दिवाली पर निबंध मराठी – वाचा येथे Diwali Essay In Marathi Wikipedia

प्रस्तावना

दिवाळी, भारत देशात सर्वात मोठा उत्सव मनला जातो. दिवाळी हे वाईट प्रती चांगल्याचा विजय प्रतीक आहे.

‘दिपावली’ हा संस्कृत शब्दापासून तयार केलेला अर्थ आहे, अगदी प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. भारतातील सगळे लोक मोठ्या आनंदाने दिवाळी सण साजरा करतात.

हा उत्सव वर्षातून एकदा येतो जो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात असतो.

दिवाळीचे महत्त्व काय आहे, दीपावली साजरी करण्याचे कारण काय आहे? भारतात दीपावली काशी साजरा केली जाते? याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

दिवाळीचे धार्मिक महत्त्व

दिवाळी साजरी केली जाते कारण या दिवशी श्रीराम आपल्या पत्नी सीतेसोबत १४ वर्षांचा वनवास करून अयोध्येत परतले.

श्रीरामांनी अयोध्येत परतल्याच्या आनंदात लोकांनी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला. रामाने राक्षस राजा रावणाचे पराभूत करून  ते आयोड्यात परतले, आणि असे सिद्ध केले  की नेह्मी वाईटावर चांगल्याचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय होतो.

भारतात दिवाळी कशी साजरा केली जाते?

दिवाळीच्या काही दिवस अगोदर पासूनच लोक हा सण साजरा करण्याची तयारी सुरू करतात. सगळ्यांचा घरात साफ सफाई सुरू होते,घरोघरी फराळ बनवायला सुरू करतात. लोकांमध्ये दिवाळी उत्साह वाढतो.

दिवाळीच्या दिवशी लोक आपली दुकाने, त्यांची घरे, कार्यालय इत्यादी वस्तू सजवतात. दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण नवीन कपड्यांवर असतो. या पाच दिवसीय महोत्सवाची सुरूवात धनतेरसपासून होते, ज्यात भाग्य, संपत्ती आणि भरभराट साजरा केला जातो.

५ दिवस असे साजरा करतात

धनतेरसच्या दिवशी लोक दागदागिने खरेदी करतात. त्यानंतर येते पाहिली अंगोळ, मराठी परंपरेनुसार लोक सकाळी पहाटे लवकर उठतात व उठणं लावून अंघोळ करतात.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन करतात, तेव्हा सगळे लोक आपल्या जवळ असलेल्या धनाची व लक्ष्मीची पूजा करतात. पाडवा साजरा केला जातो, हा दिवस पत्नी आणि पतीमधील प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. पती त्यांच्या पत्नीला भेटवस्तू देखील देतात.

अखेरीस येते भाऊभिज, भाऊबीज हा भाऊ-बहिणीचा सण. भाऊंना हिंदू धर्मातील बहिणींचे रक्षणकर्ता मानले जाते. महाराष्ट्रात भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना आमंत्रित करतात, बहिणी भावाची आरती करतात आणि त्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराला प्रार्थना करतात.

बदल्यात बंधू भगिनींना भेटवस्तू देतात.  दिवाळी ची मज्जा घराघरात आकाश-कंदील व लायटिंग लावण्याची सुरुवात होते. सर्व स्त्रिया त्यांच्या घराबाहेर रांगोळी घालतात. पूजेनंतर फटाके फोडले जातात आणि विविध प्रकारचे मिठाई आणि खाद्यपदार्थ कुटुंब आणि मित्रांमध्ये वाटून घेतले जातात.  दिवाळीसाठी विशेष तयारी केली जाते आणि दिवाळीच्या स्नॅक्स आणि मिठाईमध्ये शाकर-पेरे, करंजी, चिवडा, चकली आणि अशाच इतर पदार्थांचा समावेश केला जातो.  अनेक व्यापारी या दिवशी लक्ष्मी – श्रीमंतीचे प्रतीक मानून पैसे बाहेर देत नाहीत किंवा पैसे खर्च करत नाहीत.

दिवाळी मध्ये संपूर्ण भारत चमकतो. 

दिवाळीत फाटके वापरू नका दिवाळी दरम्यान सर्वाधिक प्रदूषण फटाक्यांमुळे होते. फटाक्यां मधील विषामुळे श्वास घेणे आणि अनेक लोक आजारही होऊ शकतात. या विषारी हवेचा श्वास घेतल्याने चक्कर येणे, मळमळणे, उलट्या आणि खोकला येऊ शकतो.  फटाक्यांमुळे केवळ मानवालाच नव्हे तर पक्षी आणि प्राण्यांना देखी धोका असतो.

फटाके न फोडता, आपल्या मुलांन सोबत दाराबाहेर दिवे लावा, आपल्या मुलांसोबत वेळ घालवा. परिसर स्वच्छ ठेवा फटाके जाळविळ्याने खूप कचरा देखील होतो. दिवाळी साजरी झाल्यानंतर रस्ते कागदी व प्लास्टिकच्या कचर्‍याने भरलेले असते.

पर्यावरणास अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आपण परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामुळे फटाके फोडणे टाळा. निष्कर्स लोक फटाक्यांवर हजारो पैसे खर्च करतात, या पैशाचा उपयोग त्याऐवजी कुणाचे आयुष्य उजळवण्यासाठी केला जाऊ शकतो. वंचितांसाठी आपण नवीन कपडे आणि भेटवस्तू खरेदी करू शकतो आणि त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य आणू शकता.  तुम्ही स्वयंसेवी संस्थांमध्येही पैसे दान करू शकतात. अश्या प्रकारे आपण आपली दिवाळी आनंद पूर्वक साजरा करू शकतो.

आपल्याकडे दिवाली निबंधाशी संबंधित इतर काही प्रश्न असल्यास आपण खाली टिप्पणी देऊन आपली क्वेरी विचारू शकता.

Updated: मार्च 11, 2020 — 8:17 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *