दिव्यांचा सण दिवाळी बद्दल मराठी निबंध – वाचा येथे Diwali Festival Essay in Marathi

प्रस्तावना:

दिवाळी हा हिंदू धर्माचा एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात अनेक धर्माचे आणि जातीचे लोक हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.

भारत देशातील प्रत्येक देशवासी या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळी हा सण प्रकाश आणि दिव्यांचा सण आहे. दिवाळी या सणाला दिपावली असे म्हटले जाते. दिवाळी हा सण रोषणाईचा, उत्सवाचा, प्रेमानी आणि मानवतेच्या भरलेला सण आहे.

दिवाळी केव्हा साजरी केली जाते –

आपल्या भारत देशात दरवर्षी दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. तसेच हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो.

तसेच दिवाळी हा सण तीन हजार वर्षे जुना सण आहे. या सणाची सुरुवात ही फार प्राचीन काळापासून झाली आहे.

दिवाळी का साजरी केली जाते –

दिवाळी या सणाच्या दिवशी भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिढे १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते.हे तिघे ज्या दिवशी परत आले होते ती काळोखाची रात्र होती.

म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्या वासियांनी तुपाचे दिपक लावून त्यांचे स्वागत केले होते. दिवाळी हा सण असे दर्शवितो की, नेहमी वाईटावर नेहमी सत्याचाच विजय होतो.

दिवाळीची तयारी

दिवाळी सणाच्या काही दिवस आधी सर्व लोक आपल्या घराची आणि दुकानाची साफ – सफाई करतात. तसेच घराला आणि दुकानाला रंगीन केले जाते. दिवाळी हा सण येताच सर्व बाजारा या चमकत असतात.

तसेच दुकाने ही अन्य वस्तुंनी भरलेली दिसतात. सर्व लोक हे दिवाळीच्या आदल्या दिवशी नवीन कपडे आणि फटाके खरेदी करायला जातात. त्याच प्रमाणे सर्व महिला या सणाच्या आदल्या दिवशी घरी वेगवेगळे पदार्थ बनवतात. जसे की चकल्या, लाडू, करंज्या, चिवडा इत्यादि.

दिवाळी पाच दिवसांचा सण

दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णन पुढीलप्रमाणे:

1) दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही ‘धनत्रयोदशीने’ होते. या दिवशी नवीन भांडी आणि सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी घर दिव्यांनी सजवले जाते. याच दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते.

2) दिवाळीचा दुसरा दिवस हा ‘नरक चतुर्थी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

3) दिवाळीचा तिसरा दिवस हा ‘मोठी दिवाळी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेश, माता सरस्वती आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच हा दिवस पाच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सर्व लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फटाके लावून आपला आनंद व्यक्त करतात.

4) दिवाळायचा चौथा दिवस हा ‘पाडवा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा केली जाते. पाडव्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णने इंद्राच्या क्रोधाने होणाऱ्या पावसाला गोकुळला वाचविण्यासाठी ‘गोवर्धन’ पर्वताला आपल्या एका उंगलीवर उचललेले होते.

5) दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाव – बहिणीच्या प्रेमाच्या नात्याला जोपासणारा दिवस आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या सुख – समृद्धीसाठी प्रार्थना करते.

निष्कर्ष

दिवाळी हा सण उत्सवाचा सण आहे. तसेच हा सण आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो. त्याच प्रमाणे आपल्याला नवीन मार्गाने जीवन जगण्यास प्रेरणा देतो.

हा सण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रेरित करतो. आपण सर्वानी दिवाळी ही प्रदूषण मुक्त साजरी केली पाहिजे.

Updated: दिसम्बर 13, 2019 — 5:43 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *