ए. पी. जे अब्दुल कलाम मराठी निबंध – वाचा येथे Abdul Kalam Marathi Essay

प्रस्तावना:

आपला भारत देश हा महान पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. भारत भूमीवर अनेक अनेक महान पुरुषांचा जन्म झाला आहे.

त्यांनी आपल्या कार्यातून या भारत देशासाठी अनेक महान कार्य केले आहेत. त्या महान पुरुषांपैकी ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव संपूर्ण देशात मोठ्या आदराने घेतले जाते. ए. पी. जे अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती इ सर्व पदांवर कार्य करून महत्वाची भूमिका निभावली आहे.

त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या कार्य पद्धतीमुळे ते लोकांचे ‘राष्ट्रपती’ म्हणून प्रसिद्ध झाले. तसेच त्यांना ‘मिसाईल मॅन’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.

जन्म

ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ ला तामिळनाडू येथील रामेश्वर मध्ये एका कनिष्ठ मध्यमवर्गात झाला होता.

त्यांचे संपूर्ण नाव ‘अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम’ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव ‘जैनुलाबदिन अब्दुल’ असे होते. त्यांचे वडील हे यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे – आणण्याचे काम करीत असत. त्यांच्या आईचे नाव आशाम असे होते.

परंतु लहान वयातच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रे विकून आणि छोटी – मोठी कामे करून कुटुंबाची देखभाल केली. त्यांचे बालपण हे खूप हलाखीचे गेले.

शिक्षण

ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला झाले. शाळेत असताना त्यांना गणित या विषयात रुची होती. त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

त्यांनी भौतिकशास्त्रात बी. एससी पूर्ण केल्यानंतर चेन्नईमधील इन्स्टिटयूट ऑफ टेकनोलोजि येथे प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या बहिणीने दागिने गहाण ठेऊन पैसा पुरवला.

तसेच त्यांनी या संस्थेमधून एरोनोटिसचा डिप्लोमा पूर्ण केला आणि नासा मध्ये एरोस्पेस टेकनोलोजि चे शिक्षण घेतले. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना भारतीय हवाई दलात वैमानिक होण्याची आशा होती.

मिसाईल मैन

ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी भारत देशासाठी क्षेपणास्त्रे तयार केली त्यामुळे त्यांना ‘मिसाईल मैन’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी भारत देशाला एक शक्तिशाली देश बनविण्यासाठी आपने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

ए. पी. जे अब्दुल कलाम हे एक साधे आणि धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. ते एक मुसलमान होते म्हणून ते नेहमी नमाज पढत असत. त्याच बरोबर त्यांनी अन्य धर्मांचा देखील आदर केला.

प्रसिद्ध पुस्तके

ए. पी. जे अब्दुल कलाम यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. ते संगीत अगदी मनापासून ऐकत असत आणि त्यानंतर स्वतः गात असत. बहुतेक लोक त्यांना कवी मानत असत.

ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी दोन पुस्तके लिहिली जी सर्वात प्रसिद्ध झाली. त्यांनी ‘इंडिया २०२०’ आणि ‘विंग्स ऑफ फायर एन औटोबायोग्राफी’ अशी दोन पुस्तके लिहिली.

भारत देशाचे राष्ट्रपती

ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी सुचवण्यात आले. त्यांना काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते भारत देशाचे राष्ट्रपती झाले. ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते आणि त्यांनी २५ जुलै २००२ पासून २५ जुलै, २००७ पर्यंत या पदावर कार्य केले.

पुरस्कार प्रदान

ए. पी. जे अब्दुल कलाम याना त्यांच्या जीवन कालावधीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांना सन १९८१ साली ‘पदमभूषण’, सन १९९० साली ‘पदमविभूषण’ आणि १९९८ मध्ये त्यांना भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

 

निष्कर्ष:

ए. पी. जे अब्दुल कलाम हे एक भारतीय वैज्ञानिक होते तसेच ते एक कवी सुद्धा होते. त्यांनी भारत देश एक सामर्थ्यवान देश म्हणून देशाची प्रतिमा उंचावत देशाचे नाव उज्ज्वल केले. संरक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली.

Updated: दिसम्बर 12, 2019 — 1:02 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *