आदर्श विद्यार्थी मराठी निबंध – पढ़े यहाँ Adarsh Vidyarthi Essay in Marathi
By hindiscreen
प्रस्तावना:
कोणत्याही देशाचे विद्यार्थी हे त्या देशाचे भविष्य असतात. देशाचा विकास हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. जर विद्यार्थी आदर्शवादी असतील तर त्या देशाचाच विकास परिपूर्ण होतो.
विद्यार्थ्यांच्या अंगी एक्रागता, शिस्त आणि आत्मविश्वास तसेच देशभक्तीची भावना असली पाहिजे. यातूनच आदर्श विद्यार्थी निर्माण होतात.
एक आदर्श विद्यार्थी हा जन्मापासूनच आदर्श नसतो. परंतु तो चांगल्या मित्रांच्या सोबत राहून आणि चांगले शिक्षण आणि चांगले गुण प्राप्त करून स्वतःला आदर्शवादी बनवतो.
आदर्श विद्यार्थी म्हणजे काय –
आदर्श विद्यार्थी म्हणजे एक असा विद्यार्थी ज्याचे वर्तन आणि स्वभाव दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण असेल. तसेच एक आदर्श विद्यार्थी देशाचा एक चांगला नागरिक आणि देशप्रेमी असतो.
शिस्तीचे पालन
एक आदर्श विद्यार्थी नेहमी शिस्तीत असतो आणि सर्व लोकांच्या शब्दाचे पालन करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी गुरूंच्या आज्ञाचे पालन करतो. तसेच आदर्श विद्यार्थी नेहमी स्वच्छ कपडे घालतो. तसेच निर्भय आणि धैर्यवान सुद्धा असतो.
सत्याचे समर्थन
आदर्श विद्यार्थी नेहमी सत्याचे समर्थन करतो. त्यांना खोट्या गोष्टींचा नेहमी तिरस्कार येतो. तसेच खोटे बोलणारे लोक काही लोकांना सत्य बोलण्यास प्रेरित करतात. परंतु एक आदर्श विद्यार्थी आपल्या जीवनात नेहमीच नियम बनवतो आणि त्यांचे पालन सुद्धा करतो.
दुसऱ्यांची सहायता
एक आदर्श विद्यार्थी नेहमी दुसऱ्यांची सहायता करण्यासाठी तत्पर असतो. तसेच तो कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जातो.
आदर्श विद्यार्थी आपली सर्व कर्तव्य प्रामाणिपणे आणि काळजी पूर्वक पार पडतो. तो सदैव सर्व लोकांशी चांगल्या प्रकारे वागतो. त्याचे आचरण हे नेहमी आनंदी आणि हृदयस्पर्शी असते.
वेळेचा सदुपयोग
एक आदर्श विद्यार्थी नेहमी वेळेचा सदुपयोग करतो. कारण त्याला माहित असते कि, एकदा गेलेली वेळ हि परत येत नाही.
त्याच बरोबर त्याला हे सुद्धा माहित असते कि जर आपण वेळ वाया घालावला तर आपले जीवन व्यर्थ व फुकट जाऊ शकते. म्हणून आदर्श विद्यार्थी नेहमी वेळेचा सदुपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करतो.
देशाचे भविष्य
देशाचे भविष्य हे केवळ विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. कारण पुढे जाऊन युवा पिढीला उदयास यावे लागते.
ज्या देशाचे विद्यार्थी आदर्शवादी असतात त्याच देशाचा विकास होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांचे आदर्श विद्यार्थी असणे खूप गरजेचे आहे.
आदर्श विद्यार्थी कसे बनतात –
एक आदर्श विद्यार्थी आपल्या वर्गात जितके शक्य होईल तितके लक्ष देतो.
ते आपल्या शंका दूर करण्यासाठी वर्गात प्रश्न विचारण्यासाठी संकोच करत नाही.
आदर्श विद्यार्थी नेहमी घरी जाताना आपला अभ्यास पूर्ण करून आणि सगळ्या वस्तू नीट ठेवल्या आहेत कि नाही याची खात्री करतात.
आदर्श विद्यार्थी केवळ शैक्षणिक दृष्ट्या चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत नाहीत तर खेळ, वादविवाद स्पर्धा, कला आणि हस्तकला यामध्ये सुद्धा सहभाग घेतात.
आदर्श विद्यार्थी नेहमीच चांगली कामगिरी करतात आणि अपयशाच्या भीतीमुळे ते कोणतीच संधी गमावत नाहीत.
ते अयशस्वी झालेत तरी हार मानत नाहीत आणि ती गोष्ट मिळेपर्यंत ते सतत प्रयत्न करत असतात.
निष्कर्ष
एक आदर्श विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतो कारण आदर्श विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून असे गुण आहेत. जे आयुष्यातील सर्व अडचणींना संयम पूर्वक सामना करू शकतो.
आदर्श विद्यार्थी आपल्या जीवनात नेहमी उच्च लक्ष्य ठेवतात आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात.