गाय मराठी निबंध – वाचा येथै Cow Essay in Marathi

प्रस्तावना:

आमच्या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे प्राणी आढळतात. त्यापैकी काही प्राणी हे पाललिव्ह प्राणी म्हणून पाळले जातात. त्या सर्वांपैकी गाय ही एक सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा पाळीव प्राणी आहे.

तसेच गाय ही एक घरगुती प्राणी आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष स्थान आहे. म्हणून तिला गोमाता असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे वैदिक काळापासून गायीची महिला गाजत आली आहे.

गायीची रचना

गाय ही सस्तन प्राणी आहे. गायीला सहसा गोठ्यात ठेवले जाते. गाय ही स्वभावाने अतिशय कोमल प्राणी आहे. गायीचे शरीर खूप मोठे असते. गायीला चार पाय, एक लांब शेपूट, दोन सिंग, एक तोंड, एक नाक आणि एक डोकं असत. गायीला आपल्या बचावासाठी दोन शिंगे असतात.

पण कधी कोणाला मारत नाही. तसेच तिच्या झुपकेदार शेपटीचा उपयोग ती अंगावर बसणाऱ्या माश्या उडवण्यासाठी करते. गायीच्या आकारामध्ये आणि रंगांमध्ये विभिन्नता आढळून येते. गायीच्या नराला बैल, सेंड किंवा वाळू असे म्हटले जाते. तसेच गायीच्या पिल्लाना ‘पाडस’ असे म्हणतात.

गायीचे खाद्य

Eassy on cowगाय ही मुख्यतः अन्न, धान्य, हिरवे गवत, चारा आणि इतर गोष्टी खाते. गायीचा मुख्य आहार चारा व गवत आहे. काही शेतकरी गायीला कोंडा खायला देतात. गायींना विशेष प्रकारचे अन्न लागत नाही त्यामुळे तिचे पालन करायला खर्च जास्त लागत नाही.

गायीचे दूध

गायीचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. तसेच लहान मुलांसाठी गायीचे दूध हे फायदेशीर असते. गायीच्या दुधापासून दही, ताक, तूप, लोणी आणि विविध प्रकारच्या मिठाई खोल्या, पनीर यासारखे पदार्थ बनवू शकतो. तसेच गायीचे दूध हे पचण्यास आणि स्मरण शक्ती वाढवते. म्हणून असे मानले जाते कि, गायीचे दूध लहान मुलांना दिल्यास मुले चपळ होतात.

गायीचे गोमूत्र

गायीचे गोमूत्र हे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते. गायीचे गोमूत्र हे वैदिक आणि धार्मिक कार्यामध्ये वापरले जाते.

संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे कि, गायीचे गोमूत्र हे पवित्रच नाही तर त्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी गुण सुद्धा आहेत.

गाईच्या शेणाचा उपयोग

गायीचे शेण हे उत्तम प्रकारचे खत म्हणून केला जातो. ग्रामीण भागातील अनेक महिला गायीच्या शेणाचे गोल चपटे बनवून सुकवतात आणि त्याचा उपयोग पावसाळयात इंधनाच्या रूपाने करतात. तसेच शेणी या हवन सारख्या पवित्र विधींमध्ये उपयोगी येतात.

गायीचे प्रकार

आपल्या भारत देशात गायीचे ऐकूण २८ प्रकार आहेत. त्यापैकी काही आज अस्तित्वात आहेत. जसे कि हरियाणी, खिल्लारी, गीर, देवणी, डांगी, कांकरेज, कंधारी, थारपारकर, अंगोला इ जाती या विशेष प्रसिद्ध आहेत.

हिंदू धर्मात गायीला महत्त्व

हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व दिले जाते. कारण हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते. तिला भारतीय हिंदू धर्मात सर्वात जास्त पवित्र समजले जाते आणि तिची हत्या करणे पाप समजले जाते.

प्राचीन काळात राजे – महाराजे हे ब्राह्मणांना सोन्यासोबत गायी दान करत असत. त्या काली गायीला सोन्या इतकेच मूल्यवान समजले जात असे.

निष्कर्ष:

आमच्या भारत देशात प्राचीन काळापासून गायीला विशेष महत्त्व आहे. म्हणून आपण सर्वांनी गायीच्या महत्व आणि आवश्यकतेला ओळखून तिचा सम्मान करायला पाहिजे.

तसेच तिला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आमच्या भारत देशामध्ये गायीला आईला दर्जा देण्यात आला आहे.

Updated: नवम्बर 19, 2019 — 7:38 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *