प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीने साफ – सफाई ही आपल्या घरापुरतीच आवश्यक नाही आहे तर त्याच बरोबर आपला देश सुद्धा साफ – सुथरा ठेवला पाहिजे.
स्वच्छता हा मानवी समुदायाचा एक आवश्यक गुण आहे. अन्य प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. स्वच्छता ठेवणे ही एक चांगली सवय आहे. स्वच्छता ही मानव जीवनाची एक आधारशिला आहे.
तसेच यामध्ये मानवी सन्मान, सभ्यता आणि ईश्वराचे दर्शन आहे. स्वच्छतेचा संबंध हा मानवी जीवनाशी निगडित आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता ठेवली तर शरीर स्वस्थ आणि आरोग्यदायी बनते.
स्वच्छतेचे महत्त्व
त्याच प्रमाणे आपल्या निरोगी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे.स्वच्छता ही मानवाला मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक इ सर्व प्रकारे निरोगी ठेवते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा विश्वास आहे की, जेथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते. आपल्या शास्त्रामध्ये स्वच्छतेबद्दल आणि स्वच्छता यावर बऱ्याच सूचना सांगितल्या आहेत.
आपल्या भारत देशाचे असे वास्तव्य आहे की, इतर जागांपेक्षा धार्मिक स्थळांवर जास्त प्रमाणात घाण आढळून येते. परंतु काही लोक हे स्वच्छतेचे महत्त्व जाणून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात घाण पसरवतात. निरोगी मन, शरीर आणि आत्मासाठी स्वच्छता फार महत्वाची आहे.
स्वच्छता अभियान
आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि निरोगी राष्ट्राची उभारणी करण्यासाठी २ ऑक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.
जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिक हा स्वच्छतेचे महत्त्व समजू शकेल आणि त्या प्रति जागरूक होईल. त्याच बरोबर आसपासची जागा देखील स्वच्छ राहील. विविध साथींच्या आजारामुळे होणाऱ्या सर्व आजारांचा नाश होऊ शकतो. तसेच निरोगी देश निर्माण होऊ शकतो.
आचरणात शुद्धता
आपल्या आचरणाच्या शुद्धतेमध्ये स्वच्छता खूप महत्वाची आहे. शुद्ध वागण्यामुळे माणसाचा चेहरा हा चमकदार दिसतो.
प्रत्येकजण त्या व्यक्तीकडे आदराने पाहतो. तसेच लोक त्या व्यक्तीचा आदर करतात. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे.
स्वच्छतेची आवश्यकता
स्वच्छता ठेवणे ही माणसाची नैसर्गिक गुणवत्ता आहे. जर आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला नाही तर साप, विंचु, माशी, डास आणि हानिकारक किटक हे आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. ज्यामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतील.
काही लोकांचे म्हणणे असते की, हे सर्व काम सरकारी संस्था यांचे असते. म्हणून ते सर्व जबाबदारी सरकारवर टाकतात. ज्यामुळे सर्व ठिकाणी घाण पसरते आणि अनेक प्रकारचे रोग आणि आजार निर्माण होतात.
अस्वच्छतेचे परिणाम
काही लोक हे अशा ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी कचरा पसरलेला असतो. नदी – नाल्यांमध्ये दूषित पाणी आणि कुजलेल्या वस्तू पडलेल्या असतात.
त्यामुळे त्या भागात खूप दुर्गंध वास येतो. तसेच तेथील लोक हे संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त झालेले दिसून येतात. तेथील घाणीमुळे पाणी, जमीन, हवा इ सर्व गोष्टींवर परिणाम होतो. जर स्वच्छता ठेवली नाही तर मानवाला बऱ्याच प्रकारचे रोग होऊ शकतात.
निष्कर्ष:
आपल्या देशाला स्वच्छ ठेवणे हे काम फक्त सरकारचे नाही तर देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सर्वानी एकत्र मिळून काम केले पाहिजे.
तसेच मानवामध्ये स्वच्छतेची कल्पना निर्माण करण्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती स्वच्छतेकडे झुकतो. तसेच स्वच्छता ही चालल्या आरोग्याचे मूळ आहे.