प्रस्तावना:
आपल्या या पवित्र भारतभूमीवर अनेक महान नेत्यांचा जन्म झाला आहे. त्या सर्व महान नेत्यांनी या भारत भूमीवर जन्म घेऊन या भूमीला अधिक पवित्र बनवले आहे.
तसेच देशासाठी आणि समाजासाठी अनेक महान कार्य करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा वारसा आजही भारत देशातील लोकांसाठी आदर्श, मार्गदर्शक आणि दिशा दर्शक ठरलेला आहे.
अशा या महान पुरुषांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. त्याच बरोबर त्यांच्या महान कार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘आधुनिक भारताचे निर्माता’ म्हणून ओळखले जातात.
त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातीभेद, बाल विवाह आणि अंधश्रद्धा या सर्व प्रथा दूर कारण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील आणि देशातील लोकांसाठी अर्पण केले.
जन्म
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव ‘रामजी’ आणि आईचे नाव ‘भीमाबाई’ असे होते. भीमराव आंबेडकर यांचे वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ते नेहमी सावध असत. त्यांना वाचनाचाही खूप आवड होती. म्हणून त्यांच्या घरातच ग्रंथसंग्रह होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने आणि अमोघ वक्तृत्वाने दीन दलित्यांच्या, श्रमिकांच्या तसेच शोषितांच्या अंधकारमे जीवनाला प्रगयेचा संदेश दिला.
शिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. दलित वर्गाच्या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी दिली जात नसे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेतील पाणी पनियाची परवानगी नव्हती.
शाळेतील चपराशी हा त्यांच्या ओंजळीत पाणी टाकून त्यांना पिण्यास देत असे. ज्या दिवशी चपराशी सुट्टीवर असायचा तेव्हा त्या दिवशी मुलांना पाणी पिण्यास मिळत नसे. या सर्व अन्यांना सामोरे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चविद्या प्राप्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. तसेच त्यांनी सन १९०७ ला मैट्रिकची डिग्री प्राप्त केली. त्यांना लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती. ते एक हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते.
सन १९०८ ला त्यांनी एलफ्न्सिटन कॉलेजला प्रवेश घेतला. तसेच त्यांनी सन १९१२ ला विशवविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. ते फारसी भाषेतून उत्तीर्ण झाले आणि त्यांनी या महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान या विषयांमधून पदवी प्राप्त केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. या संविधाना मागचा मुख्य उद्देश असा होता कि, देशातील जातीभेद आणि अस्पृश्यता मुळापासून नष्ट कारण्यासाठी अस्पृश्य समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे आणि सर्वाना समानतेचा अधिकार देणे हा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्ष परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना लिहिली आणि ही राज्यघटना २६ जानेवारी, १९५० ला लागू करण्यात आली.
बौद्ध धर्माचा स्वीकार
जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९५० साली बौद्ध संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले तेव्हा तिथे जाऊन ते बौद्ध धर्माच्या विचारांनी एवढे प्रभावित झाले कि, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सन १९५५ ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. तसेच त्यांनी बौद्ध धर्माविषयी अनेक पुस्तके लिहिली.
आंबेडकर जयंती
आमच्या भारत देशामध्ये दरवर्षी १४ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंतीच्या रूपाने साजरा केला जातो. त्यांच्या या जन्मदिवसाला ‘नॅशनल हॉलिडे’ म्हणून घोषित करण्यात आला. तसेच त्यांच्या जयंतीला ‘भीम जयंती’ असे सुद्धा म्हटले जाते. आंबेडकर जयंती निमित्त त्यांनी देशाला अमूल्य योगदानाकरता त्यांचे स्मरण केले जाते.
निष्कर्ष
अशा या महान मानवाचे महान कार्य देशासाठी आणि समाजासाठी सामाजिक बांधिलकेचे कर्तव्य मानले जाते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला मिळालेली सर्वात मोठी आणि अमूल्य देणगी आहे. अशा या महामानवाचे ६ डिसेंबर, १९५६ ला निधन झाले.