आई संपावर गेली तर मराठी निबंध – पढ़े यहाँ Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi language

प्रस्तावना:

प्रय्तेक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आई असते जिचे अस्तित्व सगळ्यात मोलाचे असते. कोणीही व्यक्ती आई शिवाय आपल्या जीवनाची कल्पना नाही करू शकत. प्रत्येकाची आई हि त्याच सर्वस्व असते.

आई हि जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. या ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे कि, ईश्वर सगळ्यान सोबत नाही राहू शकत. म्हणून त्याने आईला बनविल आहे. आईला ईश्वराच दुसर रूप मानल जात.

म्हणून म्हटलं गेल आहे कि, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे अगदी खरे आहे. कारण या धरतीवर भगवान कृष्ण, राम हे सुद्धा आई शिवाय या जगात येऊ शकत नाहीत.

आईचे घरासाठी कार्य

आई ही नेहमी आपल्या कुटुंबासाठी झटत असते. ती कुटुंबासाठी जेवण करणे, कपडे धुणे आणि अन्य प्रकारची कामे करणे हि सर्व कामे ती करते. परंतु आपण तिच्या कामाची, मेहनतीची, काळजीची आणि प्रेमाची प्रशंसा तर दूरच साधी तिची काळजी पण घेत नाही.

जसे कि जर आपल्याला कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली आणि कमी मेहनतीमध्ये मिळाली तर आपणा तिची किमत करत नाही. मग ते अन्न असू दे, पैसे असू दे व आईचे प्रेम असू दे.

जर आपणा एकदा डोळे बंद करून अशी कल्पना केली तर कि आई जर संपावर गेली तर, तिने घरचे काम करणे सोडले, जेवण बनवणे थांबवले तर काय होईल.

शाळा बुडाली

Essay On My School in Hindi

आम्हाला आईच्या कष्टांची किमत तेव्हा कळते जेव्हा आई संपावर जाते. एक दिवशी सकाळीजग आली तेव्हा बघितले तर घड्याळात ८ वाजले होते. माझ्या शाळेची बस केव्हाच निघून गेली होती.

मी आईला हाक मारत स्वयंपाक घरात गेलो. तर मला आई कुठेच दिसत नव्हती. माझ्या ओरडण्यामुळे बाबा जागे झाले. त्यानाही आपल्या कामावर जाण्यास उशीर झाला होता.

आई कुठे गेली म्हणून शोधत बाहेरच्या खोलीत गेलो. तेव्हा मला तिथे एक पत्र मिळाले. ते वाचून आम्हाला समजल कि आज सर्व स्त्रिया संपावर गेल्या आहेत.

खाण्याचे हाल

घरच्या स्वयंपाक घरात मला कुणीच दिसत नव्हते. सगळ्या स्त्रिया संपावर गेल्या होत्या. पण मला तर खूप भूक लागली होती. काय करावे मला काहीच काळात नाही होते.

तेवढ्यात मला बाबांनी फोन केला आणि त्यांना मी घरची स्थिती सांगितली. घरी कोणीच नसल्यामुळे मला बसून – बसून खूप कंटाळा आला होता. आई शिवाय मला अभ्यास ही करता येत नाही होता.

माझ्यासाठी बाबानी जेवण पाठवले होते. ते मी खाल्ले पण आईच्या हातच्या जेवणाची चव त्या जेवणाला नाही होती. आई नसल्यामुळे घराची अवस्था पण खराब झाली होती.

घरची अवस्था

एक दिवस आई नाही तर काय अवस्था झाली होती. त्या दिवशी आम्हाला कळल कि आई घराची आणि आमची किती काळजी घेते. जेव्हा संध्याकाळी बाबा घरी आले होते आणि तेही कंटाळले होते.

त्यांना चहा मिळाला नाही. त्यानंतर आई ठीक ८ वाजता घरी आली आणि आम्ही दोघांनी तिला विनवले. तुझ्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत पण तू संपावर जाऊ नकोस.

निष्कर्ष:

आई हि प्रत्येकाला सुखदुखात साथ देणारी तसेच आमच्या जीवनाचा आधार स्तंभ आणि दीप स्तंभ आहे. परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना आहे कि, सगळ्यांना अशीच आई मिळू दे.

Updated: नवम्बर 4, 2019 — 10:39 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *