प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशात अनेक प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी दिवाळी हा एक हिंदू धर्माचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा सण आहे.
तसेच विविध धर्माचे आणि जातीचे लोक हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. असे म्हटले जाते की, दिवाळी हा सण रोषणाई, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, आणि मानवतेच्या भरलेला उत्सव आहे.
दिवाळी केव्हा साजरी केली जाते –
आपल्या भारत देशात दिवाळी हा सण दरवर्षी हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. आजकाल दिवाळी ही मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी केली जाते.
दिवाळी सण का साजरा करतात –
दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते.
म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्यावासियांनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले होते. हे ज्या दिवशी परत आले होते ती अमावस्येची म्हणजेच काळोखाची रात्र होती. त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले होते.
मांगल्याचे प्रतीक
दिवाळी हा सण मांगल्याचे प्रतीक मानले जाते. कारण अंधाऱ्या रात्रीला दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिप मांगल्याचे प्रतीक मानले जाते. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
तसेच पावसाळा हा ऋतू संपून आपल्या हाती नवीन पिके आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एक वेगळ्याच आनंदात हा सण येतो. शेतकऱ्यांच्या हाती सुद्धा नवीन पीक लागते, म्हणून शेतकरी सुद्धा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.
दिवाळी हा सण
दिवाळी या सणाच्या वेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. तसेच अंगणात विविध रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात.
आपल्या हिंदू धर्मात रांगोळी अत्यंत शुभ मानले जाते. त्याच प्रमाणे घरात चारही बाजूना तुपाचे दिपक ऐका रांगेत ठेऊन घर सजवले जाते. तसेच उंच ठिकाणी आकाश कंदील लावला जातो.
दिवाळी हा सण मोठ्या धुमधामात साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी घरी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे की लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या इ.
दिवाळी पाच दिवसांचं सण
दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. हा सण पाच दिवस अलग – अलग पद्धतीने साजरा केला जातो.
1) दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवीन सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते.
2) दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थी म्हणून साजरा करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हटले जाते.
3) दिवाळीचा तिसरा दिवस हा मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.
तसेच यादिवशी लहान – मोठी माणसे फटाखे फोडून आपला आनंद व्यक्त करतात. त्याच प्रमाणे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
4) दिवाळीचा चौथा दिवस हा पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हगवण श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा केली जाते. जसे कि गाय, बैल, म्हशी इ.
5) दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाव – बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि नात्याला जोपासणारा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धीसाठी आणि सुखासाठी मनोकामना करते.
निष्कर्ष:
दिवाळी हा सण प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. त्याच प्रमाणे आनंदाचा सण सुद्धा आहे.आपण सर्वानी दिवाळी सण प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.