farmer

शेतकरी मराठी निबंध – पढ़े यहाँ Bharatiya Shetkari Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या भारत देशातील बहुतांश लोक गावामध्ये राहतात. भारत देश हा गावा – गावांचा देश आहे.

या देशामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता आहे. शेतकरी म्हणजे – शेती करणारा.

शेतकरी म्हटल कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी आणि अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा आणि आत्महत्या करणारा नजरेसमोर येतो.  शेतकरी हा शेतीचा एक महत्वाचा आणि मुख्य भाग आहे.

शेतीचा इतिहास

वर्षा ऋतु से लाभशेती हा व्यवसाय फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. शेतीचा उगम हा आदिमानवाच्या विचारातून झाला आहे. भारत देशात पूर्वीपासून सखोल भागात शेती हा व्यवसाय केला जात असे. म्हणून या भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले आहे.

पाण्यावर अवलंबून

farmer 1

शेती ही पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून असते. तसेच शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची आवशकता असते. त्याच बरोबर त्याला सुपीक जमीन सुद्धा लागते आणि मनुष्यबळ लागते.

या तीन गोष्टी प्रामुख्याने असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पैश्यांची सुद्धा गरज भासते. शेवटी शेतकरी आपला उत्पादित माल बाजार पेठेत नेऊन विकतो. शेतकऱ्यासाठी शेती हीच त्याच सर्व काही असते.

शेतकरी हा दिनभर शेतात राबून सगळ्यांसाठी अन्न पुरवठा करतो. तसेच देशामध्ये समृद्धी आणतो आणि आपला उदार निर्वाह सुद्धा करतो.

शेतकऱ्यावर येणारी संकटे farmer life

कधी – कधी शेतकऱ्याला शेती करताना अन्य संकटाना सामोरे जावे लागते. जसे कि ओळ दुष्काळ, अति प्रमाणात पाऊस, कोरडा दुष्काळ, बाजार पेठेत होणारी घसरण आणि निर्यातीत होणे बदल अशा अचानक येणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो.

परंतु कधी – काह्डी हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकरी हजारो रुपये खर्च करून शेतमाल जमा करतो. पण शेवटी त्याच्या कष्टाला फळ मिळताच अस नाही.

शेतकऱ्यांचे मित्रदोस्ती का महत्व

साप, बेडूक, मधमाश्या, कोंबड्या, शेळ्या, गांडूळ हे सर्व शेतकऱ्याचे मित्र आहेत. काही पक्षी पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. तसेच शेतातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.

अशिक्षित शेतकरीकिसानों के लिए योजना

काही शेतकरी असल्यामुळे त्यांना तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक विकासाची माहिती नसते. आज देशामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे विविध साधन सामग्री विकसित झाली आहे. शेतीसाठी लागणारी साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

पूर्वी मानव बैल किंवा म्हशींच्या साहाय्याने शेती करत असे. मानव कुदळ, खोरे आणि नांगराचा उपयोग करत असे. पण आज मानव ट्रॅक्टराच्या मदतीने शेती करत आहे. या सगळ्याचा फायदा हा श्रीमंत लोकांना होतो.

गरीब शेतकऱ्यांकडे पुरेशा पैसा उपलब्ध नसल्याने ते शेतीची साधने घेऊ शकत नाही. त्याच बरोबर अशिक्षित शेतकरी सरकारच्या योजना आणि धोरणांपासून वंचित राहतात.

शेती शेतकऱ्याचा मुख्य आधारकिसान की आत्मकथा2

शेती हा शेतकऱ्याचा मुख्य आधार आहे. कारण तो पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. शेती करून तो आपली आजीविका चालवतो. शेती हीच त्याच्या जीवनाचा आधार असतो. शेतीमधून त्याला जे काही पैसे मिळतात त्यावर तो आपले घर चालवतो.

निष्कर्ष:

शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याचे जीवन सुखी होण्यासाठी सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केले पाहिजे. तसेच शेतकरी बांधवाचे दु:ख जाणून घेतले पाहिजे. जर हा शेतकरी सुखी असेल तर हे जग सुखी असेल.

शेतकऱ्याप्रमाणेच आपण सर्वाना मिळून या धरतीला सुजलाम – सुफलाम बनवण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणे गरजेचे आहे. म्हणू आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणाले आहेत – “जय जवान जय किसान”.

Leave a Comment