प्रस्तावना:
दिवाळी आपला मराठी सण. जो खुप उत्साहात आपण साजरा करतो. दिवाळी हि सर्वानाच आवडते. रंगानी भरलेला हा सण लहान थोर सर्वच खूप आवडीने साजरा करतात.
दिवाळीचा सण
दिवाळी चा सण हा साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्या मध्ये येतो. दिवाळी ला दीपोत्सव किंवा दीपावली सुद्धा म्हणतो. दिवाळी हा हिंदू चा सण आहे. पण सर्व जाती धर्माचे लोक हा सण साजरी करतात.
दिवाळी हा सण रंग आणि दिव्यांचा आहे. दिवाळी हि ५ दिवसाची असते. आणि सहा दिवस हे वेगळे वेगळे दिवस साजरी करतात.
म्हणजे दिवाळी चा पहिला दिवस हा वसुबारस, दुसरा दिवस धनत्रयोदशी , तिसरा दिवस नरकचतुर्थी , चौथा दिवस बलिप्रतिपदा, आणि शेवटचा दिवस भाऊबीज. आता आपण या दिवसाचे महत्व जाणून घेऊया.
दिवाळीचे पाच दिवस
वासू बारस
पहिला दिवस वसुबारस या दिवशी गायीची व वासराची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी गाय हीच त्याची संपत्ती असते. आणि त्याच्या उपजीविकेचे साधन सुद्धा म्हणून हा दिवस वसुबारस म्हणून साजरा करतात. म्हणूनच म्हणतात कि, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.
धनत्रयोदशी
दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी पाटावर लक्ष्मी मूर्ती स्थापन करून तिची पूजा केली जाते. या दिवशी देवीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो. गुजराती आणि मारवाडी समाजात हा सण धनतेरस म्हणून साजरा करतात.
नरक चतुर्थी
तिसरा दिवस नरकचतुर्दशी म्हणजेच अभ्यंगस्नान पहिली अंघोळ या दिवशी नरकासुराचा वाढ रामाने केला होता. आणि म्हणून या दिवशी सकाळी अंगाला उटणे लावून पायाखाली एक फळ फोडून नरकासुराचा वध करण्याची संकल्पना आहे. या दिवशी फटाके फोडून जल्लोष केला जातो.
या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची मूर्ती पाटावर मांडून तिच्या समोर फराळ ठेऊन नैवेद्य दाखविला जातो.
बलिप्रतिपदा
चौथा दिवस असतो बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती आपल्या पत्नी काही उपहार देतात. तसेच गावाकडे हा सण पाडवा म्हणून साजरी करतात. इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो. असे त्यांचे म्हणणे आहे.
भाऊबीज
भाऊबीज या दिवशी बहीण भावाला ओवाळते. ज्या मुलींची लग्न झालेली असतात त्या बहिणीच्या घरी जाऊन भाऊ ओवाळून घेतो.
या मागची अशी कथा आहे कि यमाची बहीण यमुना हिने त्याला आपल्या घरी अगत्याचे जेवण बनवून बोलावले होते. म्हणून हा सण साजरा करतात. बहीण भावाचे अतूट नाते यातून दिसून येते.
दिवाळी चा सण आनंदाचा
दिवाळी हा सण उल्हासाचा व दिव्यांचा आहे. घराची साफसफाई केली जाते. या दिवशी दारात सडा करून रानबिरंगी रंग वापरून मोठं मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. त्या भोवती छोट्या छोट्या पणत्या लावून त्या रांगोळीची शोभा वाढवली जाते.
फराळ बनविला जातो. सहपरिवार एकत्र येऊन फराळ करतात. चकल्या, लाडू, चिवडा, कारंजी अशी पारंपरिक फराळ तयार केली जातात. आणि आपल्या मित्रपरिवारात वाटली सुद्धा जातात.
दिवाळी दिव्यांचा सण
या नरकासुराचा वध झाला म्हणून असत्यावर वर सत्याची मात म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा एक पवित्र सण आहे. नरकासुराने ब्रह्मा कडून वरदान मागून सर्व लोकांना छळाने सुरु केले.
स्त्रियांना सुद्धा त्याने सोडले नाही. म्हणून श्री कृष्णाने राम अवतारात येऊन त्याचा वध केला म्हणून हा सण साजरी करतात.
या दिवशी दारात आकाशकंदील लावून रांगोळ्या कडून विजयाचा आनंद साजरा करतात. लहान मुले या दिवशी नवनवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतात.
या दिवशी लहान थोर सर्व एकत्र येऊन फटाके फोडतात. आनंद साजरा करतात. आपली हि परंपरा शेवट पर्यंत अशीच आपल्याला सांभाळून ठेवली पाहिजे.
सारांश:
दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी. अश्या रीतीनेच हा सण साजरा होतो.