शहीद भगतसिंग मराठी निबंध – वाचा येथे Bhagat Singh Essay in Marathi

प्रस्तावना:

आपली भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी मानली जाते. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा जन्म झाला आहे. त्या सर्वांनी आपल्या भारत देशासाठी आणि समाज कार्य करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन त्याग केले आहे.

अशाच महान पुरुषांपैकी एक अमर क्रांतिकारी वीर होते – शहीद भगतसिंग. अमर हुतात्म्यांमध्ये सरदार भगतसिंग यांचे नाव सर्वात अधिक घेतले जाते.

शहीद भगतसिंग हे एक स्वतंत्रता सैनिक होते ज्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात लढाई करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. म्हणून त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सर्वात प्रभावी क्रांतिकारकांपैकी एक मानतात.

जन्म

शहीद भगतसिंग यांचा जन्म २७ सप्टेंबर, १९०७ साली पंजाब प्रांतातील लयालपूर जिल्ह्यातील बगा या गावात एक शीख कुटुंबात झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग आणि आईचे नाव विद्यावती कौर असे होते. भगतसिंग यांच्या जन्मानंतर त्यांच्या आजीने त्यांचे नाव ‘भागो वाला’ असे ठेवले होते. ज्याचा अर्थ होतो चांगले नशिबवाला.

ज्या वेळेस त्यांच्या वडिलांची आणि काकांची सुटका तुरुंगातून झाली होती. त्या सुमारास भगतसिंग यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य हे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते.

शिक्षण

भगतसिंग यांनी आपले प्रतिक शिक्षण आपल्या गावातूनच पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी लाहोरच्या डी. ए. व्ही महाविद्यालयातून हाईस्कुल ची परीक्षा दिली.

तसेच त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालयातून बी. ए ची परीक्षा दिली. भगतसिंग यांनी सन १९२३ मध्ये एफ. ए ची परीक्षा उत्तीर्ण केली.

जीवन परिचय

भगतसिंग हे लहानपणापासून खूप हुशार होते. ते लहान पणापासून वीरांचा खेळ खेळत असत. भगतसिंग लहान असतानाच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना होती.

भगतसिंग यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षांपासून पंजाबच्या क्रांतिकारी संस्थानामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

भगतसिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. त्यांनी महात्मा गांधीजींशी प्रेरित होऊन असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला.

भगतसिंग यांच्या जीवनाचा संकल्प

जालियनवाला बाग हत्याकांड नंतर लाला लजपत राय यांचे निधन झाले. त्यामुळे भगतसिंग याना त्यांच्या मृत्यूचा धक्का बसला.

म्हणून भगतसिंग ने त्यांच्या मृत्यूचा बदल घेण्याचे ठरविले. त्यांचा बदला म्हणजे सगळ्यात प्रथम सॉन्डर्सला मारणे हे होते. भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनी मिळून सॉन्डर्सला मारले. तसेच या दोघांना चंद्रशेखर आझाद यांनी मदत केली.

सॉन्डर्सचा बळी घेतल्यानंतर त्यांनी विधान सभेच्या संसद भवनात बॉम्ब फेकला. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.

फाशीची शिक्षा

२३ मार्च, १९३१ साली भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद या तिघांना लाहोरच्या कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची शिक्षा देण्यापूर्वी भगतसिंग यांना त्यांची अखेरची इच्छा विचारण्यात आली.

तेव्हा त्यांनी सांगितले की, आधी एका क्रांतिकाराला दुसऱ्या क्रांतिकारकांची भेट तरी घेऊ द्या. त्यावेळी तिघांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि हसत चेहऱ्याने फाशीवर गेले. फाशीची शिक्षा देताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती.

फाशीवर जाताना या तिघांनी देशभक्ती गीत गात होते. ते म्हणजे – मला रंग दे बसंती चोला. म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखलं जातो. तसेच हा इतिहासातील एक ‘काळा दिवस’ आहे.

निष्कर्ष:

भगतसिंग हे खरोखरच एक देशभक्त होते. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष नाही केला तर देशाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

म्हणून भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी भगतसिंग यांनी आपले सर्वस्व त्याग केलं. त्यामुळे भगतसिंग यांचे नाव अमर शहीदांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते.

Updated: दिसम्बर 12, 2019 — 1:30 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *