भ्रष्टाचार मराठी निबंध – वाचा येथे Corruption Essay in Marathi

प्रस्तावना:

कोणताही माणूस हा जन्मताच भ्रष्ट नसतो. परंतु माणसाला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती म्हणजे हव्यास, दुर्बलता, लोभ आणि राक्षसी प्रवृत्ती त्याला भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते. आजही भारत देश हा दिवसेंदिवस एक विकसित राष्ट्र बनण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु या देशामोर अनेक गंभीर समस्या आहेत. जसे की बेरोजगारी, वाढती लोकसंख्या तसेच या सोबतच भ्रष्टाचार. आजच्या काळामध्ये आपल्या देशात भ्रष्टाचार हा सगळीकडे पसरला आहे.

आज भारतात जवळपास सर्व प्रकारच्या आयटी कंपन्या, मोठी कार्यालये, चांगली अर्थव्यवस्था असून सुद्धा भारत देश मागे आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचाराने सर्व ठिकाणी आपले घर तयार केले आहे.

मग ते समाजातील लोक असो, सरकारी कर्मचारी किंवा राजकीय नेते असोत. भारतात अशा प्रकारे भ्रष्टाचार वाढला आहे. कधी – कधी भ्रष्टाचाराशिवाय काम सुद्धा होत नाही.

भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ –

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दानी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वित आणि आचार म्हणजे आचरण. भ्रष्टाचार य शब्दाचा अर्थ होतो असे आचरनण जे कोन्त्यहि प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे.

जेव्हा एखादी व्यक्ति न्याय न्यायालयीन व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आपल्या स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करते त्याला भ्रष्ट म्हटले जाते.

भ्रष्टाचाराची कारणे

भ्रष्टाचाराची अनके कारणे आहेत.

असंतोष

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अभावामुळे त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल तर त्याला भ्रष्टाचार करण्यास भाग पाडले जाते.

संबंधित लेख:  माझी आई वर निबंध मराठी - वाचा येथे Mazi Aai Essay in Marathi

स्वार्थची भावना आणि असमानताअसमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थिती एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट बनवते. निकृष्टता आणि मत्सराचा बळी पडल्यामुळे भ्रष्टाचार स्वीकारण्यास भाग पडले जाते. त्याच प्रमाणे लाचखोरी, नातेवाईकांमधले वाद – विवाद हे सर्व भ्रष्टाचाराला जन्म देतात.

भारतातील वाढता भ्रष्टाचार

भ्रष्टाचार हा एखाद्या आजारासारखा असतो. आह हा भारत देशात जास्त वेगाने वाढत आहे. त्याच बरोबर वेगाने पसरत सुद्धा आहे.

जर याला वेळेवरच थांबले नाही तर संपूर्ण देशाला वेढेल. भ्रष्टाराचा परिणाम खूप व्यापक आहेत. आपल्या भारत देशातील असे कोणतेच क्षेत्र नाही जे त्याच्या प्रभावापासून मुक्त आहे.

भ्रष्टाचाराचे परिणाम

भ्रष्टाचार हा भारत देशात मोठया प्रमाणात पसरत आहे. जसे की ढोंगी बाबा आहेत, रस्ते, इमारत आणि पुलाचे काम करणारे कंत्राटदार आहेत या सर्वांमध्ये भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

तसेच भारत देशात बऱ्याच ठिकाणी धर्म, पंथ, श्रद्धा या सर्वांच्या नावाखाली लोकांचे शोषण केले जाते. त्याच प्रमाणे सरकारी कार्यलयांमध्ये पैसे दिले नाहीत तर काम होत नाही.

काही लोक हे पैशांसाठी, मोठे कर्मचारी आणि नेते चुकीच्या गोष्टी पास करतात. तसेच सरकारी कामासाठी सरकारी कार्यलयात काही लोक हे पैशांसाठी लोकांकडून पैसे वसूल करतात. याचा सर्वात जास्त परिणाम सामान्य लोकांवर होतो.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय

भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोग आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक दंड व्यवस्था केली पाहिजे. आज भ्रष्टाराची अशी परिस्थिती आहे की, ती व्यक्ती लाचखोरीच्या प्रकरणात पकडली जाते आणि लाच देऊन सोडण्यात सुद्धा येते. त्यामळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये प्रामाणिकपणा बाळगावा.

संबंधित लेख:  महात्मा गांधी मराठी निबंध - वाचा येथे Mahatma Gandhi Essay in Marathi

निष्कर्ष:

भ्रष्टाचार हा मानवी समाजाला लागलेला एक अभिशाप आहे. जर आपल्याला आपल्या देशाचा आणि समाजाचा विकास करायचा असेल तर छोट्या – छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली छोटीशी चूक सुद्धा भ्रष्टाचार वाढविण्यास मोठी भूमिका बजावू शकते.

मराठीत भ्रष्टाचार निबंधाविषयी काही शंका असल्यास आपण खाली आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

Updated: December 13, 2019 — 5:21 am

Leave a Reply

Your email address will not be published.