दिवाळी मराठी निबंध – वाचा येथै Diwali Essay in Marathi Language Pdf

प्रस्तावना:

दिवाळी हा सण हिंदू धर्माचा एक महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. जो देश – विदेशात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दिपावली असे सुद्धा म्हटले जाते. दिवाळी हा सण उत्सवाचे प्रतीक मानले जाते.

असे म्हटले जाते की, दिवाळी हा सण प्रकाशाचा, रोषणाईचा, उत्साहाने आणि मानवतेने भरलेला सण आहे. हा सण संपूर्ण भारतात विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे मोठ्या आनंदाने साजरा करतात.

दिवाळीचा अर्थ –

दिवाळी किंवा दिपावली हा संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो – दिव्याच्या ओळी किंवा पंक्ती. दिवाळी हा सण प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे.

दिवाळी केव्हा साजरी केली जाते –

Eco Friendly Diwali दिवाळी हा सण दरवर्षी भारत देशात हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. तसेच हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो. दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे आणि हा सण थाटामाटात साजरा केला जातो.

दिवाळी का साजरी केली जाते –

essay on diwali pradushan 5 दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे १४ वर्षांचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्यावासिनी तुपाचे दिपक लावून त्यांचे स्वागत केले होते.

हे तिघे ज्यादिवशी परत आले होते ती अंधाराची रात्र होती. म्हणून त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.

दिवाळी सणाची तयारी

Diwali Eassy in Hindi 2 दिवाळी सणाच्या आधल्या दिवशी घराची साफ – सफाई केली जाते. काही लोक हे आपलं घर रंगीन करतात. तसेच घराची चांगल्या प्रकारे सजावट करतात.

घरी अनेक पदार्थ बनवले जातात. दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व लोक नवीन कपडे खरेदी करतात. तसेच घर आणि दुकाने हे आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांनी किंवा तोरणांनी सजवले जाते.

दिवाळी पाच दिवसांचा सण

essay on diwali pradushan दिवाळी हा सण प्रामुख्याने पाच दिवस साजरा केला जातो.जसे की,

दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवीन भांडी किंवा सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते.

दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करण्याची प्रथा आहे. या सणाची एक प्राचीन कथा आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

दिवाळीचा तिसरा दिवस हा मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सर्वात महत्वाचा दिवस असतो. या दिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. तसेच सर्व लोक फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. त्याच बरोबर एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

Diwali दिवाळीचा चौथा दिवस हा पाडवा म्हणून साजरा कला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा केली जाते. हा दिवस बलि प्रतिपदा म्हणून ओळखला जातो.

ह्याच दिवशी इंद्राच्या को पाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णने गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचललेले होते.

दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाऊ – बहिणीच्या अतूट प्रेमाचा प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच सुख – समृद्धीसाठी शुभकामना करते.

निष्कर्ष

दिवाळी हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला होता म्हणून साजरा केला जातो. तसेच दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो.

त्याच बरोबर नवीन जीवन जगण्यासाठी उत्साह प्रदान करतो. तसेच प्रत्येक व्यक्तीने दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी केली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या देशाला एक राष्ट्र न समजता घर समजून स्वच्छ आणि सुंदर ठेवले पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *