Drought1

दुष्काळ एक समस्या मराठी निबंध – वाचा येथे Dushkal Ek Samasya Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपला भारत देश हा गावा – गावांचा देश आहे आणि या देशातील बहुतांश लोक हे खेड्यात राहतात. खेड्यातील लोक हे शेती हा व्यवसाय करून आपलॆ उपजीविका चालवितात. तसेच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. म्हणून या भारत देशाला एक ‘कृषिप्रधान देश’ असे म्हटले जाते.

परंतु शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील एक प्रमुख म्हणजे – दुष्काळाची समस्या.

दुष्काळ म्हणजे काय –

sukha

दुष्काळ म्हणजे पाण्याची टंचाई होय. म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस होणे किंवा कमी पाऊस पडणे. दुष्काळ ही एक अशी समस्या आहे की काही महिने आणि काही वर्षे मुबलम प्रमाणात पाऊस न पडल्याने दुष्काळाची समस्या निर्माण होते.

ज्या भागामध्ये दुष्काळाची समस्या निर्माण होते त्या भागातील लोकांना उपासमार आणि साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मृत्युदराचे प्रमाण सर्वात जास्त वाढते.

दुष्काळाची प्रमुख करणे

दुष्काळ निर्माण होण्यास अनेक प्रमुख कारणे आहेत. दुष्काळाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे:

जंगलतोड

Deforestation

दुष्काळाचे सर्वात मोठे कारण म्हणजे – जंगलतोड होय. कारण या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्व संसाधनांचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो.

परंतु मानव निसर्गातून मिळणाऱ्या संसाधनाचा अतिवापर करत आहे. मानव आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी झाडांची तोड करत आहे. झाडे ही निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहेत.

परंतु मानव झाडांची दिवसेंदिवस तोड करत आहे यामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत. झाडे ही पाऊस पाडण्यात महत्वाचे कार्य करतात.

तसेच पावसाळा आकर्षित कारण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीवर मुबलक प्रमाणात पाणी असणे आणि जास्त प्रमाणात झाडे असणे आवश्यक आहे.

कमी पाण्याचा प्रवाह

Waterfalls

मानवाला नदी – नाले, तलाव, सरोवरे, समुद्र, विहिरी इत्यादि. अनेक पाण्याच्या स्रोतांमधून पाणी मिळते. परंतु या सर्वांचा मानव दुरुपयोग करत आहे. मानव नदी – नाल्यांमध्ये तसेच तलाव यामध्ये कुडा – कचरा फेकत आहे.

त्यामुळे नदी, समुद्र यामध्ये पाण्याच्या जागी कचरा वाहताना दिसून येत आहे. पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई निर्माण होत आहे. तसेच पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे आणि दुष्काळाची समस्या निर्माण होत आहे.

ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण

animation concept of global warming of the earth burning rotating globe climate change 4k seamless loop stjib238 F0000

मानव झाडांची तोड करत आहे यामुळे अनेक प्रदूषणाच्या आणि ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होत आहे. प्रदूषण वाढल्यामुळे वातावरणात नकारात्मक बदल घडून येत आहेत.

वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डाय ऑक्सइडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान देखील वाढत आहे. उच्च तापमान वाढल्यामुळे जंगलातील आगीचे मुख्य कारण बनले आहे. यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.

दुष्काळाचे दुष्परिणाम

Drought

दुष्काळाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवाच्या आणि प्राण्यांच्या जीवनावर होतो. कारण मानवाचे संपूर्ण जीवन हे पाण्यावरच अवलंबून असते. दुष्काळ पडल्यावर मानव आणि प्राणी हे पाण्याच्या शोधात असतात.

तसेच शेती सुद्धा मुख्यतः पाण्यावरच अवलंबून असते. जर शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतीचे फार नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उपासमार करावी लागते . तसेच भाजीपाला आणि फळे यांच्या किंमती वाढतात.

निष्कर्ष:

निसर्ग ही मानवाला ईश्वराकडून मिळालेली एक सर्वात मोठी देणगी आहे. या देणगीचा मानवाने योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे.

तसेच मानवाने निसर्गाच्या नियमांनुसार चालले पाहिजे. मानवाने या निसर्गाला कोणतेच नुकसान पोहचू नये. तसेच प्रत्येक व्यक्तीने झाडे तोडण्या ऐवजी जास्तीत – जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

त्याच बरोबर वाहनाचा वापर देखील कमी प्रमाणात केला पाहिजे. प्रत्येकाने या निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे. या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.

Leave a Comment