प्रस्तावना:
स्वच्छता ही केवळ मनुष्याला घर पुरतीच करणे गरजेचे नाही आहे. परंतु त्याच बरोबर आपला देश सुद्धा साफ राहिला पाहिजे. याने आपले घरच नाहीतर पूर्ण देश स्वच्छ राहील.
म्हणून स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने चालवलेलं एक अभियान आहे. याची सुरुवात सर्वप्रथम गावामधून आणि शहरामधून करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान
आमच्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर, २०१४ साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. याला स्वच्छता अभियान आणि भारत मिशन म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे अभियान राष्ट्रीय स्तरावर चालवले जाते.
स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश
स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे कि, भारतातील सगळी गावे आणि शहरे ही हगणदारी मुक्त होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर भारतातातील सर्व रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे आहे.
महात्मा गांधीजींचे स्वप्न
आमच्या भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी स्वत: स्वच्छता ठेवत असत आणि स्वच्छतेला ईश्वराच्या पूजेप्रमाणे मानत असत.
महात्मा गांधी यांचे स्वप्न होते कि, भारत देशाच्या सर्व नागरिकांना एकत्र करून आपल्या देशाला स्वच्छ ठेवायच. महात्मा गांधी स्वत: ज्या आश्रमामध्ये राहत असत त्याची पहाटे ४ वाजता उठून साफ – सफाई करत असत.
म्हणून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
जनतेला आव्हाहन
महात्मा गांधीजी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे ब्रिटीश सरकारला छोडो इंडिया म्हणून सांगितले तसेच त्यांनी सर्व भारतवासियांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला. तेव्हाचे दिवस हे मंतरलेले दिवस होते.
म्हणून गांधीजी जे सांगत ते जनता मनापासून करीत होती. गांधीजीनी जनतेला सांगितले कि, हातात झाडू, खराटे, फावडी घेऊन आपला भारत देश स्वच्ह करूया आणि अन्य रोगांना दूर करूया.
स्वच्छतेची आवश्यकता
आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते कि, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा सहवास असतो. परंतु काही लोक जेव्हा धार्मिक स्थळांवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जातात आणि तिथे जाऊन कुडा – कचरा टाकतात व त्या जागेला प्रदूषित करतात. त्यामुळे अन्य प्रकारचे आजार पसरतात. या सगळ्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर होतो.
निर्मल भारत अभियान
स्वच्छ भारत ठेवण्याचा हा भारत सरकारचा प्रथमच प्रयत्न नाही आहे. या आधी सन १९९९ मध्ये भारता सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले होते जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे नाव ‘निर्मल भारत अभियान’ असे ठेवले.
परंतु या स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. नरेंद्र मोदी हे आपल्या शपथ विधी मध्ये सौच आणि स्वच्छतेबद्दल बोलणारे जगातील पहिले नेते होते.
स्वच्छता ठेवण्याचे उपाय
कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर बाटल्या तसेच खाद्य पदार्थांची पाकिटे एका कागदात जमा करून कचरा कुंडीत टाकावी.
ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही वेगवेगळे करून नगर पालिकेच्या जमा करणाऱ्या गाडीत टाकावा.
कोणत्याही व्यक्तीने रस्त्यावर चालताना थुंकू नये आणि जर कोणी व्यक्ती कचरा व घाण टाकत असेल त्याला रोकले पाहिजे.
निष्कर्ष:
प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता ही आपल्या घरापासून करायला हवी. आम्ही सर्व या भारत देशाचे नागरिक आहोत. जर आपण स्वच्छता ठेवली तर आपल मन सुद्धा साफ राहील. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे कि, आपला भारत देश स्वच्छ ठेवणे.