Republic Day

प्रजासत्ताक दिन मराठी निबंध – येथे वाचा 26 January Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रजासत्ताक दिवस हा भारतातील महत्वाच्या आणि प्रमुख तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे. हा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिवस हा संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाला ‘गणराज्य दिन’ असे सुद्धा म्हटले जाते. आमच्या भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिवस हा २६ जानेवारीला साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो –

देश को स्वतंत्रता१५ ऑगस्ट, १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. या स्वतंत्र भारताला त्याचे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून २६ जानेवारी, १९३० ला लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.

स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्षे परिश्रम घेऊन आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली. ही राज्यघटना २६ जानेवारी, १९५० ला भारत देशामध्ये लागू करण्यात आली.

यादिवशी आपला भारत देश एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला.

भारत लोकशाही राज्य

भारत देशाचे राष्ट्रीयत्वआपला भारत देश हा एक मोठे लोकशाही असलेला देश आहे. म्हणजेच हे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या राज्यघटनेनुसार २६ जानेवारी, १९५० साली प्राप्त झाला. प्रजासत्ताक दिनाच्या  दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

लाल किले पर ध्वजारोहण आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तसेच देशाच्या तिरंग्याला सलामी दिली जाते.

राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायिले जाते. आपल्या भारत देशाच्या आजादीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. तसेच राष्ट्रपतीद्वारा भाषण दिले जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात.

प्रजासत्ताक दिवसाचे महत्त्व

स्वतंत्रता प्राप्तिप्रजासत्ताक दिवस हा आत्म्यास आत्मत्यागीतेने भरून काढतो आणि भारत देशातील सर्व नागरिकांना संपूर्ण स्वातंत्र्याची भावना देतो. हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिवस हा आपल्या सर्वनासाठी खूप महत्वाचा आहे, कारण हा दिवस आपल्याला संविधानाचे महत्त्व समजवून देतो.

राष्ट्रीय छुट्टी

Republic Day3 आपल्या भारत देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळवून २६ जानेवारी, १९५० ला भारत देशाने आपले संविधान अंमलात आणून लोकशाहीतील नव्या पर्वाची सुरुवात केली.

प्रजासत्ताक दिवस भारत देशातील प्रमुख तीन “सुट्ट्यांपैकी” एक आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था या सर्वांना राष्ट्रीय सुट्टी असते.

अन्य ठिकाणी ध्वजारोहण

college And School Republic Dayn प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, खाजगी संस्था आणि सरकारी संस्था या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण केले जाते.

तसेच प्रत्येक गावात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या काढल्या जातात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमधून खाऊ वाटप केला जातो, त्यामुळे मुले ही आनंदित होतात.

त्याच प्रमाणे लहान आणि मोठी मुले ही तिरंगा ध्वज हातात घेऊन मोठ्या उत्साहाने भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत सहभाग होतात.

निष्कर्ष  

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते. प्रजासत्ताक दिनामुळे आपण स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकलो आणि अत्याचार व गैरवर्तना विरोधात आवाज उठवू शकतो.

हे सर्व आपल्याला भारत देशाची राज्यघटना आणि लोकशाही यामुळे शक्य झाले. म्हणूनच आपल्या भारत देशात प्रजासत्ताक दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रमाणे असे राष्ट्रीय सण साजरे केल्याने प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्र प्रेम अधिक उसळून आणि उजळून निघते.

Leave a Comment