वायू प्रदूषण मराठी निबंध – पढ़े यहाँ Air Pollution Essay in Marathi

प्रस्तावना:

या धरतीवर प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्न, हवा आणि पाणी या तीन गोष्टींची मूलभूत आवश्यकता आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मानव वस्ती आढळून येते. कारण मानवाला आपले जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी येथे उपलब्ध आहेत.

परंतु मानव हा या सर्व गोष्टींचा दुरुपयोग करता आहे. त्यामुळे प्रदूषण, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्या सर्वांमधील प्रदूषणाची समस्या ही एक गंभीर समस्या आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे की पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण इ अनेक प्रकार आहेत. त्या सर्व प्रकारांपैकी वायू प्रदूषण हे दिवसेंदिवस प्रदूषण हे प्रचंड रूप धारण करत आहे.

वायू प्रदूषण म्हणजे काय –

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा. आपल्या पृथ्वीचे वातावरण हे अनेक प्रकारच्या वायूंनी बनलेले आहे. ज्यामध्ये मानवाला आणि इतर सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे.

परंतु पृथ्वीवरील होणाऱ्या बदलांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि बरेच हानिकारक आणि दूषित पदार्थ हे हवेमध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे आणि वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे.

वायू प्रदूषणाची कारणे

वाढती लोकसंख्या

वायू प्रदूषणाचे सर्वात प्रथम कारण म्हणजे – वाढती लोकसंख्या. कारण देशाची लोकसंख्या ही दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत चालली आहे.

त्याच प्रमाणे त्यांच्या गरजा देखील वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढला आहे. मानवाला राहण्यासाठी सर्वात म्हणजे घराची आवश्यकता असते.

संबंधित लेख:  पोपट मराठी निबंध - वाचा येथे Essay on Parrot in Marathi for Kids

त्यामुळे मानव आपली सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी झाडांची तोड करत आहे. मानव झाडांची तोड करून त्या जागी सिमेंटची घरे उभारत आहे. त्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत आणि झाडांमुळे मिळणारी शुद्ध हवा विरळ होत चालली आहे.

वाहनांचा अतिवापर

आज मानव एक ठिकाहून सुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक साधनांचा वापर करत आहे. त्यामुळे दर दिवशी रस्त्यावर हजारो वाहने चालताना दिसून येतात. तसेच वाहनांमधून निघणारा धूर हा हवेमध्ये मिसळला जातो आणि हवा प्रदूषित होते. त्यामुळे हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

कारखान्यातून निघणारा धूर

पूर्वीच्या काळी मानव हातमागाच्या साहाय्याने काम करत असे. परंतु आपल्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने विविध साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे मानव आज सर्व कामे ही यंत्राच्या साहाय्याने करू लागला आहे.

तसेच तो अनेक अयोग्य आणि कारखाने स्थापन करू लागला. त्या उद्योगांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा धूर हा हवेमध्ये मिसळला जात आहे आणि हवा दूषित होत आहे.

विविध कारणे

वायू प्रदूषणाची सर्वात मोठी कारणे म्हणजे कापड कारखाने, रसायन कारखाने, तेल शुद्ध करणारे कारखाने, साखर बनविणारे कारखाने, धातू व कार्ड  बोर्ड बनविणारे कारखाने, खत व कीटकनाशके कारखाने इ सर्वांचा दुष्परिणाम हा हवेवर होत आहे.

त्यामुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साइड, नायट्रोजन, सल्फर डाय ऑक्साइड हे सर्वांचे प्रमाण वाढत आहे. त्याच बरोबर वायू प्रदूषण सुद्धा वाढत आहे.

वायू प्रदूषणाचा परिणाम

Essay On Air Pollution in Hindiवायू प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवी जीवनावर, वनस्पतींवर, प्राणी आणि पक्षी यांच्या जीवनावर होत आहे. अशुद्ध हवेमुळे मानवाला श्वास घेणे अवघड जात आहे.

संबंधित लेख:  लोकमान्य टिळक मराठी निबंध - येथे वाचा Essay on Lokmanya Tilak in Marathi

मानवाला आणि सर्व सजीव अशुद्ध हवा श्वास घेतात आणि अन्य प्रकारच्या आजाराने ग्रस्त असतात. प्रदूषित झालेली हवा ही आजारपण आणि आरोग्य बद्दलच्या समस्या व मृत्यूस कारणीभूत ठरते.

निष्कर्ष:

वायू प्रदूषण ही एक सर्वात मोठी समस्या आहे. यावर लक्ष देणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने वाहनाचा वापर हा कमी प्रमाणात केला पाहिजे.

त्याच बरोबर प्रत्येकाने झाडे तोडण्या ऐवजी जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. जेणेकरून आपण वातावरणाचे रक्षण करू शकू.

Updated: December 12, 2019 — 1:22 pm

Leave a Reply

Your email address will not be published.