प्रस्तावना:
एक भारतीय वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती इ सर्व पदांवर महान कार्य करणारे भारतीय म्हणजे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव संपूर्ण भारत देशामध्ये लोकप्रिय व्यक्तींमध्ये घेतले जाते.
त्यांनी नव्या पिढीला आपल्या जीवनातून, कार्यातून आणि लेखनातून प्रेरणा दिली. त्यांनी भारत देशाला एक सशक्त आणि मजबूत देश बनविण्यासाठी एक महत्वाची भूमिका निभावली आहे.
जन्म
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ साली तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव डॉ.अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव ‘जैनुलाब्दीन अब्दुल’ असे होते. त्यांचे वडील हे रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतुन धनुष्यकोडीला नेण्याचे आणि आणण्याचे काम करत असत. परंतु लहान वयातच त्यांच्या वडिलांचे छात्र हरवले.
त्यामुळे कलाम यांनी वर्तमान पत्रे विकून आणि छोटी – मोठी कामे करून घराला हातभार लावला. त्यांचे बालपण हे अत्यंत संघर्षमय होते.
शिक्षण
ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम येथून पूर्ण केले. शाळेत असताना त्यांना गणित विषयाची आवड होती.
त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी भौतिक शास्त्रात बी. एस. सी पूर्ण केल्यानंतर चेन्नई मधील इन्स्टिटयूट ऑफ टेकनोलोजि मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्या बहिणीने दागिने गहाण ठेऊन पैसा पुरवला.
तसेच त्यांनी या संस्थेमधून एरोनोटिक्सचा डिप्लोमा पूर्ण करून टेकनोलोजिचे शिक्षण घेतले. त्याच बरोबर ए. पी. जे अब्दुल कलाम यांना भारतीय वैमानिक होण्याची इच्छा होती.
मिसाईल मैन
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी भारत देशासाठी क्षेपणास्त्रांसारखे आग आणि पृथ्वी निर्माण केली. त्यामुळे त्यांना ‘मिसाईल मैन’ या नावाने ओळखले जाते.
त्यांनी भारत देशाला एक शक्तिशाली देश बनविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे साधे आणि धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते.
ते मुस्लिम असल्याने नेहमी नमाज पढत असत. त्याच बरोबर त्यांनी अन्य धर्माचा देखील आदर केला. तसेच ते एक रामभक्त सुद्धा होते.
पुस्तकांची निर्मिती
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम याना लहानपणापासून संगीताची खूप आवड होती. ते संगीत अगदी मनापासून ऐकत असत आणि त्यानंतर स्वतः गुणगुणत असत. काही लोक त्यांना कवी सुद्धा म्हणत असत.
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी दोन पुस्तके लिहिली जी अतिशय प्रसिद्ध झालीत. अब्दुल कलाम यांनी ‘इंडिया २०२०’ आणि ‘विंग्स ऑफ़ फायर एन औटोबायोग्राफी’ ही दोन पुस्तके लिहिली.
राष्ट्रपती पद
पुरस्काराने सन्मानित
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना २५ नोव्हेंबर, १९७९ साली भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
तसेच त्यांना सन १९९८ साली राष्ट्रीय एकता आणि इंदिरा गांधी या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना भारत सरकारने ‘पदमभूषण’ या पुरस्काराने गौरविले.
निष्कर्ष:
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक तसेच एक चांगली महान व्यक्ती सुद्धा होते. त्यांनी राजकारणापासून दूर राहून सुद्धा राजकीय क्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे.
त्याच बरोबर त्यांनी आपली कामगिरीने, उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावामुले ते देशातील भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठरले. आजही भारत देशात अब्दुल कलाम यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.