प्रस्तावना:
या धरतीवर मानवाचे अस्तित्व हे पुरुष आणि स्त्री या दोघांशिवाय संभव नाही आहे. आमच्या भारत देशामध्ये प्राचीन काळी स्त्रियांना देवीचा दर्जा दिला जात होता. त्यांना देवी समान पूज्यनीय मानले जात होते.
परंतु काही काळाने देशावर झालेल्या विदेशी आक्रमणामुळे स्त्रियांची स्थिती चिंता दायक बनली. स्त्रियांना अबला नारी ही संज्ञा दिली जात असे.
आमच्या भारत देशामध्ये लेक वाचवा आणि लेक शिकवा ही मोहीम लोकांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यांचे विचार बदलण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
लोकांचे विचार
काही लोक असे म्हणतात कि, मुलगा झाला तर आपल्या वंशाला पुढे नेऊ शकतो आणि मुलीला दुसऱ्या घरच परक धन समजल जात.
म्हणून काही लोक मुलीना मातेच्या गर्भातच मारतात. तर काही लोक गरिबीमुळे मुलीची हत्या करत.
विविध प्रथा
आमच्या भारतीय समाजात प्राचीन काळी अनेक प्रकारच्या प्रथा रूढ होत्या. त्या सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे. जसे कि स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा बळी, सती प्रथा, बाल विवाह इत्यादी सर्व प्रथांना सामोरे जावे लागत असे.
परंतु आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे उलटून गेली तरीही आज हुंडा बळी, स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री पुरुष भेदभाव हा समाजात दिसून येतोच.
आज आपण २१ व्या शतकात पोहोचलो तरी स्त्रियाना दुय्यम दर्जा दिला जात आहे. महिला या समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. परंतु आज काळ महिलां विषयक गुन्हे फार वाढले आहेत.
लेक वाचवा, लेक शिकवा याचा मुख्य उद्देश
या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की, देशातील सर्व मुलींना त्यांचा हक्क मिळवून देणे आणि त्यांना वाचण्या – लिहण्याची संधी देणे.
लेक वाचवा, लेक शिकवा अभियानाची आवश्यकता पडली कारण –
त्यांच्यावर फक्त घराची जबाबदारी दिली जात असे. म्हणून देशातील बहुतेक स्त्रिया या अशिक्षित असायच्या. म्हणून नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात करून सर्व मुलींना शिक्षण प्राप्त करून दिले. परंतु आज प्रत्येक स्त्रीने सिद्ध करून दाखवले आहे कि, मुलगी पण कोणत्याही क्षेत्रात काम करु शकते.
ती चार भिंतींच्या बाहेर पडून अनेक क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे. तिने सिद्ध केले आहे कि, ती मुलांपेक्षा अधिक आज्ञाधारक, कमी हिंसक आहे. एक मुलगी आपल्या आयुष्यात आई, पत्नी, बहीण आणि मुलगीही भूमिका निभावते.
सरकारची महत्वाची धोरणे
तसेच मुलींचा जन्म दर कमी असलेल्या जिल्ह्यांवर आणि शहरांवर जास्त लक्ष देणे. जेणेकरून जन्मदर वाढेल.
त्याच बरोबर अंमलात आणलेली धोरणे आणि योजना यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होते कि नाही याकडे लक्ष केंद्रित करणे.
दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या कन्या जन्म दराची समस्या लोकांसमोर मांडून जनजागृती निर्माण करणे.
निष्कर्ष:
आपल्या भारत देशातील प्रत्येक व्यक्तीने मुलगी वाचविण्यासाठी आणि त्यांचे समाजातील वर्चस्व सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच समाजातील हुंडाबळी, बाळ विवाह आणि स्त्री भरून हत्या यांसारख्या प्रथांचा विनाश केला पाहिजे. लेक वाचवा, लेक शिकवा हे भारत सरकारने उचललेले एक महत्वाचे आणि योग्य पाऊल आहे.