भ्रष्टाचार मराठी निबंध – पढ़े यहाँ Bhrashtachar Essay in Marathi

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा एक विकसनशील देश आहे. परंतु या देशामध्ये भ्रष्टाचारची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे. जर हा भ्रष्टाचार वाढतच राहिला तर हा देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होईल. आज भारत देश विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे.

परंतु या देशासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर समस्या आहेत.

भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ-:

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट या शब्दाचा अर्थ आहे बिघडलेला आणि आचार या शब्दाचा अर्थ आहे – आचरण.

भ्रष्टाचारचा अर्थ होतो जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करते त्याला भ्रष्टाचार असे म्हटले जाते.

माणूस हा जन्माने भ्रष्ट नसतो पण त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती भ्रष्टाचारी बनवते. म्हणजेच इर्ष्या, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती इ भ्रष्टाचार करण्यास पार पडते.

पूर्वीचा आणि आजचा मानव

भ्रष्टाचाराची सुरुवात ही कुठून झाली हे कोणालाही माहित नाही. पण याला मानव स्वत: जबाबदार आहे. पण खर आहे जेव्हा माणसाकडे पैसा येऊ लागला तेव्हा माणूस विविध गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला.

पूर्वीच्या काळात जेव्हा मानवाकडे पैसा नव्हता तेव्हा त्याच्यासाठी दैनंदिन वस्तू याच महत्वाच्या होत्या. माणसाची अपेक्षा फक्त दोन वेळचे पुरेसे जेवण मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीची माणसे ही मेहनती आणि साफ मनाची होती.

परंतु जसजशी सुधारणा होत गेली तशी मानवाला गरज नसताना सुद्धा त्या वस्तू हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसाच्या मनात लोभ निर्माण झाला. माणसाला जास्त मेहनत न करता संपन्न जीवन जगण्याचा हाव वाटू लागला.

राष्ट्राला लागलेली कीड

भ्रष्टाचार हा देशाला लागलेला कलंक किंवा कीड आहे. जर भ्रष्टाचार मुळापासून दूर करायचा असेल तर त्याची सुरुवात सगळ्यात प्रथम प्रत्येक व्यक्तीने आपल्यापासून करायला हवी.

प्रत्येक व्यक्तीने आपली सर्व कामे ही कायद्यानुसार आणि वेळेत केली पाहिजेत. त्याच बरोबर सर्व कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत.

भ्रष्टाचारी लोकांमुळे देशाची अर्थ व्यवस्था डळमळते. त्यामुळे देशात असुचिधा आणि विषमता निर्माण होते.

भ्रष्टाचाराची समस्या

आज भ्रष्टाचार हा सरकारी, खासगी आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून येतो. जसे कि लहानपणापासून जेव्हा आई – वडील आपल्या मुलाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आमिष दाखवलं जात.

जी वस्तू व गोष्ट आपल्याला मिळाली तरच कामाची वृत्ती वाढत जाते. तसेच हलीहाली भ्रष्टाचाराची ही कीड आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरत आहे. काळाबाजार, काळापैसा हे सर्व नष्ट करून देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे गरजेचे आहे.

अन्य कार्यांमध्ये भ्रष्टाचार

 

काही लोक नोकरी किंवा उच्च पद मिळवण्यासाठी दुसऱ्यांना पैसे देतात. तसेच निवडणुका जवळ आल्यावर मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केले जाते.

जेव्हा अशा लोकांना अधिकार प्राप्त होतो तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. तसेच जास्त प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि पुरवठ्यामध्ये होणारे अंतर भ्रष्टाचाराला आमंत्रण देते.

निष्कर्ष:

भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी सर्व लोकांना प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकारने सुद्धा भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. जो पर्यंत माणसाच्या मनात लोभाची भावना असेल आणि प्रत्येक माणसात चांगली प्रवृत्ती माणसात येत नाही.

तो पर्यंत आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. माणसाला कितीही कष्ट पडले तरी चालतील पण त्याने सदैव सन्मार्गाचा अवलंब करावा.

Updated: नवम्बर 5, 2019 — 4:42 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *