क्रिसमस त्यौहार का महत्व

नाताळ वर निबंध – वाचा येथे Christmas Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये अन्य प्रकारचे सण हे साजरे केले जातात. जसे कि दिवाळी, दसरा, होली, मकर संक्रांती, गणेश उत्सव, बकरी ईद इ. अनेक प्रकारचे सण हे साजरे केले जातात.

तसेच नाताळ हा सण ख्रिश्चन धर्माचा महत्वाचा सण आहे. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात.

नाताळ हा सण केव्हा साजरा केला जातो –नाताळ

नाताळ हा सण संपूर्ण जगभरात दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. हा सण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

या दिवशी शाळेतील मुले सुट्टीचा खूप आनंद घेतात. हा सण प्रामुख्याने १२ दिवस साजरा केला जातो. नाताळ या सणाला ‘क्रिसमस’ असे सुद्धा म्हटले जाते.

नाताळ हा सण का साजरा केला जातो – क्रिसमस त्यौहार का महत्व

नाताळचा दिवस हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी हा सण मध्यरात्री साजरा करतात. जेव्हा समाजात अंधश्रद्धा, हिंसा भरली होती तेंव्हा येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता.

म्हणून ईश्वराने त्यांना लोकांना प्रकाश आणि सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी पाठविले होते. म्हणून त्यांना ईश्वराचा लाडका पुत्र असे म्हटले जाते.

नाताळ सण कसा साजरा करतात –

क्रिसमस ट्रीनाताळ हा सण ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी सर्वात पवित्र आणि महत्वाचा सण आहे. नाताळ हा सण यायच्या आधी सर्वजण आपापल्या घरांची साफ – सफाई करतात. तसेच लोक आपल्या घरांना रंगीबेरंगी रोषणाईने सजवतात.

तसेच घरामध्ये विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात. ख्रिश्चन धर्माचे लोक यादिवशी नवीन कपडे घालतात. तसेच चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात.

असे म्हटले जाते कि, काळोख हा माणसाला भीतीदायक वाटतो जस काही तो आपला शत्रूच आहे. अशा अंधाराला दूर करण्यासाठी या दिवशी मेणबत्ती लावण्याची प्रथा आहे.

क्रिसमस ट्री

नाताळ या सणाच्या दिवशी सुचीपर्णी हा वृक्ष पागन संस्कृतीचा वृक्षपूजेचा भाग मनाला जातो. या दिवशी सुचीपर्णी वृक्षाला विशेष महत्त्व आहे. क्रिसमस ट्री सुचीपर्णी वृक्षापासून बनविलेला असतो.

त्या वृक्षाची अतिशय सुंदर प्रकारे सजावट केली जाते. हा वृक्ष दिव्यांच्या माळा याने सजवला जातो. तसेच छोट्या प्रतिमात्मक काठ्या आणि भेटवस्तू लावून हा वृक्ष सजवतात. तर काही प्रार्थना स्थळी प्रभू येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.

सांताक्लॉजक्रिसमस

सांताक्लॉज आणि निकोलस हे नाताळ सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा काल्पनिक असून त्याला ‘नाताळ बाबा’ असे म्हटले जाते. पाश्चात्त्य ख्रिश्चन संस्कृतीत ज्या मुलांची वागणूक चांगल्या प्रकारे असते त्या मुलांना नाताळ सणाच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.

सांताक्लॉजचे वर्णन-

क्रिसमस

सांताक्लॉज मध्ये लट्ठ, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, चष्मा लावलेली, लाल अन्घार्ख घातलेली व्यक्ती असते. तसेच लहान मुलांना भेवस्तू देण्यासाठी त्याच्याजवळ एक भेटवस्तू भरलेली पिशवी असते.

त्याच बरोबर या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू, फुले आणि ग्रीटींग्स म्हणजेच शुभेच्छा पत्र देऊन हा सण साजरा करतात.

दुकानांची सुंदरता

नाताळ या सणाच्या दिवशी रस्ते, घर, दुकाने, मोठमोठे मॉल्स हे सुंदर रोषणाई व आकर्षक पद्धतीने सजवले जातात.

तसेच दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेल्या वस्तूंच्या किमतीवर सूट दिली जाते. तसेच काही लोक नाताळच्या संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊन साजरा करतात.

खाद्य पदार्थ

क्रिसमस केक का महत्व नाताळ सणाच्या आदल्या दिवशी घरामध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार केले जातात. काही लोक या दिवशी आपल्या घरी केक बनवतात.

नाताळ या सणाला केकाचे भरपूर महत्व आहे. चॉकलेट आणि बिस्किटांचे घातलेले विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात.

निष्कर्ष:

अशा प्रकारे नाताळ हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. भगवान येशू यांचे जीवन अद्वितीय होते म्हणून नाताळ हा सण पवित्र सण आहे.

For any other query regarding the Christmas Essay in Marathi, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment