले आहे.
त्यामुळे पृथ्वीचे तापमान जास्त प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणे बाष्पीभवन सुद्धा वाढत आहे. उच्च तापमान हे जंगलातील आगीचे मुख्य कारण आहे. यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
दुष्काळाचा परिणाम
दुष्काळाचा सर्वात जास्त परिणाम हा मानव आणि प्राण्यांच्या जीवनावर होतो. तसेच दुष्काळामुळे शेतीवर सुद्धा हानिकारक परिणाम होतो. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना काही खायला मिळत नाही आणि उपासमार होते. तसेच भाजीपाला आणि फळे यांच्या किंमती वाढतात. त्यामुळे उत्पादन कमी होते आणि मागणी जास्त प्रमाणात वाढते. याचा सर्वात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांवर होतो. कारण पिकांसाठी पाण्याची सर्वात जास्त गरज असते.
त्याच बरोबर काही उद्योग हे शेतीतील कच्च्या मालावर अवलंबून असतात. दुष्काळाचा परिणाम हा उद्योगांवर देखील होतो. जंगल तोडीमुळे आज प्राण्यांचा जीव देखील धोक्यात आला आहे.
निष्कर्ष:
मानवाने निसर्गाला कोणतीच हानी पोहचू नये आणि प्रत्येक व्यक्तीने झाडे तोडण्याच्या ऐवजी जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. तसेच वाहनांचा वापर देखील कमी प्रमाणात करावा.
तसेच प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार बरोबर देशातील सर्व लोकांनी सुद्धा कठोर पावले उचलली पाहिजेत.