प्रस्तावना:
भ्रष्टाचार. जितका बोलायला भारी आहे तितकाच खूप वाईट हि आहे. कारण या मुळेच आपल्या भारत देशाचे नाव भ्रष्टाचारा मध्ये ९४ व्या क्रमांकावर आहे. याची आपल्याला थोडी तरी तम बाळगली पाहिजी.
भ्रष्टाचार म्हणजे काय?
भ्रष्ट्राचार म्हणजे तो कुठेही आणि कधीही होऊ शकतो. शाळेत, सरकारी कार्यालयात, बाजारपेठेत, कुठे हि आणि कशातही भ्रष्ट्राचार होऊ शकतो. आपल्या भारत देशाला या भ्रष्टाचाराणे कर्क रोगा सारखे ग्रासले आहे.
हा कधी बा न होऊ शकणारा आजार आहे. काही लोक आपला फायदा करून घेण्यासाठी याचा वापर करतात. ज्या भारत देशाला सोने कि चिडिया म्हणायचे ते आज भ्रष्टाचाऱ्यांच्या गटात मोजला जातो.
याला आपणच कारणीभूत आहोत. ज्या नेत्यांनी या देशाला आजादी मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आज तर ते असते तर लाजेने शरमेने त्यांची मान नक्कीच खाली झाली असती.
भ्रष्टाचार का आणि कसा
आज काल आपण पाहतो कि, लोकसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरी तर आहेच पण खाजगी कंपनी मध्ये पण चांगल्या पगारावर जर नोकरी हवी असेल तरी पैसे मागून लाच घेतात, आणि नोकरी मिळते. पण काही लोकांनी तर कहर केला आहे.
नोकरी साठी आपले तरुण तरुणी इकडे तिकडे भटकत असतात. आणि आम्ही नोकरी लावून देऊ अश्या अशा मोठ्या कंपनी मध्ये पण तिकडे पैसे भरावे लागतील म्हणून लाखो रुपये घेतात आणि पळून जातात. हे सुद्धा होते.
नेते , सरकारी अधिकारी, सुद्धा या भ्रष्टचारात सामील आहेत. एखादे पद मिळावे म्हणून पैसे देऊन माणसे विकत घेऊन आपले पद मिळवतात.
भ्रष्टचाराचे कारण
भ्रष्ट्राचाराची खूप करणे आहेत. पहिली लोक समाजसेवा म्हणून एखाद्याची मदत करायचे, पण आज ती मदत भ्रष्टाचारात मोजली जाते. आज कोणी १० रुपयाची मदत सुद्धा करत नाही आणि केली तर त्यासाठी व्याज आकारतात.
नेता निवडून येण्यासाठी जनतेला पैसे देऊन मत विकत घेतो. जो वर्ष वर्ष भर लोकांना तोंड दाखवत नाही तो मतदानाच्या वेळी घरो घरी जाऊन मते मागतो आणि ते हि लाच देऊन.
सरकारी नोकरी मिळावी म्हणून एखादा गरीब मुलगा मुलगी हवी ती मेहनत करतात. पेन तिथेच एखादा श्रीमंत बापाचा मुलगा लाच देऊन ती जागा बालकावतो. डॉक्टर ला आपण देव मानतो.
पण कायद्याने गुन्हा असून सुद्धा लिंग परीक्षण करण्यासाठी काही डॉक्टर्स लाच घेऊन या चाचण्या करून देतात. भ्रष्टाचाराची परिभाषा फार मोठी आहे, लाच-लुचपत , हफ्ता वसुली , कर चोरी, खोटे पेपर्स बनविणे , खूप भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत.
भ्रष्टाचार थांबू शकतो का?
थांबू शकतो, आणि हे थांबवणे आपल्याच हातात आहे. म्हणून भारत सरकारने भ्रष्टाचार दिवस साजरा करणे सुरु केले. म्हणून ९ डिसेम्बर ला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस मानला जातो.
आपण नेहमी पहातो आपल्या आजूबाजूला इतका भ्रष्टाचार चालेल असतो. हे आपण पाहून गप्प बसतो, पण त्या साठी आवाज उठविणे आपले काम आहे. पण काही लोक आपले गुंड पळून लोकांना थांबविण्याचा प्रयत्न करतात. आपलीच लोक आपल्याच देशाचे नाव खराब करत आहेत लाच घेऊन.
कडक कायदा
भ्रस्टाचारा विषयी कडक कायदे केले पाहिजे. परदेशात सौदी अरेबिया सारख्या शहरात बघा असे काही गुन्हे केले कि शिक्षा पण तशीच दिली जाते. असे कायदे आपल्या देशात पण आपण आणले तर आपला देश नक्कीच आणखी पुढे जाईल.
आपल्या देशातील काही असे लोक आहेत जे असे लाच लुतपात प्रकार पुढे आणतात. अशा लोकांना खरंच सलाम आहे. या देशाला मोदी सारख्या व्यक्तीची गरज आहे ज्यांनी असा काळा पैसे उघडकीस आणला. पण अजून काही बाकी आहे. तो हि लवकरच बाहेर येईल.
म्हणून वेळेवर कर पूर्ण भर. सामान घ्याल तर त्याची पावती घ्या. कोणाला लाच देऊ नका आणि कोणाकडून घेऊ हि नका.
सारांश:
देशाला भ्रष्टाचार ग्रस्त नाही तर भ्रष्टाचार मुक्त देश बनवा.